1. मेष:- धार्मिक कामात सहभाग घ्याल. मदतीचा हात पुढे कराल. योग्य मार्गदर्शन कराल. कामाचे योग्य नियोजन करावे. अती श्रमामुळे थकवा जाणवेल.
  2. वृषभ:- वायफळ बडबड टाळावी. मानापमानाचे प्रसंग येऊ शकतात. परिस्थितीची जाणीव ठेवून वागावे. कामातील बदल लक्षात घ्या. कलेचा आस्वाद घ्याल.
  3. मिथुन:- जोडीदारा विषयी गैरसमज टाळावेत. भागीदारीत सतर्क राहावे. तब्येतीची हेळसांड करू नये. आपली संगत तपासून पहावी. एकाच वेळी भारंभार कामे अंगावर घेऊ नका.
  4. कर्क:- तरुण लोकांशी मैत्री कराल. दिवस खोडकरपणात घालवाल. सहकार्‍यांवर अवलंबून राहू नका. कामातून समाधान शोधावे. जोडीदाराच्या शांत स्वभावाने अचंबित व्हाल.
  5. सिंह:- वरिष्ठांच्या मर्जीचे पालन कराल. जोडीदाराचे वर्चस्व राहील. भागीदाराशी वाद वाढवू नका. जुगारापासून दूर राहावे. अंगीभूत कलेचे कौतुक केले जाईल.
  6. कन्या:- मनाची द्विधावस्था जाणवेल. घरच्या कामाचा ताण जाणवेल. अपचनाचा त्रास जाणवेल. हातातील कामात यश येईल. छुप्या शत्रूंवर लक्ष ठेवावे.
  7. तूळ:- जोडीदाराचा हट्ट पुरवाल. जवळच्या प्रवासात सतर्क राहावे. अती अपेक्षा बाळगू नका. मानसिक ताणाला बळी पडू नका. मुलांचा विरोध समजून घ्यावा.
  8. वृश्चिक:- घरातील गोष्टींकडे अधिक लक्ष द्यावे. फारच आवश्यकता असेल तरच प्रवास करावा. कौटुंबिक वातावरण शांततेचे ठेवावे. पत्नीचा लाडिक हट्ट पुरवाल. घरातील कामे स्वखुशीने पार पाडाल.
  9. धनू:- आपल्याच मर्जीने कामाचा भार उचलाल. भावंडांच्या समस्या जाणून घ्याव्यात. कौटुंबिक सौख्य वाढेल. क्षुल्लक गोष्टींची चिंता करत बसू नका. उधारीचे व्यवहार शक्यतो टाळावेत.
  10. मकर:- मैत्रीतील आपुलकी वाढेल. फसवणुकीपासून सावध राहा. अनाठायी खर्च होऊ शकतो. मत्सराला बळी पडू नका. आर्थिक लाभाचा दिवस.
  11. कुंभ:- डोकेदुखीचा त्रास जाणवेल. वेळेचे योग्य नियोजन करावे. धाडसाने कामे हाती घ्याल. सारासार विचार करण्यावर भर द्यावा. अती घाई बरी नाही.
  12. मीन:- जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी. हातापायांच्या दुखण्याकडे दुर्लक्ष नको. कौटुंबिक खर्च आटोक्यात ठेवा. कर्तव्यात कसूर करू नका. हातून चांगले लिखाण होईल.

    – ज्योतिषी विद्याधर करंदीकर

Surya Gochar 2024 in Bharani nakshatra
आता पैसाच पैसा! सूर्याच्या नक्षत्र परिवर्तनाने पुढच्या १४ दिवसांत ‘या’ राशी होणार मालामाल
25th April Panchang Marathi Rashi Bhavishya Thursday 48 Minutes Abhijaat Muhurta
२५ एप्रिल पंचांग: गुरुवारी ‘ही’ ४८ मिनिटे आहे अभिजात मुहूर्त; मेष ते मीन राशीला लक्ष्मी नारायण कसे देतील आशीर्वाद?
10th April 2024 Panchang Mesh To Meen Rashi Bhavishya Today
१० एप्रिल पंचांग: तूळ, कर्कसहित ‘या’ राशी आज धनाढ्य होऊन इतरांनाही करतील मदत; आजचे १२ राशींचे भविष्य वाचा
7th April Panchang Masik Shivratri Mesh To Meen Daily Horoscope
७ एप्रिल पंचांग: एप्रिलची शिवरात्री मेष ते मीन राशींपैकी कुणाला देईल भोलेनाथांची कृपा; तुमच्या कुंडलीत काय लिहिलंय?