Guru Gochar 2024: ज्योतिषशास्त्रानुसार मे महिना अत्यंत खास असून या महिन्याच्या सुरुवातीलाच देवगुरू बृहस्पतींचे राशीपरिवर्तन होणार आहे. १ मे रोजी गुरू ग्रह मेष राशीतून वृषभ राशीत प्रवेश करणार आहेत. ज्योतिषशास्त्रात गुरु ग्रहाला ज्ञान, यश, धन आणि विद्येचा कारक ग्रह मानले जाते. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत गुरु ग्रह मजबूत स्थितीत असतो ती व्यक्ती नेहमी कतृत्ववान आणि विद्वान असते.

गुरु ग्रहाच्या वृषभ राशीतील प्रवेशाने पुढील संपूर्ण एक वर्ष १२ राशीच्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यात अनेक शैक्षणिक बदल होतील. यातील काही राशींच्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ उत्तम यश मिळवून देणारा असेल तर काही राशीच्या विद्यार्थ्यांना कठोर परिश्रम घ्यावे लागतील.

liberal arts education benefit
चौकट मोडताना : खर्चिक तरीही आनंद देणारे शिक्षण
Important notice given by CBSE to schools Will prevent increasing marks Pune
सीबीएसईची शाळांना दिली महत्त्वाची सूचना… वाढते गुण रोखणार?
vaishakh amavasya 2024
Vaishakh Amavasya 2024 : वैशाख अमावस्येच्या दिवशी शुभ संयोग, ‘या’ पाच राशींवर होणार देवी लक्ष्‍मीची कृपा
probable dates for cet soon announced by state common entrance test cell
एमएचटी-सीईटीचा निकाल कधी? विविध प्रवेश परीक्षांच्या निकालाच्या संभाव्य तारखा जाहीर
nashik, Dr Vijay Bhatkar, Dr Vijay Bhatkar in nashik, mahiravani village, Sant Shree Dnyaneshwar Mauli Child Sanskar Camp,
परम संगणक निर्मितीला किती खर्च आला ? विद्यार्थ्यांची जिज्ञासा अन् डॉ. विजय भटकर यांचे हितगूज
meditation, Kanyakumari rock memorial, prime minister narendra modi
मोदींच्या नव्या ध्यानमग्न छायाचित्राच्या प्रतीक्षेत…
readers comments on loksatta editorial
लोकमानस : सरकारचे अवैज्ञानिक बाबींना प्रोत्साहन
Maharashtra Board 10th Result 2024
SSC Result 2024: दहावीच्या निकालाआधी विद्यार्थ्यांसाठी खूशखबर; विज्ञानाच्या पेपरमध्ये ‘या’ प्रश्नाला मिळणार पूर्ण मार्क

१२ राशीच्या विद्यार्थ्यांसाठी नवे बदल

मेष

मेष राशीचे विद्यार्थ्यी या काळात चांगला अभ्यास करतील, ज्यामुळे ते शैक्षणिक क्षेत्रातील आव्हानांवर मात करतील.

वृषभ

वृषभ राशीच्या विद्यार्थ्यांसाठी देखील हा काळ खूप उत्तम असेल. संशोधन क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी अनेक संधी उपलब्ध होतील.

मिथुन

मिथुन राशीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरमध्ये खूप यश मिळेल. जितके मिळेल तितेक ज्ञान मिळवा.

कर्क

कर्क राशीच्या विद्यार्थ्यांसाठी देखील हा काळ उत्तम आहे परंतु अभ्यास करण्याकडे अधिक लक्ष द्यावे.

सिंह

सिंह राशीच्या विद्यार्थ्यांना या काळात स्पर्धा परिक्षांमध्ये यश मिळेल. केवळ अभ्यासाकडे दुर्लक्ष करु नये. अतिउत्साह दाखवू नये.

कन्या

कन्या राशीच्या विद्यार्थ्यांना कोणत्याही क्षेत्रात यश मिळेल. आपल्या ध्येयाकडे लक्ष केंद्रित करावे.

हेही वाचा : Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला शुभ योग; ‘या’ वेळेत करा नव्या वस्तूंची खरेदी; वाचा शुभ मुहूर्त, तिथी

तूळ

तूळ राशीच्या विद्यार्थ्यांना कलाक्षेत्रात खूप यश मिळेल. कला, संगीत क्षेत्रातील विद्यार्थ्यांना विदेशात जाण्याची संधी मिळेल.

वृश्चिक

वृश्चिक राशीच्या विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षेत यश मिळेल. फक्त परिश्रम घेण्यात मागे राहू नका.

धनु

धनु राशीच्या ज्या विद्यार्थ्यांना परदेशात जाऊन शिक्षण घ्यायचे आहे त्यांना या काळात अनेक सुवर्ण संधी प्राप्त होतील. परंतु खूप मेहनत घ्यावी लागेल.

मकर

या काळात मकर राशीच्या विद्यार्थांची बुद्धिमत्ता आणि ज्ञानाचा विकास होईल शिवाय नशीबही तुमच्या पाठीशी असेल.

कुंभ

कुंभ राशीच्या विद्यार्थांना खूप मेहनत केल्यावरच यश मिळू शकेल. वाईट संगतीपासून दूर राहावे.

मीन

मीन राशीच्या विद्यार्थांचे या काळात नशीब उत्तम साथ देईल. मन लावून अभ्यास करा.