1. मेष : जवळचा प्रवास कराल. हातातील कामाला गती येईल. मानसिक चांचल्या जाणवेल. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. मनाची संवेदनशीलता दाखवाल.
  2. वृषभ : कौटुंबिक जिव्हाळा वाढेल. सर्वांशी गोडीने वागाल. अपचनाचा त्रास जाणवेल. योग्य संधीची वाट पहावी. मानसिक स्थैर्य जपावे.
  3. मिथुन : एकाचवेळी अनेक कामात हात घालू नका. जोडीदाराच्या विचारांचे कौतुक कराल. मनातील निराशा दूर सारावी. चुकीच्या विचारांना मनात थारा देवू नका.
  4. कर्क : जोडीदाराची प्राप्ती वाढेल. मुलांच्या कारवायांवर लक्ष ठेवावे. नसते साहस करायला जाऊ नका. जुगारातून नुकसान होण्याची शक्यता आहे. चोरांपासून सावध राहावे.
  5. सिंह : कौटुंबिक प्रश्न मार्गी लावावेत. तुमचे संपर्क अधिक दृढ होतील. कुशलतेने व्यवहार करावा. मनातून तिरस्कार काढून टाकावा. व्यापारात प्रगती करता येईल.
  6. कन्या : भावंडांशी मतभेद संभवतात. हातातील अधिकार योग्यवेळी वापरावेत. प्रवासात काळजी घ्यावी. हातापायाला किरकोळ इजा संभवते. छुप्या शत्रूंवर विजय मिळवाल.
  7. तूळ : आर्थिक व्यवहार जपून करावेत. मौल्यवान वस्तू जपून वापराव्यात. हितशत्रूंचा त्रास संभवतो. मत्सराला बळी पडू नका. कौटुंबिक शांतता जपावी.
  8. वृश्चिक : उष्णतेचे त्रास संभवतात. अडचणीतून मार्ग काढावा. उगाच कोणाशीही शत्रुत्व घ्यायला जाऊ नका. सारासार विचार करण्यावर भर द्यावा. महत्त्वाकांक्षा वाढीस लागेल.
  9. धनू : सामाजिक बांधीलकी जपावी लागेल. घरात जबाबदारीने वागाल. जुने प्रश्न पुन्हा उभे राहतील. पारंपरिक कामात लक्ष घालावे लागेल. जोडीदाराचा लाडिक हट्ट पुरवाल.
  10. मकर : कामाचे गणित जुळवावे लागेल. आरोग्याकडे लक्ष द्यावे. पत्नीच्या आरोग्याची काळजी घ्यावी. कामानिमित्त घरापासून दूर जावे लागेल. काही बदल स्वीकारावे लागतील.
  11. कुंभ : मनातील विचारांना आवर घालावा लागेल. बौद्धिक दिमाख दाखवाल. स्मरणशक्तीचा चांगला उपयोग होईल. हजरजबाबीपणे उत्तर द्याल. योग्य तर्क बांधावा.
  12. मीन : बढतीसाठी प्रयत्न करावेत. वरिष्ठांना खुश ठेवावे लागेल. अधिकारी व्यक्तींचा सल्ला घ्यावा. कलेसाठी वेळ काढावा. सर्वांशी हसून-खेळून वागाल.

— ज्योतिषी विद्याधर करंदीकर