मेष:- फक्त आवडत्या गोष्टी करण्यावर भर द्यावा. गैरसमजापासून दूर राहावे. तुमच्यावर जोडीदाराचा पगडा राहील. प्रवासाचा योग येईल. स्पर्धेत विजयी व्हाल. वृषभ:- छुप्या शत्रूंचा त्रास होऊ शकतो. तब्बेतीची वेळेवर काळजी घ्यावी. लोकोपवादाकडे दुर्लक्ष करावे. हाताखालील लोकांकडे लक्ष ठेवावे. बाहेरील अन्नपदार्थ टाळावेत. मिथुन:- मुलांची प्रगती दिसून येईल. गोष्टी मानाजोग्या घडून येतील. लॉटरी, जुगार यातून कमाई करता येईल. कारमणुकीवर पैसे खर्च कराल. कामात स्त्रियांची मदत मिळेल. कर्क:- गृहसौख्याकडे लक्ष द्यावे. घरगुती वस्तू खरेदी कराल. कामाची धावपळ राहील. मनाची एकाग्रता साधावी लागेल. कसलीही घाई उपयोगाची नाही. सिंह:- जवळचा प्रवास होईल. लेखणीची धार दिसून येईल. वाचनात मन रमून जाईल. महात्त्वाकांक्षा वाढीस लागेल. किरकोळ जखमांकडे दुर्लक्ष करू नका. कन्या:- कौटुंबिक खर्च वाढेल. पैशाच्या बाबतीत सारासार विचार करून खर्च करावा. अचानक धनलाभ संभवतो. अतिविचार करणे टाळावे. तिखट व तामसी पदार्थ चाखाल. तूळ:- दृढनिश्चय करावा लागेल. भांडणातून गैरसमज वाढू शकतात. तुमच्या काही विचारांना विरोध होऊ शकतो. स्नायू धरणे यांसारखे त्रास जाणवू शकतात. कामाच्या ठिकाणी शांत रहावे. वृश्चिक:- नसत्या चिंतानी ग्रासून जाऊ नका. झोपेचा त्रास जाणवू शकतो. पायाची दुखणी बळावू शकतात. चहाडखोर व्यक्तींपासून दूर राहावे. सामाजिक जाणिव ठेवून वागावे. धनु:- मुलांकडून आनंद वार्ता मिळतील. नवीन मित्र जोडाल. कष्टाला घाबरून जाऊ नका. पुरेशी झोप घ्यावी. फसवणुकीपासून सावध राहावे. मकर:- व्यावसायिक उत्कर्ष साधण्याचा प्रयत्न कराल. घरातील वातावरण प्रसन्न राहील. आत्मविश्वासाच्या बळावर काम कराल. तुमचा योग्य तो आदर राखला जाईल. धार्मिक स्थळांना भेट द्याल. कुंभ:- भावंडांची मदत होईल. लिखाणाला चांगली प्रसिद्धी मिळेल. प्रवासात काळजी घ्यावी. वेगावर नियंत्रण ठेवावे. कमिशन मधून फायदा मिळेल. मीन:- आवडीचे पदार्थ खाल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. जवळचे नातेवाईक भेटतील. गैरसमजाला बळी पडू नका. अंगची कला जोपासावी. – ज्योतिषी विद्याधर करंदीकर