• मेष:-
    कारमुकीच्या कार्यक्रमात भाग घ्याल. जोडीदाराची बाजू समजून घ्यावी. गप्पांमधून संवाद साधावा. हातातील कामात यश येईल. मानसिक शांतता लाभेल.
  • वृषभ:-
    घरातील वातावरणात रमाल. कौटुंबिक कामात वेळ जाईल. नातेवाईकांचा गोतावळा जमेल. जोडीदाराची प्राप्ती वाढेल. वैवाहिक सौख्य वाढेल.
  • मिथुन:-
    प्रवासाची हौस पूर्ण होईल. प्रगल्भ विचार मांडाल. चांगले पुस्तक वाचायला मिळेल. भावंडांची मदत मिळेल. मैत्रीत गोडवा ठेवावा.
  • कर्क:-
    कौटुंबिक अधिकार गाजवाल. घरात एखादा छोटा कार्यक्रम होईल. नातेवाईकांशी सलोख्याचे संबंध वाढवा. मित्रांशी वाद घालू नका. आवडीचीच कामे कराल.
  • सिंह:-
    तुमचे व्यक्तिमत्व खुलून येईल. गुरुकृपेचा लाभ घ्यावा. भावंडांशी मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. लहान प्रवासात सतर्कता ठेवावी. मित्रांची बाजू जाणून घ्यावी.
  • कन्या:-
    मनाची चलबिचलता दूर करावी. चोरांपासून सावध राहावे. कामात कसलीही घाई करू नका. खर्चावर नियंत्रण ठेवा. हातातील कला जोपासावी.
  • तूळ:-
    सारासार विचार करूनच कामे करावीत. कामातील लहान सहान चुका दुरुस्त कराव्यात. क्षुल्लक गोष्टींवरून वाद घालू नका. किरकोळ जखमा त्रासदायक ठरतील. कामात चंचलता आणू नका.
  • वृश्चिक:-
    कामाचा ताण वाढू शकतो. दगदग वाढल्याने थकवा जाणवेल. काही कामांमुळे मानसिक त्रास वाढू शकतो. चिकाटी सोडू नका. अडचणींवर मात करता येईल.
  • धनु:-
    झोपेची तक्रार जाणवेल. क्षणिक आनंदाने नाराज होऊ नका. खर्चाचे योग्य नियोजन करावे. काही गोष्टी उघडपणे बोलू नका. शिस्तीचा बडगा करू नका.
  • मकर:-
    कामाची व्याप्ती वाढविण्याचा विचार करावा. वशिल्याने कामे करण्याचा प्रयत्न कराल. अधिकारी व्यक्तींची ओळख होईल. चांगली सांगत लाभेल. कामात स्त्री वर्गाचा हातभार लागेल.
  • कुंभ:-
    वरिष्ठांना नाराज करू नका. प्रवासात सावधगिरी बाळगावी. क्षुल्लक वादात लक्ष घालू नका. काही कामात अधिक वेळ खर्च करावा लागेल. मनात योजलेल्या गोष्टी पूर्ण होतील.
  • मीन:-
    कामातून समाधान मिळेल. नातेवाईकांच्या भेटीने आनंदी असाल. मुलांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. काही गोष्टी जुळवून आणाव्या लागतील. मनाला उगाचच चिंता लागून राहील.

    – ज्योतिषी विद्याधर करंदीकर