Saturn Transit 2024: ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या राशीपरिवर्तनासोबत त्यांचे नक्षत्र परिवर्तनदेखील होते. शनि ग्रहाला न्याय आणि कर्माची देवता म्हणून ओळखले जाते. २०२४ मध्ये शनि कुंभ राशीत विराजमान असेल. ज्योतिषशास्त्रानुसार १२ मे रोजी शनिने पूर्वा भाद्रपद नक्षत्राच्या द्वितीय चरणात प्रवेश केला होता आणि १८ ऑगस्टपर्यंत या चरणात उपस्थित असेल व त्यानंतर त्याच नक्षत्राच्या प्रथम चरणात प्रवेश करेल. त्यानंतर शनि ३ ऑक्टोबर रोजी शतभिषा नक्षत्राच्या चौथ्या चरणात प्रवेश करेल.

ज्योतिषशास्त्रानुसार शनिची ९७ दिवसांची ही चाल काही राशींच्या व्यक्तींसाठी लाभकारी सिद्ध होईल. यामुळे या राशींच्या लोकांची आर्थिक परिस्थिती उत्तम राहील.

कन्या

शनिचे हे नक्षत्र परिवर्तन कन्या राशीच्या लोकांसाठी खूप लाभकारी सिद्ध होईल. अडकलेली कामे पूर्ण होतील. या काळात तुमच्या आयुष्यातील अनेक संकटांवर तुम्ही सहज मात कराल, धन-संपत्तीचे सुख मिळेल. तसेच उत्पन्नाचे नवे स्रोत मिळतील. समाजात मानसम्मान वाढेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील. वैवाहिक जीवनात प्रेम वाढेल. या काळात भाग्याची पुरेपूर साथ मिळेल. नवे वाहन, घर, जमीन खरेदी करू शकता. सगळीकडे तुमचे वर्चस्व असेल.

वृश्चिक

वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठीदेखील शनिचे हे नक्षत्र परिवर्तन खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात नोकरदार व्यक्तींना प्रमोशन मिळेल. कुटुंबात सुख-शांतीचे वातावरण असेल. सर्वांसोबत चांगले संबंध निर्माण होतील आणि जुने वाद मिटतील. व्यवसायात आकस्मिक धनलाभ होतील. दूरचे प्रवास घडतील. तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना हवे तसे यश मिळेल.

हेही वाचा: पैसाच पैसा! गुरू ग्रहाच्या कृपेने ६ जूनपासून या चार राशींच्या लोकांना मिळणार सुख, समृद्धी अन् संपत्ती

कुंभ

कुंभ राशीच्या व्यक्तींसाठीदेखील शनिचे नक्षत्र परिवर्तन खूप खास ठरणार आहे. हे ९७ दिवस तुमच्या आयुष्यात अनेक बदल घडवून आणतील. न्यायालयीन प्रकरणात यश मिळेल. नव्या कामाची सुरुवात होईल. कामातील अडथळे दूर होतील. या राशीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक स्पर्धेत यश मिळेल. यावेळी तुमचे व्यक्तिमत्त्व सुधारेल. कामाच्या ठिकाणी दिले गेलेले लक्ष्य पूर्ण कराल. या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)