Today Rashi Bhavishya, 23 September 2022 : जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.

मेष (Aries Horoscope Today ):-

29 April Panchang Daily Marathi Rashi Bhavishya
२९ एप्रिल पंचांग: शुक्राच्या नक्षत्रात सोमवार होणार वैभवदायी; आज लक्ष्मी मेष ते मीनपैकी ‘या’ राशींना देणार बक्कळ लाभ
21st April Panchang Daily Marathi Horoscope Sarvarth Siddhi Yog
२१ एप्रिल पंचांग: आजचा सर्वार्थ सिद्धी योग १२ पैकी ‘या’ राशींना देईल मान व धन; रविवारी कुणाचं नशीब चमकणार?
11th April 2024 Panchang Guruvaar Marathi Rashi Bhavishya
११ एप्रिल, गुरुवार पंचांग: आज आयुष्यमान, सौभाग्य योग; तुमच्या राशीच्या कुंडलीत आज कोणत्या रूपात लाभेल गौरी कृपा?
10th April 2024 Panchang Mesh To Meen Rashi Bhavishya Today
१० एप्रिल पंचांग: तूळ, कर्कसहित ‘या’ राशी आज धनाढ्य होऊन इतरांनाही करतील मदत; आजचे १२ राशींचे भविष्य वाचा

अतिविचार करू नका. जुने आर्थिक मुद्दे मार्गी लागतील. स्थावर, शेती विषयक प्रश्न मार्गी लागतील. संध्याकाळ नंतर दिवस चांगला जाईल. कौटुंबिक सहयोग उत्तम लाभेल.

वृषभ (Taurus Horoscope Today ):-

मुलांच्या अपेक्षा पूर्ण होतील. उधारी वसूल होईल. नवीन योजनेकडे लक्ष लागून राहील.  स्थान बदलाची योजना यशस्वी होईल. कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील. मनातील इच्छा पूर्ण होईल.

मिथुन (Gemini Horoscope Today ):-

आपल्या बोलण्यात स्पष्टता ठेवा. मित्रांना मदत कराल. हातातील कलेला वाव द्यावा. आपल्या आवडीची कामे करायला मिळतील. व्यवसायासंबंधी काही नवीन योजना स्फुरतील.

कर्क (Cancer Horoscope Today ):-

जुनी येणी वसूल होतील. बोलण्यातून लोकांना दुखवू नका. कामात मनापासून प्रयत्न करा. कार्यालयीन वातावरण अनुकूल राहील. मित्रांचे उस्फूर्त सहकार्य लाभेल.

सिंह (Leo Horoscope Today ):-

बोलण्यातून लोकांचा विश्वास संपादन कराल. कौटुंबिक कामे योग्य पद्धतीने कराल. दिनक्रम व्यस्त राहील. जोडीदाराशी मतभेदाची शक्यता. वरिष्ठ अधिकारी समस्या निर्माण करू शकतात.

कन्या (Virgo Horoscope Today ):-

मित्रांवर पैसे खर्च कराल. इतरांच्या तुमच्याकडून अपेक्षा वाढतील. व्यावहारिक सावधानता बाळगावी. घरात शुभ कार्याविषयी चर्चा कराल. दिवस उत्तम जाईल.

तूळ (Libra Horoscope Today ):-

बोलण्यात कडवटपणा आणू नका. कामात स्त्रियांची मदत मिळेल. जोडीदाराच्या अपेक्षा वाढतील. कामात काहीसे परिवर्तन शक्य. कामाच्या ठिकाणी असणारे वाद संपुष्टात येतील.

वृश्चिक (Scorpio Horoscope Today ):-

धार्मिक कामासाठी पैसे खर्च होतील. लोक आपला सल्ला मानतील. आजचा दिवस चांगला जाईल. स्पर्धेला सक्षमपणे सामोरे जा. कामावर अधिक लक्ष केन्द्रित करावे.

धनू (Sagittarius Horoscope Today ):-

अति बोलू नका. घरगुती कामात संपूर्ण दिवस जाईल. दैनंदिन कामातील बदल लाभदायक ठरेल. हातातील संधीचे सोने करावे. रागावर नियंत्रण ठेवावे.

मकर (Capricorn Horoscope Today ):-

जुनी रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. दिवस सामान्य राहील. गरज असेल तरच घराबाहेर पडा. मुलांसंदर्भात काही निर्णय घ्याल. नियमांचे पालन करा.

कुंभ (Aquarius Horoscope Today ):-

इच्छित प्रश्नाचे उत्तर मिळेल. मोसमी आजारांपासून काळजी घ्यावी. कुटुंबासमवेत वेळ घालवावा. आहारावर नियंत्रण ठेवावे. तुमची प्रतिष्ठा वाढीस लागेल.

मीन (Pisces Horoscope Today ):-

घरात कलहाचे प्रसंग येऊ देऊ नका. आपल्या रागावर नियंत्रण ठेवावे. क्षुल्लक गोष्टींना फार महत्त्व देऊ नका. प्रसंगांना संयमाने सामोरे जावे. अनाठायी खर्च संभवतात.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर