scorecardresearch

Premium

१६ ऑक्टोबरला मंगळ ग्रह करणार मिथुन राशीमध्ये प्रवेश; ‘या’ तीन राशींच्या लोकांना होऊ शकतो आकस्मिक धनलाभ

ज्योतिषशास्त्रानुसार मंगळाच्या राशी परिवर्तनाचा प्रभाव सर्व राशींवर पडेल.

financial gain
या राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया. (File Photo)

सर्व ग्रहांचे सेनापती अशी उपाधी मिळवून पराक्रमी मंगळ देव १६ ऑक्टोबरला आपली राशी सोडून बुध देवाच्या मिथुन राशीमध्ये प्रवेश करणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार मंगळाच्या राशी परिवर्तनाचा प्रभाव सर्व राशींवर पडेल. मात्र अशा तीन राशी आहेत, ज्यांना हे परिवर्तन अधिक फायदेशीर ठरू शकते. या राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.

  • मिथुन

१६ ऑक्टोबरपासून या राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात. या काळात तुमचे उत्पन्न चांगले वाढू शकते. तसेच, व्यवसायात चांगला फायदा होऊ शकतो. तसेच, तुमची आर्थिक बाजूही मजबूत असेल. यासोबतच या काळात तुमची कार्यशैलीही सुधारेल, ज्यामुळे ऑफिसमध्ये तुमची प्रशंसा होऊ शकते. त्याबरोबरच वरिष्ठांचे सहकार्य मिळू शकते. दुसरीकडे, मंगळ तुमच्या सातव्या घराचा स्वामी आहे. त्यामुळे यावेळी तुम्हाला तुमच्या जीवनसाथीचा पूर्ण पाठिंबा मिळेल. तसेच, तुम्हाला भागीदारीच्या कामात यश मिळू शकते किंवा तुम्ही भागीदारीचे काम देखील सुरू करू शकता. ज्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल.

Surya Grahan 2023
२०२३ वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण ‘या’ राशींच्या नशिबात घेऊन येणार सोनेरी पहाट? अचानक बक्कळ धनलाभाची शक्यता
Till 31 December These Three Rashi to get Huge Money Bank Balance And Datta Guru Krupa Match Your Kundali With Lucky Sign
२०२३ चे उर्वरित दिवस ‘या’ राशींच्या नावे! ज्योतिषशास्त्रानुसार, गुरूकृपा होऊन तुम्हीही होणार का धनी व सुखी?
Daily Horoscope 3 october 2023
Daily Horoscope: वृश्चिकच्या लोकप्रियतेमध्ये वाढ होणार तर ‘या’ राशीच्या व्यक्तींना अचानक धनलाभाची शक्यता, पाहा तुमचे भविष्य
Budhaditya and Bhadra Rajayog
बुधादित्य आणि भद्र राजयोग एकत्र बनल्याने ‘या’ राशींना सोन्याचे दिवस? व्यवसायात नफा मिळून होऊ शकते उत्पन्नात वाढ
  • कर्क

या संक्रमण कालावधीत तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते किंवा तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला प्रमोशन मिळू शकते. तसेच नवीन व्यावसायिक संबंध निर्माण होऊ शकतात. या काळात व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो. मालमत्ता आणि वाहन व्यवहारातही लाभ होण्याची संभावना आहे. त्याच वेळी, व्यवसायात एक मोठा नवीन करार देखील अंतिम केला जाऊ शकतो. व्यवसायातील गुंतवणुकीसाठी हा काळ तुमच्या हिताचा आहे. यावेळी, तुम्ही काही कामांमध्ये धोका देखील पत्करू शकता जे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

  • सिंह

या काळात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल असे दिसते. त्याचबरोबर अनेक दिवसांपासून रखडलेले कामही पूर्ण होणार आहे. सरकारी निविदा काढू इच्छिणाऱ्यांसाठी वेळ चांगली आहे. आपण व्यवसायाच्या संदर्भात सहलीवर देखील जाऊ शकता. जे भविष्यात तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना यावेळी नशिबाची पूर्ण साथ मिळेल. या काळात अध्यात्मात तुमची आवड वाढू शकते. तसेच, तुम्ही कोणत्याही परीक्षेत यश मिळवू शकता.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mars will enter gemini on october 16 the people of these three zodiac signs can get sudden financial gains pvp

First published on: 03-09-2022 at 20:41 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×