People With Letter P Names:  एखाद्या व्यक्तीचे नाव ही त्याची ओळख असते. ज्योतिषशास्त्रात व्यक्तीचे नाव कोणत्या अक्षराने सुरू होते, यालाही महत्त्व देण्यात आले आहे. त्यानुसार, त्या व्यक्तीचा स्वभाव, व्यक्तिमत्त्व, यश, प्रगती, धन-वैभव याचा अंदाज बांधला जाऊ शकतो. व्यक्तीच्या नावाच्या पहिल्या अक्षराच्या आधारे त्याच्या व्यक्तिमत्त्वाचे गुण आणि माणूस शोधले जाऊ शकते. तर आज आम्ही तुम्हाला अशाच P या इंग्रजी अक्षरावरून नाव असलेल्या लोकांबद्दल सांगणार आहोत, जे आयुष्यात खूप पुढे जातात आणि त्यांना प्रत्येक क्षेत्रात नशिबाची साथ मिळते. तुमचेही नाव जर P या इंग्रजी अक्षरावरून सुरू होत असेल तर जाणून घ्या कशा असतात या व्यक्ती? या व्यक्तीचा स्वभाव कसा असतो?..

P अक्षरापासून सुरु असलेल्या नावाचे लोक कसे असतात?

  • भावनिकरित्या हळव्या मनाचे

ज्या लोकांची नावे इंग्रजीतील P अक्षराने सुरू होतात या व्यक्ती थोड्याशा हट्टी असतात. बऱ्याचदा आपल्या मनाला पटेल अशाच गोष्टी करतात, असे मानले जाते. या लोकांना कोणतेही काम करायचे असेल तर ते मागे पाहत नाही तो काम पूर्ण करण्यासाठी ते कोणतीच कसर सोडत नाहीत. हे व्यक्ती दुसरे आपल्याबद्दल काय विचार करतात याबद्दल नेहमी सतर्क असतात. दुसऱ्यांसाठी काही ना काही करत असतात. नेहमी हसमुख अशा या व्यक्ती असतात. यांच्यासाठी त्यांचे स्टेटस खूप महत्त्वाचे असते. तसेच ते भावनिकरित्या हळव्या मनाचे असतात.

lokrang article, book review, ekla chalo re, Autobiographical book, sanjeev sabnis, loksatta,
सकारात्मक आत्मकथन
Personality Traits
Personality Traits : कोणत्याही महिन्याच्या १, १०, १९ आणि २८ या तारखेला जन्मलेल्या लोकांचा स्वभाव कसा असतो?
Why the people born in the April month are so different from others Know their nature and personality
एप्रिल महिन्यात जन्मलेली माणसं का असतात इतरांपेक्षा वेगळे? जाणून घ्या त्यांचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्व
It is necessary to change the mentality with effort to make the work perfect
जिंकावे नि जगावेही : मी ‘परिपूर्ण’…?

(हे ही वाचा : Name Astrology: ‘या’ अक्षराने नाव सुरु होणारी लोकं असतात खूप भाग्यशाली? धन-वैभवासह मिळू शकते अपार यश )

  • वैवाहिक जीवन सुखद

ज्या लोकांची नावे इंग्रजीतील P अक्षराने सुरू होते त्यांचे वैवाहिक जीवन सुखद असते, या लोकांना गुड लुकिंग आणि स्मार्ट लाईफ पार्टनर हवा असतो. पण तसा जोडीदार त्यांना मिळत नाही. तर दुसरीकडे P अक्षराने नाव सुरु असणारे लोकं प्रेमाच्या बाबतीत खूपच विश्वासू मानले जातात. कारण या अक्षराचे व्यक्ती हे रोमँटिक व खूप विश्वासू असतात. या लोकांना त्यांचे खरे प्रेम कधीच मिळत नाही, परंतु त्यांचे लग्न ज्या व्यक्तीशीही होते, त्यांना ते खूप आनंदी व सुखी ठेवतात, असे मानले जाते.

  • कठोर परिश्रम करणारे

ज्या लोकांची नावे इंग्रजीतील P अक्षराने सुरू होते, जर आपण यांच्या करिअरबद्दल बोललो, तर P नावाच्या लोकांचे जीवन करिअरबाबत चढ-उतारांनी भरलेले असते. हे लोक अनेकदा त्यांचे करिअर निवडण्यात चुका करतात, ज्यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, परंतु या लोकांना हे देखील माहित असते की, त्यांच्या सर्व समस्या कठोर परिश्रमाने कसे सोडवायचे. P नावाच्या लोकांना स्वतःचा व्यवसाय करायला आवडते.

(हे ही वाचा : Numerology: ‘या’ तारखांना जन्मलेले लोकं असतात धनवान? अंकशास्त्रात काय दडलंय ते एकदा पाहाच)

  • नव्या गोष्टी शिकण्याची आवड

हे लोक खर्च करण्यामध्येही कधीही कंजुसीपणा करत नाहीत. थोडक्यात काहींशा खर्चिकच असतात. सतत काहीना काही महागडी वस्तू खरेदी करण्याची इच्छा असते आणि ते तशा वस्तू खरेदी करतातच. या लोकांना सतत काहीना काहीं नवनव्या गोष्टी शिकण्याची आवड असते. आणि हे बुद्धिमानी असतात. या व्यक्तींमध्ये भरपूर आत्मविश्वास असतो. या आत्मविश्वासाच्या बळावरच त्या यश आणि प्रगती साध्य करतात. अशा व्यक्तींना अचानक भाग्यासह नशिबाची साथ मिळते आणि ते यशस्वी ठरतात, असे मानले जाते.

(टीप: वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीच्या आधारे लिहिण्यात आला आहे)