Shani Sade Sati In 2023: कर्माचे फळ देणारे, न्याय देवता शनि हे नवग्रहांमधील सर्वात कमी वेगाने मार्गक्रमण करणाऱ्या ग्रहांपैकी एक आहेत. यामुळेच शनिदेव प्रत्येक राशीत तब्बल साडेसात वर्ष विराजमान असतात. जेव्हा शनि एका राशीतून दुसऱ्या राशीत मार्गी होण्याच्या तयारीत असतात तेव्हा मूळ राशीतील प्रभाव कमी असून साडे सतीचा दुसरा टप्पा किंवा धैय्या कालावधी सुरु होतो. शनीच्या स्थितीनुसार येत्या काळात कोणत्या राशीत साडे सातीचा प्रभाव कधी सुरु होणार व कधी संपणार हे आपण आज पाहणार आहोत..

यंदा ज्योतिषीय गणनेनुसार शनि ग्रहणे १२ जुलै रोजी मकर राशीत प्रवेश घेतला आहे. तर २३ ऑक्टोबरला शनि मकर राशीतून वक्री झाले आहेत, २०२३ या वर्षात १७ जानेवारी रोजी शनिचा कुंभ राशीत प्रवेश होणार आहे, यानंतर थेट २०२५ मध्ये शनि मकर राशीत पुन्हा प्रवेश घेणार आहे. अर्थात शनि मार्गक्रमणाचा १२ राशींवर प्रभाव आढळून येऊ शकतो.

Shukra Nakshatra Parivartan
४८ तासांनी ‘या’ ४ राशींच्या धन व बँक बँलेन्समध्ये होणार बक्कळ वाढ? शुक्रदेवाच्या नक्षत्र बदलामुळे नशीब अचानक पालटणार
shukra
धनाचा दाता शुक्र होणार अस्त, ‘या’ राशींना ७५ दिवस काळजी घ्यावी लागेल, होऊ शकते धनहानी
Shani Nakshtra transit will be lucky for these zodiac signs will get so much money and will become rich
Shani Nakshtra : सहा महिन्यापर्यंत शनिच्या कृपेमुळे या राशींना मिळणार बक्कळ पैसा, होऊ शकतात श्रीमंत
Sun Transit In Mesh Rashi
काही तासांत सुर्य करेल मेष राशीत प्रवेश! पाहा, कोणत्या तीन राशींचे नशीब उजळणार? मिळणार भरपूर पैसा अन् प्रसिद्धी

१२ राशींमध्ये कोणत्या वर्षात दिसणार शनि साडे सातीचा प्रभाव?

मेष राशीत शनिची साडे साती

२९ मार्च २०२५ ते ३१ मे २०३२

वृषभ राशीत शनिची साडे साती

३ जून २०२७ ते १३ जुलै २०३७

मिथुन राशीत शनिची साडे साती

८ ऑगस्ट २०२९ ते २७ ऑगस्ट २०३६

कर्क राशीत शनिची साडे साती

३१ मे २०३२ ते २२ मे २०३८

सिंह राशीत शनिची साडे साती

१३ जुलै २०३४ ते २९ जानेवारी २०४१

कन्या राशीत शनिची साडे साती

२७ ऑगस्ट २०३६ ते १२ डिसेंबर २०४१

तूळ राशीत शनिची साडे साती

२२ ऑक्टोबर २०३८ से ८ डिसेंबर २०४६

वृश्चिक राशीत शनिची साडे साती

२८ जानेवारी २०४१ से ३ डिसेंबर २०४९

धनु राशीत शनिची साडे साती

१२ जुलै २०२२ मध्ये जेव्हा शनी मकर राशीत वक्री झाले होते तेव्हापासून धनु राशीची साडे साती सुरु आहे. यानंतर १७ जानेवारी २०२३ मध्ये धनु राशीला शनीच्या साडे सातीतुन मुक्ती मिळू शकते. नंतर १२ डिसेंबर २०४३ ते ३ डिसेंबर २०४९ दरम्यान धनु पुन्हा शनीच्या प्रभाव कक्षेत येणार आहे.

मकर राशीत शनिची साडे साती

२६ जानेवारी २०१७ मध्ये मकर राशीत शनिची साडेसाती सुरु झाली होती जी आता येत्या वर्षात २९ मार्च २०२३ला संपणार आहे.

कुंभ राशीत शनिची साडे साती

कुंभ राशीत शनिचे साडेसाती २४ जानेवारी २०२२ ला सुरु झाली असून ३ जून २०२७ पर्यंत कायम असणार आहे तर २३ फेब्रुवारी २०२८ ला शनिचा कुंभ राशीतील प्रभाव पूर्णतः संपुष्टात येईल.

२०२२ चा डिसेंबर ‘या’ राशींसाठी घेऊन येऊ शकतो श्रीमंती; पाहा तुमच्या नशिबात आहे का अपार धनलाभ व प्रगती?

मीन राशीत शनिची साडे साती

२९ एप्रिल २०२२ ला शनी साडेसाती मीन राशीत सुरु झाली होती व २९ मार्च २०२५ ला या राशीला मुक्ती मिळणार आहे. २०३० पर्यंत शनिचा प्रभाव मीन राशीत कायम राहू शकतो.

(टीप: वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारित आहे)