Jupiter Combust in Taurus: देवगुरु बृहस्‍पतिच्या स्थितीत यावर्षी अनेक मोठे बदल होत आहेत. काही राशींच्या लोकांसाठी याचा मोठा फायदा दिसून येतं आहे. गुरु गोचरमुळे काही राशींच्या हातात पैसा खेळणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार गुरु म्हणजे बृहस्पतिला देवगुरु असं म्हटलं जातं. आज शुक्रवारी बृहस्पतिचा वृषभ राशीतच अस्त होणार आहे. गुरूच्या या अस्त स्थितीमुळे या ५ राशींना फायदा होईल, चला जाणून घेऊया त्या कोणत्या राशी आहेत.

‘या’ राशींना होणार फायदा?

मेष राशी

बृहस्पतिच्या अस्तामुळे मेष राशीच्या लोकांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. तुमच्यासाठी प्रगती आणि यशाचे मार्ग खुले होऊ शकतात. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. व्यवसायात नफा मिळण्याची चांगली शक्यता आहे. या राशीच्या नोकरदारांना चांगली वेतनवाढ मिळू शकते. 

मिथुन राशी 

बृहस्पतिच्या अस्तामुळे मिथुन राशीच्या लोकांना चांगला लाभ मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला व्यवसायात अनेक चांगल्या संधी मिळू शकतात. उत्पन्न वाढवण्याचे नवीन मार्ग निर्माण होऊ शकतात. अविवाहित लोकांना यावेळी लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढू शकते.

(हे ही वाचा : १०० वर्षांनी अक्षय्य तृतीयेला शुभ योग; ‘या’ राशींचे नशीब सोन्याहून अधिक चमकणार? मिळू शकते कोट्यवधींचे मालक होण्याची संधी  )

कन्या राशी

कन्या राशीच्या लोकांना बृहस्पतिच्या अस्तामुळे सुखाचे दिवस पाहायला मिळू शकतात. जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. यावेळी तुम्हाला करिअर आणि व्यवसायात चांगले यश मिळण्याची शक्यता आहे.

वृश्चिक राशी

वृश्चिक राशीच्या लोकांना बृहस्पतिच्या अस्तामुळे शुभ लाभ मिळण्याची शक्यता आहे. नोकरदारांच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकते. कामात प्रगती होऊ शकते. त्याशिवाय व्यावसायिकांना जबरदस्त फायदा होऊ शकतो. कुटुंबात आनंद राहण्याची शक्यता आहे. तुमच्या बँक बॅलन्समध्येही चांगली वाढ होण्याची शक्यता आहे. 

धनु राशी

बृहस्पतिच्या अस्तामुळे धनु राशीच्या लोकांना चांगला पैसा मिळण्याची शक्यता आहे. तुमचे अडकलेले पैसे परत मिळू शकतात. नोकरदार लोकांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. जे लोक नवीन नोकरीच्या शोधात असतील तर तुम्हाला नवीन संधी मिळू शकतात. नवीन घर किंवा मालमत्ता खरेदी करण्याचे योग जुळून येऊ शकतात. 

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)