Shani Surya Yuti Ended : ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचे राजा सूर्य प्रत्येक महिन्याला राशी परिवर्तन करतो. सूर्य एका महिन्यासाठी कुंभ राशीमध्ये होता. नुकताच १४ मार्चला सूर्य राशी परिवर्तन करून मीन राशीमध्ये आले आहे. अशात कुंभ राशीमध्ये असलेली सूर्य आणि शनिची यूती संपली आहे. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य आणि शनिला एकमेकांचा शत्रु ग्रह मानतात. शनि हे सूर्यदेवाचे पुत्र आहे पण त्यांच्यामध्य शत्रुची भावना आहे. शनिची राशी कुंभमध्ये सूर्य शनिची युती संपल्यामुळे काही राशींना याचा फायदा होऊ शकतो. या राशींसाठी चांगला काळ सुरू होत आहे. सूर्य १४ एप्रिलपर्यंत मीन राशीमध्ये विराजमान राहील. या दरम्यान तीन राशींवर याचा परिणाम दिसून येईल. या राशीच्या लोकांना अचानक धनलाभ होऊ शकतो आणि करिअरमध्ये भरघोस यश मिळू शकते. जाणून घ्या, त्या राशी कोणत्या?

वृषभ

सूर्य आणि शनिची युती संपल्यामुळे वृषभ राशीच्या लोकांना याचा मोठा फायदा झालेला दिसून येईल. या राशीच्या लोकांना मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे. यांची आर्थिक परिस्थिती सुधारेल. करिअरमध्ये यांना भरपूर यश मिळेल. कामाच्या शोधणाऱ्या लोकांना नोकरी मिळू शकते. खर्च कमी होईल आणि काही लोक पैसे वाचवण्यास सक्षम राहतील. व्यवसाय करणाऱ्या लोकांना नफा मिळेल. काही लोकांना अचानक लाभ मिळू शकतो. विवाहाचे योग जुळून येईल.

हेही वाचा : Guru Gochar 2024 : तब्बल १२ वर्षानंतर गुरूचा वृषभ राशीमध्ये प्रवेश, मेषसह या राशी होतील मालामाल

मकर

शनि आणि सूर्याच्या युती संपुष्टात आल्यामुळे मकर राशीच्या लोकांनाही याचा आर्थिक फायदा होईल. काही लोकांना अचानक पैसे मिळू शकतात. बँक बॅलेन्स वाढू शकतो. अनेक जण या राशीच्या लोकांकडे आकर्षित होईल. लोकप्रियता वाढू शकते. वैयक्तिक आणि कामाच्या ठिकाणी या राशीचे लोक आनंदी राहील. नोकरी करणाऱ्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते. जवळच्या लोकांबरोबर वाद असेल तर मिटू शकतो.

कुंभ

कुंभ राशीचे स्वामी ग्रह शनि आहे आणि याच राशीमध्ये शनि सूर्याची युती होती. या राशीच्या लोकांनाही दिलासा मिळू शकतो. कोणतीही योजना यशस्वी होऊ शकते.वाहन आणि संपत्ती खरेदी करण्याचे योग जुळून येतील. व्यवसायात वाढ होईल. या राशीचे थांबलेली सर्व कामे पूर्ण होतील. वैवाहिक जीवनात सुख समृद्धी नांदेल. त्याचप्रमाणे अविवाहित लोकांसाठी विवाहाचे योग जुळून येईल.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)