Sun Transit In Aquarius: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य मान- सन्मान, प्रतिष्ठा, विश्वास, सरकारी नोकरी, राजकारणाचा कारक मानला जातो. सूर्य देव सिंहा राशीचा स्वामी आहे आणि एका राशीमधून दुसऱ्या राशीमध्ये जवळपास १ महिन्यानंतर परिवर्तन करत आहे.१३ फेब्रुवारीला सूर्य देव कुंभ राशीमध्ये प्रवेश करणार आहे ज्याचा प्रभावामुळे सर्व राशींवर दिसून येत आहे. पण ३ राशी अशा आहेत ज्यांचे भाग्य उजळणार आहे. तसेच या राशींना मान- सन्मान आणि प्रतिष्ठा प्राप्त होऊ शकते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सिंह

सिंह राशीच्या लोकांसाठी सूर्य देवाचे राशी परिवर्तन लाभादायी ठरू शकते. सूर्य देव सिंह राशीच्या सातव्या घरात भ्रमण करू शकतो. तसेच सूर्य देव या राशीचे स्वामी आहेत त्यामुळे विवाहित लोकांसाठी हा चांगला काळ असू शकतो. तसेच जोडीदारासह चांगला वेळ घालवू शकतात. मेहनत करून यश मिळवले पाहिजे. नोकरीत कोणताही बदल होऊ शकतो आणि तो तुमच्या बाजूने असेल. त्याचबरोबर भागीदारीच्या कामातून तुम्हाला फायदा होईल.

हेही वाचा – ३१ जानेवारी पंचांग: हस्त नक्षत्रात जानेवारीचा शेवट कोणत्या राशीला कसे लाभ देऊन जाणार? सुकर्म योगाचा प्रभाव वाचा

मकर

सूर्य देवाचे गोच या राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकते कारण सूर्य देव या राशीच्या गोचर कुंडलीमध्ये उत्पन्नाच्या घरात आहे लाभ क्षेत्रामध्ये भ्रमण करणार आहे. त्यामुळे या काळात उत्पन्नामध्ये जबरदस्त फायदा होऊ शकतो. तसेच गुंतवणूकीमध्ये लाभ मिळण्याचा योग आहे. तसेच चांगले पैसे कमावण्याची संधी मिळणार आहे पण त्याचबरोबर तुम्ही खर्च देखील तुमच्या मनाला हवा तसा चांगल्या ठिकाणी करू शकता. या शिवाय सूर्य देव या राशीच्या आठव्या घराचे स्वामी आहे. त्यामुळे जे लोक संशोधन क्षेत्रात काम करत आहे त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत चांगला ठरू शकतो.

हेही वाचा- फेब्रुवारीत ‘या’ तारखांना वाढदिवस असणाऱ्यांचे नशीब फळफळणार; मोठा धनलाभ होताना काय जपावं लागेल?

वृषभ

वृषभ राशीच्या लोकांसाठी सूर्य देव राशी परिवर्तन लाभदायी सिद्ध करू शकतात कारण सूर्य देवांचे गोचर कर्म घरात होणार आहे त्यामुळे जर तुम्ही व्यवसायिक असाल तर तुम्हाला चांगला धनलाभ होऊ शकतो. तसेच करिअरमध्ये तुम्ही उच्चस्थानी पोहचण्याचा योग जुळून येत आहे आणि तुम्हाला व्यवसायामध्ये बराच काळ अडकलेले पैसे देखील मिळतील. नोकरी करणाऱ्यांना करिअरमध्ये नवीन जबाबदारी मिळू शकते तसेच तुम्हाला हव्या त्या ठिकाणी ट्रान्सफर होऊ शकते.

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Surya gochar in 2024 sun transit in kumbh big success these zodiac sign snk
First published on: 31-01-2024 at 18:43 IST