Solar Eclipse 2024 Date In India : हिंदू धर्मात ग्रहणाचे विशेष महत्त्व आहे. २०२४ मध्ये ४ ग्रहणे होणार असून त्यापैकी २ सूर्यग्रहण आणि २ चंद्रग्रहण असतील. वर्षातील पहिले सूर्यग्रहण एप्रिल महिन्यात लागणार आहे. वर्षातील पहिले सूर्यग्रहण चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावास्येला लागणार आहे. मात्र, हे ग्रहण भारतात दिसणार नाही. वर्षातील पहिल्या सूर्यग्रहणाची तारीख, ते कुठे दिसेल आणि सुतक काळातील वेळ जाणून घ्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२०२४ मध्ये पहिले सूर्यग्रहण कधी लागणार? (Surya Grahan 2024 Date)

सोमवार, ८ एप्रिल २०२४ रोजी वर्षातील पहिले सूर्यग्रहण लागणार आहे. भारतीय वेळेनुसार हे सूर्यग्रहण अमावस्या तिथीला रात्री ९.१२ ते १:२५ पर्यंत लागणार आहे.

हेही वाचा – १५ दिवसांनी निर्माण होणार ‘गजकेसरी राजयोग!’ ‘या’ राशीच्या लोकांचा सुरु होईल सुवर्णकाळ; कमावणार भरपूर पैसा

सूर्यग्रहणाचा सुतक कालावधी कधी असतो? (Surya Grahan 2024 Sutak Kaal)

वर्षातील पहिले सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. अशा स्थितीत सुतक कालावधी वैध राहणार नाही. हिंदू धर्मग्रंथानुसार, सूर्यग्रहण सुरू होण्याच्या १२ तास आधी सुतक कालावधी सुरू होतो. या स्थितीत सकाळी ९.१२ पासून सुतक कालावधी सुरू होईल, ज्याची समाप्ती ग्रहण समाप्तीसह होईल. पण सुतक काळ भारतात वैध असणार नाही. त्यामुळे मंदिराचे दरवाजे बंद होणार नाहीत.

२०२४ सालचे पहिले सूर्यग्रहण कुठे दिसणार? (Surya Grahan 2024 Places )

वर्षातील पहिले सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. हे ग्रहण पूर्व आशिया, ऑस्ट्रेलिया, पॅसिफिक महासागर, अटलांटिक महासागर, उत्तर ध्रुव, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, दक्षिण पश्चिम युरोप, उत्तर ध्रुव, दक्षिण ध्रुव इत्यादी ठिकाणी दिसणार आहे.

हेही वाचा – Makar Sankranti 2024 : यंदा केव्हा आहे मकर संक्रांती, १४ की १५ जानेवारी? जाणून घ्या तारीख आणि वेळ

सूर्यग्रहण कधी होते ( Surya Grahan 2024)

जेव्हा चंद्र सूर्य आणि पृथ्वीच्यामध्ये येतो तेव्हा चंद्राच्या मागे सूर्याचे प्रतिबिंब काही काळासाठी पूर्णपणे झाकलेली असते. या प्रक्रियेलाच सूर्यग्रहण म्हणतात.

२०२४ वर्षातील पहिले चंद्रग्रहण? (Chandra Grahan 2024)

वर्षातील पहिले चंद्रग्रहण फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला म्हणजेच २५ मार्च २०२४, सोमवारी लागणार असून ग्रहणाचा कालवधी सकाळी १०.२३ ते दुपारी ०३:०२ पर्यंत असेल.

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Surya grahan 2024 date sutak kaal time solar eclipse 2024 in india snk
First published on: 07-01-2024 at 18:09 IST