Chandra Grahan 2024: सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण या खगोलीय घटना असू शकतात, पण ज्योतिषशास्त्रात त्यांचे विशेष महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्रात सूर्य ग्रहण आणि चंद्र ग्रहण या घटनांना फार महत्त्व आहे. ग्रहणाच्या प्रभावामुळे राशींवर शुभ आणि अशुभ प्रभाव पडतात. पंचांगानुसार, फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला २५ मार्च २०२४ रोजी या नव्या वर्षातील पहिले चंद्रग्रहण होणार आहे. पंचांगानुसार, २०२४ मध्ये होळीचा सण २५ मार्च रोजी साजरा केला जाईल. चंद्रग्रहण आणि होळी एकाच दिवशी आहे. हे चंद्रग्रहण सकाळी १० वाजून २३ मिनिटांनी सुरु होईल आणि दुपारी ०३ वाजून ०२ मिनिटांपर्यंत चालेल. या चंद्रग्रहणाचा सर्व १२ राशींवर मोठा प्रभाव पडणार आहे. मात्र, यापैकी काही राशींसाठी हे चंद्रग्रहण जीवनात सकारात्मक बदल घडवून आणणारे ठरु शकते. या भाग्यवान राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊ.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘या’ राशींचे भाग्य चमकणार?

मेष राशी

मेष राशीच्या लोकांसाठी चंद्रग्रहण खूप शुभ ठरु शकते. तुमचे कुठे पैसे अडकले असतील तर ते या काळात परत मिळू शकतात. तुमची आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे. नवीन नोकरीची संधी तुम्हाला मिळू शकते. व्यवसायिकांना मोठा लाभ मिळण्याची शक्यता आहे. सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी हा काळ विशेष फलदायी ठरु शकतो. या राशीच्या लोकांना समाजात महत्त्वाचे स्थान मिळेल, सन्मान, प्रगती, उत्पन्नाचे नवीन साधन विकसित होऊ शकतात. जोडीदाराबरोबर या काळात नातं मजबूत होऊ शकतो.

(हे ही वाचा : १३ दिवसांनी ‘या’ राशींना होणार बक्कळ धनलाभ? शनि महाराजांच्या राशीत बुधदेव गोचर करताच लक्ष्मी येऊ शकते दारी )

कर्क राशी

चंद्रग्रहण कर्क राशीच्या लोकांचे दिवस बदलणारे ठरु शकते. तुमच्या आयुष्यात मोठा आणि सकारात्मक बदल घडून येऊ शकतो. जर तुम्ही कुठली परीक्षा किंवा स्पर्धा, मुलाखत देणार असाल तर त्यात तुम्हाला यश प्राप्त होऊ शकतो. कोणतीही महत्त्वाची प्रलंबित कामं या काळात सहज पूर्ण होऊ शकतात. या काळात तुम्ही गुंतवणूक केलेल्या गोष्टींमध्ये तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो. तसेच वैवाहिक जीवनात आनंद आणि लाभ मिळण्याचे योग आहेत. तुमचा आत्मविश्वास वाढू शकतो.

कन्या राशी

चंद्रग्रहण कन्या राशीच्या लोकांसाठी मोठे फायदे घेऊन येणारे ठरु शकते. करिअरमध्ये प्रगतीसोबतच आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या लोकांनाही फायदा होऊ शकतो. जे बेरोजगार आहेत, त्यांना रोजगार मिळू शकतो. मेहनतीचे फळ मिळण्याची शक्यता आहे. जे लोक रिअल इस्टेटचा व्यवसाय करतात त्यांना चांगली डील मिळू शकते. तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला कुटुंब आणि जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळण्याची शक्यता आहे.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: There will be lunar eclipse on holi 2024 these zodiac sign get more profit and money pdb
First published on: 08-02-2024 at 14:55 IST