जे शेवटचे हिमयुग होऊन गेले, त्यात सध्या हयात असणाऱ्या सस्तन प्राण्यांचे पूर्वज अस्तित्वात होते. त्यातले काही आपल्या अवतीभोवती असणाऱ्या आजच्या प्राण्यांपेक्षा आकाराने मोठे होते. त्यांच्या जीवाश्मांवरून वैज्ञानिकांनी त्यांच्याविषयीची अत्यंत विश्वासार्ह माहिती संकलित केली आहे.
