बँकऑफ महाराष्ट्रच्या बंद पडलेल्या खात्यातून यूपीआय अ‍ॅपचा वापर करून तब्बल ३३ लाख २५ हजार रुपये काढण्यात आल्याचा प्रकार घडला. बंद खात्यातून रक्कम उचलणाऱ्या तिघांना मुकुंदवाडी पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात राजेश मधुकर अंभोरे, शिवाजी अशोक पवार व संदीप मुळे या तिघांनी ही लूट करताना अनेक तांत्रिक करामती केल्या. बंद खात्यातून निघालेली ही रक्कम नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या पार्किंग अकाउंटवरुन निघू शकत असल्याने बँकिंग सेवेवर सुरक्षेचे नवे प्रश्न निर्माण झाले आहे.

शहरातील महालक्ष्मी चौकात संशयितरीत्या फिरणाऱ्या राजेश मधुकर अंभोरे यांना मुकुंदवाडी पोलिसांनी पकडले. राजेश अंभोरे याच्याकडून दोन मोबाइल आणि अ‍ॅक्सिस बँकेचे पासबुक जप्त करण्यात आले. जप्त करण्यात आलेली खाते पुस्तिका अंभोरे याची नव्हती. त्या खातेपुस्तिका संदीप मुळे या त्यांच्या मित्राने ठेवण्यासाठी दिल्याचे राजेश अंभोरे यांनी सांगितले. संदीप मुळे  याने राजेश अंभोरे आणि शिवाजी पवार या दोघांना महाराष्ट्र बँक व अ‍ॅक्सिस बँकेत खाते काढण्यास सांगितले. त्यानंतर या खात्यावरील ऑनलाइन व्यवहारासाठी महाराष्ट्र बँकेचे यूपीआय हे ‘अ‍ॅप’ डाउनलोड करण्यास सांगितले. या अ‍ॅपवर स्वत:ची माहिती भरून बँक ऑफ महाराष्ट्रच्या बंद अकाउंटमधून २ लाख ६० हजार रुपये काढले. बँक ऑफ महाराष्ट्रच्या खात्यावरून पैसे काढून ती रक्कम अ‍ॅक्सिस बँकेच्या शिवाजी अशोक पवार यांच्या खात्यावर भरली. तसेच शिवाजी पवार यांच्या बंद खात्यातून अ‍ॅक्सिस बँकेच्या खात्यात ३० लाख ६५ हजार रुपये जमा केले व ती रक्कम उचलली. संदीप मुळे, राजेश अंभोरे व शिवाजी अशोक पवार यांनी केलेल्या या व्यवहाराच्या विरोधात बँक ऑफ महाराष्ट्रच्या सिडको शाखेतील अरविंद मुकंदराव वायकोळे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर तिघांना पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने आरोपींना १० दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे. या प्रकरणात आरोपींनी दोन खाती वापरल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

Tax, Dharashiv, Tax terrorism, uddhav Thackeray,
कर दहशतवाद नष्ट करणार, महाविकास आघाडीच्या सभेत ठाकरेंची घोषणा
garbage dump, Solapur, fire,
सोलापुरात कचरा आगारापाठोपाठ स्मार्ट सिटीच्या पाईप साठ्यालाही मोठी आग
mining projects in sindhudurg
सिंधुदुर्गातील खनिज प्रकल्प कायमचे बंद व्हावेत; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पर्यावरणवाद्यांना अपेक्षा
Various options are being discussed to clear the stalled seat allocation in the Grand Alliance
तोडग्याचे प्रयत्न; महायुतीचे जागावाटप मार्गी लावण्यासाठी ‘देवाणघेवाण’

या अनुषंगाने बँकेतील सूत्रांना विचारले असता त्यांनी सांगितले, की रिझव्‍‌र्ह बँकेच्या अखत्यारित नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची स्थापना करयात आली आहे. या महामंडळाकडे यूपीआय या अ‍ॅपमधून होणारे व्यवहार नियंत्रित करण्याची जबाबदारी असते. या महामंडळाकडे विविध बँकाचे ‘पार्किंग अकाउंट’ असते. संदीप मुळे यांनी बंद खात्यातून रक्कम काढली आहे काय, हे तपासण्याची सोय नसल्याने बँक ऑफ

महाराष्ट्रच्या नावावर ‘पार्किंग अकाउंट’ मधील रक्कम अ‍ॅक्सिस बँकेकडे वर्ग केली. बँक ऑफ महाराष्ट्रच्या खात्यातूनच रक्कम गेली का, याची विचारपूस केली असता ते खाते बंद श्रेणीतील असल्याचे तपासादरम्यान पोलिसांच्या लक्षात आले. रक्कम तर आरोपींनी काढली, पण ती बंद अकाउंटमधून निघाली कशी, असा प्रश्न पोलिसांना पडला आहे.