12 July 2020

News Flash

Ishita

मित्राच्या मदतीने प्रेयसीलाच लुटले

मित्राच्या मदतीने प्रेयसीलाच लुटण्याचा प्रकार विटय़ानजीक रेवणगाव घाटात घडला असून, सांगली पोलिसांनी प्रियकरासह तिघांना अटक करून मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती बुधवारी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांनी दिली.

‘खंडकरी जमीन वाटप विशेष दक्षता’

शेती महामंडळाच्या खंडकरी शेतक-यांच्या जमीनवाटपात गैरप्रकार होणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे.

कोपरगावला बेट भागात दरोडा

शहरानजीक बेट भागात मंगळवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास ४ ते ५ दरोडेखोरांनी तलवार, चाकू काठय़ांसह व पिस्तुलाचा धाक दाखवून एका कुटुंवाला मारहाण करीत सोन्या-चांदीचे दागिने व ५० हजारांची रोकड चोरून नेली. चोरटय़ांच्या मारहाणीत चौघे जखमी झाले आहेत.

‘स्नेहालय’ समोर आर्थिक विवंचना

उपेक्षितांच्या उत्कर्षांसाठी प्रभावीपणे कार्यरत असलेल्या स्नेहालय प्रकल्पाचा व्याप वाढल्यामुळे संस्थेसमोर आता आर्थिक विवंचना उभ्या राहिल्या आहेत.

भाजयुमोची जिल्हा कार्यकारिणी जाहीर

भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत मोरे यांनी संघटनेची जिल्हा कार्यकारिणी मंगळवारी जाहीर केली. जिल्हा संघटकपदी डॉ. स्वाधीन गाडेकर (उत्तर) व आबासाहेब गुंड (दक्षिण) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

दुहेरी खून पूर्ववैमनस्यातून

टेंबलाईवाडी येथील दुहेरी खून प्रकरण पूर्ववैमनस्यातून व पैशाच्या वादातून झाले असून या प्रकरणी आठ जणांना आनेवाडी टोल नाका येथे सापळा रचून अटक केली, अशी माहिती अपर पोलीस प्रमुख जोती प्रिया सिंग यांनी पत्रकार परिषदेत मंगळवारी दिली.

सांगलीतून वर्षभरात ५१८ महिला, मुली बेपत्ता

सांगली जिल्ह्यातील गेल्या वर्षभरात ५१८ महिला व मुली बेपत्ता झाल्या होत्या. त्यापकी ३९० जणींचा ठावठिकाणा लागला असून अद्याप १२८ बेपत्ता आहेत. यापकी ९७ मुली अल्पवयीन असून, गेल्या तीन वर्षांत विविध पोलीस ठाण्यांत दाखल झालेल्यांपकी २० टक्के महिला अद्याप बेपत्ता आहेत.

कोल्हापूरजवळ सशस्त्र दरोडा; मारहाणीत दोघे जखमी

तारदाळ निमशिरगाव रोडवरील सदाशिव बंडू जाधव यांच्या घरावर चोरटय़ांनी सोमवारी मध्यरात्री सशस्त्र दरोडा टाकला. या घटनेत चोरटय़ांनी केलेल्या मारहाणीत दोघे जण जखमी झाले. दरोडय़ानंतर चोरटय़ांना जमावाने पकडण्याचा प्रयत्न केला.

गुंतवणूक योजनेतून सांगलीत महिलांची लाखोंची फसवणूक

चेन्नई येथील हेवनली इंटरडिनॉमिनल मिशन ट्रस्टच्या नावाने गुंतवणूक योजना जाहीर करून कष्टकरी महिलांची लाखो रुपयांची फसवणूक झाली असल्याची तक्रार मंगळवारी पोलिसांकडे देण्यात आली.

परकीयांपेक्षा काँग्रेसकडून अधिक लूट- बाबा रामदेव

मोगल व इंग्रजांनी देशाला जेवढे लुटले नाही, तेवढी लूट मागच्या ६६ वर्षांत करण्यात आली. अनर्थ शास्त्राची ही देण आहे. या वर्षांत नवे महाभारत होऊन धर्मराज्याची प्रतिष्ठापना केली जाईल. त्यासाठी नरेंद्र मोदींसारख्या फकिराला पंतप्रधान करा, असे आवाहन योगगुरू रामदेवबाबा यांनी केले.

सोलापूर लोकसभा निवडणुकीपासून भाजपचे शरद बनसोडे दूर राहणार

आगामी सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या विरोधात भाजपचे नेते अॅड. शरद बनसोडे यांनी लढण्यास पुन्हा एकदा नकार दर्शविला असून, राजकारणापेक्षा समाजकारणच बरे असल्याचे मत व्यक्त केले.

जमिनीचा सातबारा लवकरच मोबाइलवर

संगणकीकृत सातबारा तयार करण्यासाठी दोष दुरुस्त करण्याचे काम सध्या सुरू आहे. लवकरच मोबाइलवर सातबारा जमीनमालकांना दिला जाईल, अशी घोषणा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली.

चितळी गोळीबारप्रकरणी ३ मुलांना अटक

चितळी (ता. राहाता) येथील गोळीबारप्रकरणी आज पोलिसांनी तिघा अल्पवयीन मुलांसह पाच जणांना अटक केली. मुख्य आरोपी शाहरूख रज्जाक शेख याच्यासह अन्य तिघे आरोपी अद्याप फरार आहेत.

श्रीरामपूर शहरात एकाच रात्री आठ दुकाने फोडली

शहरातील बेलापूर रस्ता व मोरगेवस्ती भागात आज रात्री आठ ठिकाणी दुकाने फोडून मोठा ऐवज लंपास केला. वरिष्ठ पोलीस अधिका-यांच्या निवासस्थानानजीक चोरटय़ांनी चो-या करून पोलिसांपुढेच आव्हान उभे केले आहे.

शालेय रिक्षाचालकांची अवास्तव भाडेवाढ

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) सुरक्षिततेसाठी कायद्याचा बडगा उगारून शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांना शिस्त लावण्याचा प्रयत्न करताच, रिक्षाचालकांनी मनमानी करत भाडेवाढीचे हत्यार उपसले आहे.

प्रतिष्ठित व्यापारी कुटुंबातील तिघांना कोठडी

व्यवसायासाठी माहेरून दहा लाख रुपये आणावेत या कारणावरून नवविवाहितेचा छळ व मारहाण करून विनयभंग केल्याप्रकरणी येथील पेालीस ठाण्यात श्रीरामपूर शहरातील प्रतिष्ठित व्यापाऱ्याच्या कुटुंबातील चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

महाविद्यालयांमध्ये ‘कॅम्पस अॅम्बॅसिडर’ नेमणार

मतदारांमध्ये मतदानाविषयी जागृती निर्माण व्हावी तसेच मतदानाच्या जबाबदारीची जाणीव व्हावी यासाठी जिल्हय़ातील कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांची कॅम्पस अॅम्बॅसिडर म्हणून नियुक्ती केली जाणार असल्याचे तसेच शालेय विद्यार्थ्यांकडून संकल्पपत्र भरून घेतले जाणार असल्याची माहिती निवडणूक शाखेचे उपजिल्हाधिकारी सुनील माळी यांनी दिली.

राजू शेट्टींसह ७८ जणांना नोटिसा

यंदाच्या ऊसगाळप आंदोलनात झालेल्या नुकसानीस कारणीभूत ठरवून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांच्यासह ७८ लोकांनी ८० लाख रुपयांची नुकसानभरपाई द्यावी अशा आशयाची नोटीस जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी पाठविली आहे.

दुहेरी हत्याकांडातील जन्मठेपेची शिक्षा उच्च न्यायालयात रद्दबातल

मोहोळ तालुक्यातील सोहाळे येथे झालेल्या दुहेरी हत्याकांडाच्या खटल्यात सोलापूरच्या सत्र न्यायालयाने एका आरोपीला सुनावलेली जन्मठेपेची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाने अपिलात रद्दबातल ठरविली.

रेल्वेत बसण्यावरून वादावादी; अजित घोरपडेंविरुद्ध तक्रार

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी राज्यमंत्री अजित घोरपडे यांची रेल्वेमध्ये बसण्याच्या कारणावरून महिलेशी वादावादी होण्याचा प्रसंग घडला असून या प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत.

वीज दरवाढीच्या विरोधात शिवसेनेचा तिरडी मोर्चा

वीज दरवाढीच्या विरोधात शिवसेनेच्या वतीने सोमवारी महावितरण कार्यालयावर तिरडी मोर्चा काढण्यात येऊन शासनाचे श्राद्ध घालण्यात आले. शासनाच्या अन्यायकारक धोरणामुळे उद्योजकांना राज्याबाहेर जावे लागत असल्याच्या प्रकाराचा निषेध नोंदवत शिवसैनिकांनी निदर्शने केली.

रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर; बिबटय़ांच्या हल्ल्यात पाच शेळय़ा ठार

नागरी भागात वानरे व मोकाट कुत्र्यांचा उच्छाद वाढला असताना, डोंगरालगतच्या नागरी वस्तीत जंगली प्राण्यांची भक्ष्याच्या शोधार्थ घुसखोरी होऊ लागल्याने त्या ठिकाणी भीतीचे वातावरण पसरले आहे.

सोलापूर जिल्हय़ात ३८ हजार नवमतदार

सोलापूर जिल्हय़ातील मतदारांची संख्या ३० लाख ३८ हजार ४८० इतकी झाली असून, यात १६ लाख ६ हजार १५० पुरुष व १४ लाख ३२ हजार ३३० महिलांचा समावेश आहे. १८ ते १९ वयोगटातील नवमतदारांची संख्या ३४ हजार ९९६ एवढी आहे.

दोन टोळय़ांकडून १० पिस्तूल जप्त, १७ अटकेत

पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेपाठोपाठ शहरातील तोफखाना पोलिसांनी जिल्हय़ात गावठी पिस्तुलांची विक्री करणारी मोठी टोळी उघडकीस आणली असली, तरी या दोन्ही टोळय़ांना शस्त्रपुरवठा करणारा जिल्हय़ातीलच सूत्रधार मात्र अजूनही फरारच आहे.

Just Now!
X