नवी दिल्ली : रणवीर सिंह आणि एकता डे यांनी दुबई येथे सुरू असलेल्या २० वर्षांखालील आशियाई अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत गुरुवारी अनुक्रमे पुरुष आणि महिलांच्या ३००० मीटर स्टीपलचेस प्रकारात सुवर्ण कामगिरी केली. या कामगिरीनंतर भारताची तीन सुवर्णपदके झाली आहेत.

एकताने १० मिनिटे ३१.९२ सेकंद अशी वेळ नोंदवली, तर रणवीरने ९ मिनिटे २२.६२ सेकंद वेळेसह सुवर्णपदक जिंकले. अनुराग सिंह कलेरने यापूर्वी गोळाफेकीत १९.२३ मीटर अंतरासह सुवर्णपदक मिळवले होते. भारताने गुरुवारी एकूण सात पदकांची कमाई केली. सकाळच्या सत्रात चालण्याच्या शर्यतीत आरतीने महिलांच्या १० हजार मीटर शर्यतीत कांस्यपदक जिंकले. आरतीने ४७ मिनिटे ४५.३३ सेकंद वेळेसह हे यश संपादन केले.

England victory over Serbia in the opening football match sport news
बेलिंगहॅमची लय कायम; इंग्लंडचा सलामीच्या लढतीत सर्बियावर संघर्षपूर्ण विजय
Divya Deshmukh wins World Junior Girls chess title
भारताची दिव्या देशमुख विजेती;अंतिम फेरीत बल्गेरियाच्या बेलोस्लाव क्रास्तेवावर मात
euro 2024 opening match germany vs scotland
युरो फुटबॉल स्पर्धेचा थरार आजपासून; पहिल्या सामन्यात यजमान जर्मनीची गाठ स्कॉटलंडशी
Navi Mumbai Municipal Commissioner Dr Kailas Shindes outstanding performance in Comrade Marathon in South Africa
द. आफ्रिकेतील कॉम्रेड मॅरेथॉनमध्ये नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांची उल्लेखनीय लक्षणीय कामगिरी
Saurabh Netravalkar's key role in America's victory
USA vs PAK : १४ वर्षांपूर्वीचा बदला पूर्ण! पाकिस्तानविरुद्धच्या कामगिरीनंतर सौरभवर भारतीय चाहत्यांकडून कौतुकांचा वर्षाव
Iga Schwiotek continues his dominance as he advances to the French Open sport
श्वीऑटेकचे वर्चस्व कायम; कोकोला नमवत फ्रेंच स्पर्धेच्या अंतिम फेरीत
Alcaraz Tsitsipas advances to men singles quarterfinals at 9th French Open sport news
अल्कराझ, त्सित्सिपास उपांत्यपूर्व फेरीत; महिला एकेरीत श्वीऑटेक, गॉफचीही आगेकूच
IPL 2024 Prize money updates in marathi
IPL 2024 Prize Money : जेतेपदानंतर कोलकाता टीम मालामाल, उपविजेत्या हैदराबादवरही पैशांचा पाऊस

हेही वाचा >>>विशी सरांचे मार्गदर्शन मोलाचे! ‘कँडिडेट्स’ विजेत्या गुकेशची प्रतिक्रिया; मायदेशात जंगी स्वागत

गोळाफेकीत भारतीय खेळाडूंनी एक सुवर्णपदकासह तीन पदक मिळवली. कलेरला दक्षिण कोरियाच्या पार्क सिहूनकडून आव्हान मिळाले. मात्र, तिसऱ्या प्रयत्नात त्याने केलेली कामगिरी सुवर्णपदक मिळवून देण्यासाठी पुरेशी ठरली. त्याने पहिल्या प्रयत्नात १८.४४ आणि दुसऱ्या प्रयत्नात १८.६९ मीटर अंतर गाठले होते. चौथ्या व पाचव्या प्रयत्नात त्याला एकही गुण मिळाला नाही. सहाव्या आणि अखेरच्या प्रयत्नात १८.७९ मीटर अंतराची त्याने नोंद केली. गतविजेत्या सिद्धार्थ चौधरीने दुसऱ्या प्रयत्नात १९.०२ मीटर अंतरासह कांस्यपदक जिंकले. अमानत कंबोजने भारताच्या पदकतालिकेत एका रौप्यपदकाची भर घातली. तसेच अमन चौधरीने ४७.५३ सेकंदसह पुरुषांच्या ४०० मीटरमध्ये कांस्यपदकाची कमाई केली.