Swedish Startup Jetsons : गेल्या अनेक दिवसांपासून फ्लाइंग कार विषयी बरीच चर्चा सुरू आहे. आतापर्यंत उडणाऱ्या कार फक्त चित्रपटात पाहिल्या आहेत किंवा कल्पना केली आहे. उडणारी कार हे फक्त स्वप्नच असू शकतं असं अनेकदा म्हटलं जायचं. पण आता हेच स्वप्न सत्यात उतरणार असं दिसतंय. कारण नुकतंच स्वीडिश स्टार्टअप जेटसन वन कंपनीने फ्लाइंग कार तयार केली आहे. स्टार्टअपनुसार, ही फ्लाइंग कार इलेक्ट्रिक आहे आणि यात एक व्यक्ती या फ्लाइंग कारमध्ये बसेल इतकी क्षमात आहे. या कंपनीने एक व्हिडीओ शेअर केला आहे. ही फ्लाइंग कार उडायला शिकण्यासाठी फक्त पाच मिनिटे लागतात, असे यात म्हटलंय.

उडत्या कारमध्ये एका व्यक्तीची बसण्याची क्षमता
स्वीडिश स्टार्टअप जेटसनची स्थापना पीटर टर्नस्ट्रॉम आणि टॉमस पाटन यांनी २०१७ मध्ये केली होती. त्याच वेळी, कंपनीने एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये हे स्पष्टपणे दिसतंय की, फ्लाइंग कारमध्ये एक व्यक्ती बसण्याची क्षमता आहे आणि कारमध्ये चार प्रोपेलर आहेत, जे वाहनाच्या प्रत्येक कोपऱ्यात आहेत. सोप्या भाषेत ते एखाद्या मोठ्या ड्रोनसारखं आहे.

आता कमी अंतरावर उड्डाण करता येईल
कंपनीचे संस्थापक पीटर टर्नस्ट्रॉम म्हणाले की, “बॅटरीच्या तंत्रज्ञानामध्ये अजूनही काही समस्या आहेत, ज्या फ्लाइंग कारच्या उड्डाणात अडथळा निर्माण होतोय. परंतु कंपनीला अपेक्षा आहे की, या क्षेत्रातील प्रगतीमुळे ही फ्लाइंग कार काही वर्षात लवकरच उड्डाण करण्यासाठी सज्ज होईल. या फ्लाइंग कारचे पार्ट्स मुख्यतः अॅल्युमिनियम आणि कार्बन फायबरचे बनलेले आहे.

आणखी वाचा : Maruti Suzuki Year-End Discounts: स्वस्तात कार! मारुती सुझुकी देत ​​आहे ४८ हजार रुपयांपर्यंत सूट; या वाहनांवर मिळणार सूट

इथे पाहा व्हिडीओ :

आणखी वाचा : Driverless Car: भारतात धावणार ड्रायव्हरलेस कार, मुंबईतली कंपनी पुढच्या वर्षी करणार लॉंच

२०२२ पर्यंत ग्राहकांच्या सेवेत होणार दाखल
यापुढे बोलताना ते म्हणाले की, सध्या ही कार २० मिनिटांच्या कालावधीसाठी उडू शकते आणि ती १०२ किमी/तास पेक्षा जास्त वेगाने उड्डाण घेऊ शकते. त्याचवेळी, जेटसनने २०२२ मध्ये आपल्या ग्राहकांना एक-सीट असलेली इलेक्ट्रिक एरियल कार सेवेत दाखल होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येतेय.