टोयोटा मोटर्स भारतीय बाजारात नवनव्या कार लाँच करत असते. टोयोटाच्या कार भारतीय बाजारपेठेत खूप पसंत केल्या जातात. टोयोटाच्या कारमधील फिचर्स, जबरदस्त लूकमुळे या कार भारतीयांच्या मनात आपलं अधिराज्य गाजवित आहेत. आता पुन्हा एकदा टोयोटाने भारतीय बाजारात मोठा धमाका केला आहे. कंपनीने भारतीय बाजारात आपली नवी कार लाँच केली आहे.

टोयोटाने त्यांच्या कॉम्पॅक्ट MPV रूमियनचे नवीन मिड-लेव्हल व्हेरियंट लाँच केले आहे. हा प्रकार Toyota Rumion G AT आहे. यात ६-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आहे. Toyota Roomian G AT प्रकारात अनेक वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत, यामध्ये ७-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि Apple CarPlay कनेक्टिव्हिटी, उंची ॲडजस्टेबल ड्रायव्हर सीट आणि फ्रंट सीटबेल्ट, टोयोटा कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी, ड्युअल-टोन फॅब्रिक अपहोल्स्ट्री, डॅशबोर्ड आणि फ्रंट यांचा समावेश आहे. इंजिन पुश स्टार्ट/स्टॉप बटण, क्लायमेट कंट्रोल, फ्रंट फॉग लॅम्प, क्रोम डोअर हँडल, ड्युअल-टोन १५-इंच अलॉय व्हील आणि मागील वॉशर, वायपर आणि डिफॉगर यांचा समावेश आहे.

2 Indian spies expelled from Australia
भारतीय हेरांची ऑस्ट्रेलियातून गुपचूप हकालपट्टी
Maruti Suzuki CNG Car
मारुतीचा नाद करायचा नाय! देशात आणतेय ट्विन सिलिंडरसह ३ सीएनजी कार; हे ऐकताच बाकी कंपन्यांची उडाली झोप!
Best Selling SUV Car
बाजारात ७.४६ लाखाच्या ‘या’ ५ सीटर SUV ला तुफान मागणी, १४ महिन्यांत १.५ लाखाहून अधिक कारची विक्री, मायलेज…
Jeep Meridian X Edition
भारतात लाँच झाली Jeep Meridian X, जाणून घ्या किंमत अन् जबरदस्त फिचर्स
Tata Altroz Racer
Maruti Swift चा खेळ संपणार? टाटाने खेळला नवा गेम; आणली देशातील पहिली प्रीमियम हॅचबॅक कार, बुकींगही सुरु, किंमत…
Hero Xoom Combat Edition
आता Activa, Jupiter टिकणार नाय? हिरोची सर्वात महागडी स्कूटर देशात दाखल, किंमत…
Reliance Industries signs deal with Rosneft
सवलतीच्या दरात तेल खरेदीसाठी रिलायन्सचा रशियाच्या ‘रोझनेफ्ट’शी करार
Toyota Innova Hycross Bookings Closed
मायलेज २४ किमी, ‘या’ ८ सीटर कारसाठी ग्राहकांच्या रांगा; तुफान मागणी पाहून कंपनीने केलं बुकिंग बंद, किंमत…

(हे ही वाचा : मारुतीच्या ‘या’ ५ सीटर SUV ला ग्राहकांची तुफान मागणी; खरेदीसाठी मोठी गर्दी, मायलेज २५ किमी, किंमत… )

Toyota Roomian च्या सर्व प्रकारांमध्ये सुरक्षिततेसाठी अनेक वैशिष्ट्ये मानक म्हणून प्रदान करण्यात आली आहेत. यामध्ये ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, हिल होल्ड असिस्ट, आयसोफिक्स चाइल्ड सीट माउंट, सीट बेल्ट रिमाइंडर आणि रिअर पार्किंग सेन्सर मानक म्हणून उपलब्ध आहेत.

Toyota Roomian १.५ लीटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिनसह येते. हे इंजिन १०३bhp पॉवर आणि १३७Nm टॉर्क जनरेट करते. त्याच्या CNG किट प्रकारांमध्ये, हे इंजिन ८८bhp पॉवर आणि १२१.५Nm टॉर्क देते, परंतु CNG किट फक्त प्रारंभिक G ट्रिममध्ये उपलब्ध आहे.

यात दोन ट्रान्समिशन पर्याय आहेत, ५-स्पीड मॅन्युअल आणि ६-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक. रुमियनची किंमत १०.४४ लाख रुपयांपासून सुरू होते आणि १३.७३ लाख रुपयांपर्यंत (एक्स-शोरूम) जाते. बाजारात त्याची स्पर्धा मारुती एर्टिगा आणि किया केरेन्स सारख्या कारशी आहे.