बाइक सेगमेंटमध्ये, मायलेज असलेल्या १०० सीसी बाइक्सनंतर १२५ सीसी बाइक्सना सर्वाधिक मागणी आहे. १२५ सीसीच्या अनेक कंपन्यांच्या बाइक्स बाजारात उपलब्ध आहे. जर तुम्हाला १२५ सीसी सेगमेंटची बाइक घ्यायची असेल पण सर्वोत्तम पर्याय निवडू शकत नसाल. या तुलनेसाठी आज आमच्याकडे हिरो ग्लॅमर आणि होंडा शाइन बाइक्स आहेत. ज्यात तुम्हाला या दोन्ही बाईकच्या किमतीपासून ते फीचर्सपर्यंत संपूर्ण माहिती मिळेल.

Hero Glamour: हिरो ग्लॅमर ही कंपनीची १२५ सीसी सेगमेंटची एक स्टायलिश बाइक आहे. कंपनीने Xtec अवतारमध्ये नुकतीच सादर केली आहे. बाइकमध्ये सिंगल-सिलेंडर १२४.७ सीसी सिंगल सिलेंडर इंजिन आहे. जे १०.७ पीएस पॉवर आणि १०.६ एनएम पीक टॉर्क जनरेट करते. बाइकच्या ब्रेकिंग सिस्टीममध्ये पुढच्या चाकासाठी डिस्क ब्रेक आणि मागील चाकामध्ये ड्रम ब्रेकचे संयोजन दिले आहे. अलॉय व्हील्स आणि ट्यूबलेस टायर आहे. मायलेजबाबत कंपनीचा दावा आहे की ही नवीन हीरो ग्लॅमर बाईक ८० किमीचा मायलेज देते आणि मायलेज ARAI ने प्रमाणित केला आहे. हिरो ग्लॅमरच्या किमतीबद्दल बोलायचे झाले तर, कंपनीने ७५,९०० रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीसह बाजारात लाँच केली आहे. टॉप व्हेरियंटवर ८५,९२० रुपयांपर्यंत जाते.

Horizon investment of thousand crores in Chakan
होरायझनची चाकणमध्ये हजार कोटींची गुंतवणूक
Tata Punch Car sale
टाटाच्या ‘या’ सर्वात स्वस्त SUV नं Wagon R, Dzire चं वर्चस्व संपवलं? झाली दणक्यात विक्री, मायलेज २६ किमी
cryptocurrency fraud marathi news
क्रिप्टो करंन्सीच्या नावावर युवकाने गमावले २३ लाख रुपये
pilots missing What happened to Vistara
३८ हून अधिक उड्डाणे रद्द, तासभराचा उशीर, वैमानिक गायब; ‘विस्तारा’चं काय बिनसलं?

ड्रायव्हिंग लायसन्सचे नूतनीकरण करण्यास उशीर झाल्यास भरावा लागेल इतका दंड

Honda Shine: होंडा शाइन कंपनीच्या सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या बाइक्सपैकी एक आहे. कंपनीने दोन व्हेरियंटसह बाजारात आणली आहे. बाइकच्या इंजिन आणि पॉवरबद्दल बोलायचे झाल्यास, यात १२४ सीसी सिंगल सिलेंडर इंजिन आहे जे एअर-कूल्ड फ्यूल इंजेक्टेड तंत्रज्ञानावर आधारित आहे. हे इंजिन १०.७४ ची कमाल पॉवर आणि ११ एनएमचा पीक टॉर्क जनरेट करते, ५-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. ब्रेकिंग सिस्टीमबद्दल बोलायचे झाले तर, कंपनीने त्याच्या पुढच्या चाकामध्ये डिस्क ब्रेक आणि मागील चाकामध्ये ड्रम ब्रेक दिले आहेत. तसेच अलॉय व्हील्स आणि ट्यूबलेस टायर देण्यात आले आहेत. मायलेजबद्दल, होंडाचा दावा आहे की ही बाइक ६५ किमीचा मायलेज देते आणि मायलेज ARAI ने प्रमाणित केले आहे. होंडा शाइन कंपनीने ७४,४४२ रुपये (एक्स-शोरूम) च्या सुरुवातीच्या किंमतीसह लाँच केली आहे. टॉप व्हेरिएंटवर जाताना ७८,८४२ रुपयांपर्यंत जाते.