बॉलिवूडची क्वीन अशी ओळख असलेली अभिनेत्री कंगना रणौत ही नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते. कंगना रणौत आता भाजपाची उमेदवार आहे. तिला हिमाचलप्रदेशातल्या मंडी लोकसभा मतदारसंघातून तिकिट दिलं गेलं आहे. आता राजकारणात प्रवेश केल्यानंतर कंगनाने एक नवी कोरी कार खरेदी केली आहे. तिने महागडी लक्झरी कार खरेदी केली असून या कारची किंमत कोटींच्या घरात आहे.

कंगनाने Mercedes-Maybach GLS 600 कार खरेदी केली आहे. या कारसह कंगनाचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये कंगना तिच्या नवीन कारमध्ये फिरताना दिसत आहे. कंगना ही महागड्या गाड्यांची शौकीन आहे. कंगनाच्या कार कलेक्शनच्या ताफ्यात आता या नव्या कारचा समावेश झाला आहे.

(हे ही वाचा : ६ एअरबॅग्स अन् ७० हून अधिक सेफ्टी फीचर्स असलेल्या SUV ला ग्राहकांची तुफान मागणी; ३ महिन्यात १ लाख कारची बुकींग)

निवडणुकांमुळे सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त कंगना हिची चर्चा रंगली आहे. आता तिच्या कारच्याही चर्चा रंगू लागल्या आहेत. मर्सिडीज-मेबॅक GLS या गाडीमध्ये कम्फर्ट आणि टेक्नोलॉजी यांचे कॉम्बिनेशन आहे. इलेक्ट्रॉनिक स्लायडिंग पॅनारॉमिक सनरुफ, यांसारखे फिचर्स उपलब्ध आहेत. या गाडीमध्ये ब्लू, एमराल्ड ग्रीन, ब्रिलियंट ब्लू, पोलर व्हाइट, इरिडियम सिल्व्हर आणि मोजावे सिल्व्हर हे कलर ऑप्शन्स आहेत. यामध्ये मोठे वर्टिकल स्लेट, ग्रिल विंडो लाइन, साइड-स्टेप, फ्रंट आणि रियर बंपरवर डिझाइन एक्सेंट, रुफ रेल आणि एग्झॉस्ट टिप्सचा समावेश आहे. या प्रीमियम लक्झरी SUV मध्ये मोठे २२ इंच किंवा २३ इंचा ब्रश असणारे मल्टी स्पोक व्हिल्स, एक ड्युअल टोन पेंट स्किमचा समावेश आहे.

येथे पाहा व्हिडिओ

Mercedes-Maybach GLS600 मध्ये ४.० लीटरचे V८ इंजिन दिले आहे. जे अधिकाधिक ५५०bhp ची पॉवर आणि ७३०Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. या इंजिनमध्ये एक EQ बूस्ट स्टार्टर जनरेटर सुद्धा दिलं आहे. जो २१bhp आणि २४९Nm चा टॉर्क जनरेट करते. GL600 या इंजिनला ९G-Tronic ऑटोमॅटिक ट्रान्समिशनला जोडला गेला आहे. स्पीड बद्दल बोलायचे झाल्यास मेबॅक ४.९ सेकंदात ० ते १०० किमी प्रति तास वेगाने धावते. याची टॉप स्पीड २५० किमी प्रती तास असल्याची माहिती आहे. या लक्झरी कारची किंमत २.९६ कोटी रुपये असल्याची माहिती आहे.