Best bikes under Rs 80000: बाजारात दैनंदिन वापरासाठी अनेक बाईक उपलब्ध असल्या तरी मायलेजबरोबर चांगल्या परफॉर्मन्सचा विचार केला तर मोजकीच नावे समोर येतात. तुमचाही नवीन बाईकचा प्लान आहे पण बजेट पण कमी? तर काळजी करू नका, आज आम्ही तुम्हाला देशातील सर्वात स्वस्त मोटरसायकलची माहिती देणार आहोत, जर तुमचे बजेट जवळपास ८० हजार रुपये असेल, तर आम्ही तुम्हाला अशा तीन बाइक्सबद्दल सांगत आहोत ज्या चांगल्या मायलेजसह उत्तम परफॉर्मन्स देतात…एवढेच नाही तर सुरक्षिततेसाठी या बाइक्समध्ये डिस्क आणि ड्रम ब्रेकची सुविधा आहे.

देशातील सर्वात स्वस्त बाईकची यादी पाहा

हिरो सुपर स्प्लेंडर
मायलेज: ५५ kmpl

हिरो सुपर स्प्लेंडर अशा ग्राहकांसाठी डिझाइन केले आहे जे दररोज ऑफिससाठी बाईक वापरतात. यात १२४.७cc इंजिन आहे जे १०.७ bhp आणि १०.६ Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन ५ स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. ARAI (ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया) च्या मते ही बाईक ५५kmpl मायलेज देते. समोरच्या टायरमध्ये २४०mm डिस्क ब्रेक आणि मागील टायरमध्ये १३०mm ड्रम ब्रेक आहे. बाईकमध्ये १८ इंच ट्यूबलेस टायर बसवण्यात आले आहेत. बाईकची किंमत ८० हजार रुपयांपासून सुरू होते.

(हे ही वाचा : Nexon, Sonet ची उडाली झोप! महिंद्राच्या स्वस्त SUV ला तुफान मागणी, १ तासात ५० हजार बुकींग, वेटिंग पीरियड पोहचला ६ महिन्यांवर )

होंडा सीबी शाइन
मायलेज: ५५kmpl

Honda Shine 125 ही त्याच्या विभागातील सर्वोत्तम विक्री होणारी बाईक आहे. ही बाईक १२४ cc SI इंजिनसह सुसज्ज आहे जी ७.९ kW चा पॉवर आणि ११ Nm टॉर्क देते. यात ५ स्पीड गिअरबॉक्सची सुविधा आहे. बाईकची रचना सोपी आहे. जे कौटुंबिक वर्गाला आवडेल. ARAI नुसार, ही बाईक एक लिटर पेट्रोलमध्ये ५५ किमी मायलेज देते. बाईकच्या पुढील बाजूस २४० मिमी डिस्क आणि मागील बाजूस १३० मिमी ड्रम ब्रेक आहे. यात १८ इंच ट्यूबलेस टायर बसवले आहेत. बाईकची किंमत ७९ हजार रुपयांपासून सुरू होते.

TVS स्टार सिटी प्लस
मायलेज: ६६kmpl

TVS ची स्टार सिटी प्लस ही एंट्री लेव्हल सेगमेंटमध्ये एक विश्वासार्ह बाईक म्हणून ओळखली जाते. तुम्ही ते रोजच्या वापरासाठी निवडू शकता. बाइकमध्ये ११०cc इंजिन आहे, जे ८.०८ bhp पॉवर आणि ८.७ Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन ४-स्पीड गिअरबॉक्सने सुसज्ज आहे.

इको-थ्रस्ट फ्युएल इंजेक्शन तंत्रज्ञानामुळे, ही बाईक तिच्या सेगमेंटमधील इतर बाइक्सपेक्षा १५ टक्के अधिक मायलेज देईल. बाईकचा टॉप स्पीड ताशी ९० किलोमीटर आहे. ARAI नुसार, या बाईकचे मायलेज ६६ kmpl आहे. बाईकमध्ये डिस्क आणि ड्रम ब्रेकची सुविधा आहे. बाईकची किंमत ७८ हजार रुपयांपासून सुरू होते.