भारतीय ऑटोमोबाईल बाजार जगातील सर्वात मोठ्या वाहन बाजारांपैकी एक आहे. येथे लोक विशेषतः कारची किंमत लक्षात घेऊन वाहने खरेदी करतात. या मोठ्या बाजारपेठेत एंट्री-लेव्हल, सब-कॉम्पॅक्ट, कॉम्पॅक्ट मॉडेल्सना जास्त मागणी आहे. आजकाल लोक ड्रायव्हिंग करताना अधिक आरामदायी अनुभव मिळण्याची अपेक्षा करतात. आजकाल कॉम्पॅक्ट एसयूव्हीला मागणी आहे.

भारतीय बाजारात नुकत्याच दाखल झालेल्या Toyota Urban Cruiser Taisor ला मोठी मागणी आहे. ही कार ह्युंदाईच्या पाच सीटर Venue ला जोरदार टक्कर देते. जी पेट्रोल इंजिनसह येते. कंपनी Taisor मध्ये सीएनजी इंजिन देखील देत आहे. आज आम्ही तुम्हाला या कारच्या फीचर्सबद्दल सांगत आहोत.

टोयोटा किर्लोस्कर मोटरने भारतीय बाजारपेठेत आपली सर्वात स्वस्त एसयुव्ही Toyota Taisor लाँच केली आहे. ही कार विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आली आहे. Toyota Taisor मध्ये कंपनीनं फ्रॉन्क्स कार सारखंच १.२ लीटर, चार-सिलिंडर नॅचरली अॅस्परेटेड पेट्रोल आणि १.० लीटर, तीन सिलिंडर टर्बो पेट्रोल इंजिनचा पर्याय दिला आहे. नॅचरली अॅस्परेटेड इंजिन जे ९०hp पावर आणि ११३Nm चं टॉर्क जनरेट करतं. यात ५-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आणि ऑप्शनल AMT सह कार उपलब्ध केली गेली आहे. तर टर्बो पेट्रोल इंजिन ५-स्पीड मॅन्युअलसोबतच ऑप्शनल ६-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटीकही उपलब्ध केली गेली आहे. टोयोटाच्या या एसयुव्हीत सीएनजीचा पर्याय मिळतो. 

(हे ही वाचा : किंमत २.८९ लाख, मायलेज १९.७१ किमी; मारुतीची ७ सीटर कार स्वस्तात आणा घरी, कुठे मिळतेय शानदार डील? )

Toyota Taisor चं टर्बो पेट्रोल मॅन्यूअल ट्रान्समिशन व्हेरियंट २१.५ किमी/लीटर आणि ऑटोमॅटिक व्हेरियंट २०.० किमी/लीटरचा मायलेज देते. तर CNG व्हेरियंट प्रति किलो २८.०५ किलोमीटर पर्यंत कमाल मायलेज देते, असा दावा कंपनीचा आहे.

या कारमध्ये सुधारित फ्रंट ग्रिल, नव्याने डिझाइन केलेले बंपर, रीस्टाइल केलेले एलईडी डीआरएल आणि पुन्हा डिझाइन केलेले अलॉय व्हील्स मिळतात. Toyota Taisor मध्ये नव्या डिझाइनचे १६ इंच डायमंड कट अलॉय व्हिल्स मिळतात. टोयोटा टेसरचे केबिन नवीन सीट अपहोल्स्ट्रीसह नवीन थीमवर आधारित आहे. क्रॉसओवरमध्ये वायरलेस स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीसह मोठी इन्फोटेनमेंट स्क्रीन, सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, वायरलेस चार्जर, ॲम्बियंट लाइटिंग, स्टीयरिंग-माउंटेड कंट्रोल्स, ३६०-डिग्री सराउंड कॅमेरा आणि हेड-अप डिस्प्ले देण्यात आला आहे.

सुरक्षेसाठी एसयुव्हीत ६ एअरबॅग, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्राम, हिल होल्ड असिस्ट, इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रिब्यूशनसह अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम आणि आयएसओफिक्स चाईल्ड सीट एंकरेज देण्यात आलं आहे. कारमध्ये ग्राहकांना रंगांचेही अनेक पर्याय देण्यात आले आहेत.