bl01शालेय स्तरावरील मुलांसाठी वेगवेगळया उपक्रमांतून, कृतींमधून गणित शिकवलं गेल्यास मुलांना विषयाची गोडी लागेल व शिक्षकांवर गणित शिकविण्याचा व मुलांना गणित शिकण्याचा ताण कमी होईल. त्याविषयीचं कुतूहल निर्माण व्हावं यासाठी मूळ इंग्रजी असलेलं लेह मिलड्रेड बिअर्डस्ले यांचं व नागेश मोने यांनी अनुवादित केलेलं ‘१०० चौरसांचे अनेक उपयोग’ हे पुस्तक नक्कीच उपयोगी पडेल.
या पुस्तकाच्या मदतीने मुलांमध्ये गणिताची आवड निर्माण करता येईल. साध्या तसेच गुंतागुंतीच्या गणिती संकल्पना केवळ १०० चौरसांच्या वापरातून मुलांना समजू शकतील अशा अनेक बाबींचा या पुस्तकात समावेश आहेत.
१०० चौरसांचे अनेक उपयोग– लेह मिलड्रेड बिअर्डस्ले, अनुवाद- नागेश मोने-१५० रुपये.

bl04भारतीय खेळ
संजय दुधाणे यांच्या ‘भारतीय खेळ’ या पुस्तकात अनेक जुन्या आणि सध्या लुप्त झालेल्या खेळांची माहिती दिली आहे. या पुस्तकात हत्तीचा पाय, अलिबाबा आणि चाळीस चोर, लगोरी, डब्बा-पैसा अशा अनेक खेळांचा समावेश आहे. या पुस्तकात दिलेल्या खेळांसाठी किती खेळाडू लागतात, खेळण्याची जागा, पद्धत, साहित्य अशी इत्थंभूत माहिती लेखकाने दिली आहे. हल्ली संगणकावर बठे खेळ खेळण्याची सवय जडलेल्या मुलांना हे पुस्तक मदानावर खेळण्यास प्रोत्साहन देईल हे नक्की!
भारतीय खेळ- संजय दुधाणे,
साप्ताहिक विवेक, किंमत- ६० रुपये.

Anti-Rape Wears To Avoid Rape Cases:
Anti Rape Underwear काय काम करतात बघा; श्रीमंतीच्या वेडात उत्पादकांनी महिलांच्या ‘या’ प्रश्नांची उडवली खिल्ली
Nagpur, Smartphones, parents,
‘पाल्यांच्या कोवळ्या मनातील सुप्त प्रश्नांची उत्तरे पालकांनीच शोधावी’
new atm scam
एटीएमचा नवा कार्ड ट्रॅप घोटाळा; कफल्लक व्हायचं नसेल तर हे वाचाच
duvartanacha vedh marathi book
वर्तन कारणांचे उत्खनन

bl03भौतिकशास्त्रातील गमतीजमती
दिलीप गोडखिंडीकर यांचे ‘भौतिकशास्त्रातील गमतीजमती’ हे पुस्तक भौतिकशास्त्रासारख्या कठीण विषयाची सोप्या पद्धतीने ओळख करून देते. वजने-मापे, पदार्थ विज्ञान, उष्णता, विद्युत अशा अनेक गोष्टींविषयीची शास्त्रीय माहिती लेखकाने या पुस्तकात दिली आहे. या माहितीमुळे भौतिकशास्त्राशी संबंधित गोष्टी समजण्यास मदत होते.
भौतिकशास्त्रातील गमतीजमती- दिलीप गोटखिंडीकर, साप्ताहिक विवेक,
किंमत- ६० रुपये.

‘सोन्याचं फळ’, ‘बहादूर बल्लू’, ‘पंख नवे’
bl02लहानग्यांसाठी लेखन करणाऱ्या डॉ. लीला दीक्षित यांची ‘सोन्याचं फळ’, ‘बहादूर बल्लू’, ‘पंख नवे’ ही पुस्तके म्हणजे उत्तम कथांचा खजिनाच! या कथांमधले बालगोपाळ साहसी आहेत, हुशार, चिकित्सक आहेत.
‘सोन्याचं फळ’ या कथासंग्रहातील कथांमध्ये श्रीफळ, डाळिंब, जायफळ, कलिंगड, फणस, आंबा, रामफळ या फळांशी संबंधित मनोरंजक गोष्टी लेखिका सांगतात. पुरातन काळातील या कथा वाचताना लहानांबरोबरच मोठय़ांचेही मनोरंजन होते. ‘बहादूर बल्लू’ ही बालकादंबरिका आहे. साहसी बल्लूची ही कथा आहे. तो तुम्हा मुलांसारखाच आहे, पण त्याच्यात काही विशेष गुण आहेत. तो उत्तम गातो. पक्षीनिरीक्षणाची आवड असलेला हा बल्लू निसर्गावर भरभरून प्रेम करतो.
‘पंख नवे’ या पुस्तकातही बालमनावर उत्तम संस्कार होतील अशा कथा आहेत.
‘सोन्याचं फळ’, ‘बहादूर बल्लू’, ‘पंख नवे’- डॉ. लीला दीक्षित,
मधुराज पब्लिकेशन्स , किंमत- अनुक्रमे ५० रुपये, ९० रुपये, ६० रुपये.

आफ्रिकन लोककथा
सरिता वैद्य यांचं ‘आफ्रिकन लोककथा’ हे पुस्तक म्हणजे उत्तम बोधकथांचा नजराणाच! या कथांमधून आपल्याला माणसांच्या स्वभावातील अनेक पैलूंचे दर्शन घडते. त्याचबरोबर त्याच्यातील हव्यास, प्रयत्न, प्रेमळपणा असे विविध स्वभावपैलू दिसून येतात. या कथांमधील माणसे त्यांच्या वर्तनातून कसं वागावं वा कसं वागू नये, हे सांगतात. लहानग्यांना मूल्यसंस्कारांचं शिक्षण देणाऱ्या या कथा आहेत.
आफ्रिकन लोककथा- सरिता वैद्य, दिलीपराज प्रकाशन प्रा. लि., किंमत- ५० रुपये.

माणसातला देव
‘माणसातला देव’मधील सुहास बारटक्के यांच्या कथा मुलांना ‘माणूस’ म्हणून घडविणाऱ्या आहेत. जात-पात-धर्म यांपलीकडे दडलेली माणुसकी, साहसी मुलं, प्रेमळ आणि संस्कार करणारी आई.. असे अनेक पैलू या कथांना आहेत. साधी-सोपी भाषा, कथालेखनातील सहजता हे या कथांचे विशेष म्हणता येतील. माणसातला देव शोधणाऱ्या या कथा मनाला भावतात.
माणसातला देव- सुहास बारटक्के, दिलीपराज प्रकाशन प्रा. लि., किंमत- ८० रुपये.

शोध नावीन्याचा
जोसेफ तुस्कानो यांचे ‘शोध नावीन्याचा’ हे पुस्तक महान शोध लावणाऱ्या शास्त्रज्ञांच्या शोधांविषयीची माहिती देते. टेलिव्हिजन, स्टेथोस्कोप, विणकाम यंत्र, खनिज तेल, डायनाइट अशा विविध शोधांच्या शास्त्रज्ञांची व त्यांनी कसे शोध लावले याविषयीयची उत्तम माहिती या पुस्तकात आहे.
शोध नावीन्याचा- जोसेफ तुस्कानो, साप्ताहिक विवेक, किंमत- ६० रुपये.

साधे, सोपे, सुलभ जादूचे प्रयोग
जादूगार सुनील कामत यांचे ‘साधे, सोपे, सुलभ जादूचे प्रयोग’ हे पुस्तक म्हणजे मुलांना घरच्या घरी करता येण्यासारखे जादूचे प्रयोग आहेत. टेबलातून आरपार जाणारा खडू, दोरी कापून जोडणे, मोडलेली काडी जोडणे, कागद जाळून नोट तयार करणे अशा अनेक प्रयोगांचा समावेश या पुस्तकामध्ये आहे, जे करण्यासाठी तुम्हाला नक्कीच मौज वाटेल.
साधे, सोपे, सुलभ जादूचे प्रयोग- सुनील कामत, मनोरमा प्रकाशन, किंमत- ७५ रुपये.

बगळेपंत आणि बेडूकराव
शिवाजी सुतार यांचे ‘बगळेपंत आणि बेडूकराव’ हे पुस्तक म्हणजे छान छान कथांचा खजिना. ‘आजोबा, तुम्ही यायलाच हवं’ ही नाटय़छटा मनाचा वेध घेते. देवाघरी गेलेल्या आपल्या आईला शोधणाऱ्या छोटय़ा स्नेहाची गोष्ट मन हेलावून टाकते. मुलांवर संस्कार करणाऱ्या या कथा मनाचा ठाव घेतात.
बगळेपंत आणि बेडूकराव- शिवाजी सुतार, नवचैतन्य प्रकाशन, किंमत- ८० रुपये.