आज आपण साऱ्यांनाच भुरळ पाडणाऱ्या, समुद्रात आढळणाऱ्या एका सस्तन प्राण्याची माहिती घेऊ या. डय़ुगाँग किंवा समुद्री गाय या नावाने ओळखले जाणारे हे शाकाहारी प्राणी आश्चर्यकारकरीत्या हत्तींचे चुलत चुलत नातेवाईक असावेत तसे निगडित आहेत. तब्बल १० फुटांपर्यंत लांबी आणि ४०० किलोपर्यंत वजन एवढय़ा या समुद्री गायी वाढतात. पाणतीरासारखं नळीच्या आकाराचं शरीर, फिकट राखाडी रंग आणि पुढच्या पायांचा वल्ह्यंसारखा आकार यांसोबतच व्हेलसारखी शेपटी ही त्यांची वैशिष्टय़े समुद्री गायींची खास ओळख आहे. यांचं नाक नकटं-चपटं आणि डोळे व कान शरीराच्या मानाने फारच लहान असतात. नरांना खालच्या दिशेने वळलेले सुळे असतात. सस्तन असल्याने अर्थातच ते आपल्यासारखे हवेमध्ये श्वास घेतात. श्वास घेण्याकरिता ते वारंवार पाण्याच्या पृष्ठभागावर येतात, मात्र एकदा श्वास घेतल्यावर फक्त सहा मिनिटं ते पाण्याखाली राहू शकतात. पाण्यात शेपटीवर उभं राहून, पाण्याबाहेर डोकं काढून श्वास घेतानाही हे अनेकदा आढळतात. मात्र समुद्री गायी कधीच जमिनीवर येत नाहीत.

समुद्री गायी अनेक प्रकारच्या समुद्री गवतांवर दिवस-रात्र चरत असतात. तोटीसारख्या लांबट, संवेदनशील रोम (ब्रिसल्स) असलेल्या तोंडाने ते समुद्री गवत उपटून खातात, त्यामुळे दुरून पाहिल्यास एखाद्या व्हॅक्यूम क्लीनरसारखेच ते दिसतात. एकेकटे किंवा जोडीने आढळणाऱ्या समुद्री गायी क्वचितच मोठय़ा कळपांमध्ये दिसतात. श्रीलंका आणि भारतदरम्यानचे मन्नारचे आखात व पोक बे, गुजरात किनाऱ्याजवळचे कच्छचे आखात, आणि अंदमान व निकोबार बेटांच्या परिसरात समुद्री गायी आढळतात. पूर्वी मुबलक प्रमाणात आढळणाऱ्या समुद्री गायी आता मात्र मोजक्याच उरल्या आहेत- जेमतेम २००- अशी भीती समुद्रीपर्यावरणाचे अभ्यासक व्यक्त करतात.

Rising Temperatures in Maharashtra, Rising Temperatures in Maharashtra Lead to Increase in Heatstroke Patients, Heatstroke Patients in Maharashtra, Heatstroke Patients in Dhule, Heatstroke Patients in thane, Heatstroke Patients in wardha, thane, Dhule, wardha, Mumbai, Mumbai news,
धुळे, ठाणे, वर्ध्यात उष्माघाताच्या रुग्णसंख्येत वाढ, राज्यात उष्माघाताचे १८४ रुग्ण
Pune records highest temperature in April in eleven years
पुण्यात अकरा वर्षांतील एप्रिलमधील सर्वाधिक तापमानाची नोंद; तापमानाचा आलेख कसा चढा राहिला?
Heat wave in the state know where the heat wave warning is
राज्यात उष्णतेची लाट… जाणून घ्या उष्णतेच्या लाटेचा इशारा कुठे?
Nashik heats up temperature at 40.4 degree Celsius but sprinkles of rain in some areas
नाशिक तापले… पारा ४०.४ अंशावर, काही भागात पावसाचा शिडकावा

शब्दांकन : श्रीपाद

rushikesh@wctindia.org