बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेड ही बजाज फायनान्स लिमिटेडची उपकंपनी आहे, जी भारतातील मोठ्या आणि अत्यंत विविधिकृत फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपन्यांपैकी एक आहे. आज तिने होम लोन्सवर फेस्टिव्ह ऑफर घोषित केली आहे, ज्याच्या व्याजदराची सुरुवात पगारदार अर्जदारासाठी दरवर्षी ८.४५ टक्क्यांपासून सुरू होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फेस्टिव्ह ऑफरमध्ये संभाव्य ग्राहकाला ह्या उद्योगातील सर्वात कमी समान मासिक हप्त्याचा (EMI) लाभ मिळतो, ज्याची सुरुवात ७२९ दर लाख आहे.
तसेच ही ऑफर ७५० किंवा जास्त क्रेडिट स्कोअर असलेल्या अर्जदारांसाठी वैध आहे. होम लोनचं वाटप १३ सप्टेंबर २०२३ ते १२ नोव्हेंबर २०२३ दरम्यान होणार आहे.

हेही वाचाः ई-कॉमर्समधील ‘ही’ दिग्गज कंपनी लवकरच २००० रुपयांच्या नोटा स्वीकारणे बंद करणार; जमा करण्याची शेवटची तारीख काय?

संभाव्य ग्राहकांना कंपनीच्या वेबसाईटवर किंवा कोणत्याही शाखेत भेट देऊन होम लोन घेता येणार आहे. बजाज हाऊसिंग फायनान्सचे होम लोन्स अनेक वैशिष्ट्यांसह मिळतात, जसं परतफेडीचे सुलभ पर्याय आणि ४८ तासांमध्ये वाटप केले जाते. बजाज हाऊसिंग फायनान्सचे होम लोन्स इतर अनेक लाभांसोबत मिळतात, जसं परतफेडीचे सुलभ पर्याय, ४० वर्षांपर्यंत मुदत आणि तुमचा व्याजदर रेपो दराबरोबर जोडता येतो.

हेही वाचाः मुंबईतील सर्वात मोठा जमीन करार, शिल्पा शेट्टीचे रेस्टॉरंट बंद, बॉम्बे डाइंगची मालमत्ता ‘एवढ्या’ कोटींना विकणार

बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेडच्या नियम अन् अटी जाणून घ्या

बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेड ही बजाज फायनान्स लिमिटेडची १०० टक्के उपकंपनी आहे. जी भारतीय मार्केटमध्ये अत्यंत विविधिकृत एनबीएफसीपैकी एक आहे आणि देशातील ७२.९ मिलियनपेक्षा जास्त ग्राहकांना सेवा देते. बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचे प्रमुख कार्यालय पुण्यात असून, वैयक्तिक आणि व्यावसायिकांना घरे अथवा व्यावसायिक जागा खरेदी करायला आणि नूतनीकरण करायला अर्थपुरवठा करते. तसेच बिझनेस किंवा वैयक्तिक आवश्यकतांसाठी मालमत्तेच्या तारणावर लोन देते आणि बिझनेसचा विस्तार करण्यासाठी चालू भांडवल पुरवते. ही कंपनी निवासी आणि कमर्शिअल प्रॉपर्टी बांधणाऱ्या डेव्हलपर्सना अर्थपुरवठा करते आणि डेव्हलपर्स आणि जास्त मिळकत असलेल्या व्यक्तींना लीज रेंटल डिस्काऊंटिंग देते. बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेडने क्रिसिलकडून आणि इंडिया रेटिंग्सकडून उच्च क्रेडिट रेटिंग्स प्राप्त केले आहेत. कंपनीने दीर्घकालीन डेट प्रोग्रॅमसाठी AAA /स्टेबल मानांकन मिळवले आहे आणि अल्पकालीन डेट प्रोग्रॅमसाठी क्रिसिलकडून आणि इंडिया रेटिंग्सकडून A1+ मानांकन मिळवले आहे.

More Stories onबजाजBajaj
मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bajaj housing finance offering festive home loans interest rates start at 8 45 percent per annum vrd
First published on: 14-09-2023 at 14:07 IST