फेसबुकची मूळ कंपनी मेटाने प्रथमच आपल्या भागधारकांना लाभांश देण्याची घोषणा केली आहे. सीईओ मार्क झुकरबर्गला या लाभांशाचा मोठा फायदा होणार आहे. मेटाच्या या घोषणेमुळे झुकरबर्ग दरवर्षी सुमारे ७०० दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे ५८०० कोटी रुपये कमावणार आहेत, असंही ब्लूमबर्गच्या अहवालात म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

झुकरबर्गचे इतके शेअर्स आहेत

क्लास ए आणि क्लास बी कॉमन स्टॉकवर प्रत्येक तिमाहीत ५० पेन्स प्रति शेअर दराने रोख लाभांश देण्याबाबत मेटाने माहिती दिल्याचे रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे. लाभांशाचे हे पेमेंट मार्चपासून सुरू होणार आहे. मार्क झुकरबर्गकडे मेटाचे जवळपास ३५ कोटी शेअर्स आहेत. अशा प्रकारे त्यांना प्रत्येक तिमाहीत सुमारे १७५ दशलक्ष डॉलर्स मिळतील, जे संपूर्ण वर्षात ७०० दशलक्ष डॉलर्स बनतात.

हेही वाचाः Budget 2024 इलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) परिसंस्थेला चालना देण्यासाठी सरकारकडून महत्त्वाकांक्षी योजना जाहीर

…म्हणून मेटाचा लाभांश विशेष

मेटा यांचे हे पाऊल कौतुकास्पद मानले जात आहे. विशेषत: गुंतवणूकदारांना ते आवडते. साधारणपणे टेक कंपन्या त्यांच्या भागधारकांना लाभांश देत नाहीत. कमावलेला पैसा लाभांशावर खर्च करण्याऐवजी ते नवीन उत्पादनांवर किंवा नवीन अधिग्रहणांवर खर्च करतात.

हेही वाचाः Budget 2024 Highlights संरक्षण मंत्रालयासाठी अंतरिम केंद्रीय अर्थसंकल्प २०२४-२५ मध्ये विक्रमी ६.२१ लाख कोटी रुपयांची तरतूद

गेल्या वर्षी शेअर्स ३ पट वाढले

फेसबुकच्या मूळ कंपनी मेटासाठी गेले वर्ष खूप चांगले ठरले. २०२२ या वर्षात शेअर्समध्ये मोठी घसरण झाल्यानंतर मागील वर्ष हे रिकव्हरीचे ठरले. कंपनीने खर्च कमी करण्यासाठी आणि आपले प्राधान्यक्रम पुन्हा समायोजित करण्यासाठी गेल्या वर्षी २१ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढले होते. त्यानंतर २०२३ मध्ये मेटा शेअर्सची किंमत जवळपास ३ पटीने वाढली होती.

झुकरबर्ग पाचव्या क्रमांकाची श्रीमंत व्यक्ती बनली

मेटा शेअर्सच्या वाढीमुळे मार्क झुकरबर्गलाही खूप फायदा झाला आहे. प्रदीर्घ कालावधीनंतर मार्क झुकेरबर्ग पुन्हा एकदा जगातील पाच श्रीमंतांच्या यादीत सामील झाला आहे. फोर्ब्सच्या रिअलटाइम अब्जाधीशांच्या यादीनुसार, मार्क झुकरबर्गची सध्याची एकूण संपत्ती १३९.३ अब्ज डॉलर आहे. या संपत्तीमुळे तो आता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत पाचव्या स्थानावर पोहोचला आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Facebook will pay dividends for the first time mark zuckerberg will receive 700 million dollars vrd
First published on: 02-02-2024 at 13:46 IST