Gold-Silver Price Today: १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ७२,९५० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ७२,६५० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, चांदी ८३,९२० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ८३,६९० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार, मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ६६,७५२ रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ७२,८२० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६६,७५२ असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ७२,८२० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६६,७५२ तर २४ कॅरेट सोन्याचा दर ७२,८२० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ६६,७५२ आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ७२,८२० रुपये आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gold silver prices on saturday maharashtra 21 april 2024 mumbai pune nagpur nashik new price pdb
First published on: 21-04-2024 at 09:18 IST