लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी
मुंबई: भारताचा विकास दर मार्चअखेर संपलेल्या तिमाहीत मंदावून ६.७ टक्क्यांवर येईल, असा अंदाज ‘इक्रा’ या पतमानांकन संस्थेने मंगळवारी वर्तविला. सरलेल्या आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी विकास दर ७.८ टक्के राहील, असे तिचे अनुमान आहे.भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ सरलेल्या आर्थिक वर्षात जूनअखेर संपलेल्या तिमाहीत ८.२ टक्के, सप्टेंबरअखेर संपलेल्या तिमाहीत ८.१ टक्के आणि डिसेंबरअखेर संपलेल्या तिमाहीत ८.४ टक्के होती. ‘इक्रा’च्या मुख्य अर्थतज्ज्ञ आदिती नायर म्हणाल्या की, कमोडिटीच्या किमतीतून मिळणारा नफा आणि काही औद्योगिक क्षेत्रांतील नफा कमी झाल्याने भारताच्या एकूण मूल्यवर्धनाला (जीव्हीए) चौथ्या तिमाहीत फटका बसण्याचा अंदाज आहे. भारताचे सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) आर्थिक २०२२-२३ मधील चौथ्या तिमाहीत ६.१ टक्के होते. याचवेळी त्या आर्थिक वर्षात विकास दर ७ टक्के होता.

भारताच्या विकास दराची चौथ्या तिमाहीची आकडेवारी ३१ मे रोजी जाहीर होणार आहे. त्यावेळी २०२३-२४ या पूर्ण आर्थिक वर्षाची आकडेवारीही जाहीर होईल. सरलेल्या आर्थिक वर्षातील तिसऱ्या तिमाहीत सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) आणि एकूण मूल्यवर्धन (जीव्हीए) यांच्यातील फरक १ टक्क्याच्या आसपास असेल. त्याआधीच्या तिमाहीत हा फरक १.८५ टक्के होता. सरलेल्या आर्थिक वर्षासाठी सकल देशांतर्गत उत्पादन ७.८ टक्के आणि एकूण मूल्यवर्धन ७ टक्के राहील, असे ‘इक्रा’ने नमूद केले आहे.

Sensex moves towards record 77000 celebratory reaction to RBIs optimism on economy
‘सेन्सेक्स’ची विक्रमी ७७,०००च्या दिशेने कूच, अर्थव्यवस्थेबाबत रिझर्व्ह बँकेच्या आशावादाचे उत्सवी पडसाद
Inflation forecast remains at 4.5 percent
महागाई दराचा अंदाज ४.५ टक्क्यांवर कायम
Growth rate forecast increased to 7 2 percent However there is no relief from the Reserve Bank of interest rate reduction
विकासदर अंदाज वाढून ७.२ टक्क्यांवर; रिझर्व्ह बँकेकडून मात्र व्याजदर कपातीचा दिलासा नाहीच!
Sensex Nifty down six percent
मतदानोत्तर अंदाजातून कमावलेले, मतमोजणीनंतर गमावले; सेन्सेक्स-निफ्टीची सहा टक्क्यांनी आपटी
lic preparation for expansion in health insurance sector
‘एलआयसी’ आरोग्य विम्यात विस्ताराच्या तयारीत
about rs 1 91 lakh crores worth of common people lying unclaimed in different investment plan
जनसामान्यांची सुमारे १.९१ लाख कोटींची संपत्ती दाव्याविना पडून; बँक ठेवी, शेअर्स, म्युच्युअल फंड, पीएफचा प्रचंड पैशाला हक्कदारच नाही!
Vilas Transcore SME IPO is open for investment from May 27
विलास ट्रान्सकोअरचा ‘एसएमई आयपीओ’ २७ मेपासून गुंतवणुकीस खुला
Economy momentum from the first quarter Optimism in Reserve Bank Monthly Bulletin
अर्थव्यवस्थेला गतिमानता पहिल्या तिमाहीपासूनच! रिझर्व्ह बँकेच्या मासिक पत्रिकेत आशावाद

हेही वाचा >>>हाँगकाँगच्या आरोपानंतर आता एव्हरेस्ट आणि एमडीएच मसाल्यांच्या प्रोसेसिंग युनिटची तपासणी करण्याचे आदेश

गेल्या वर्षी मोसमी पाऊस कमी पडल्याने शेतीचे उत्पादन कमी झाले होते. आता ग्रामीण अर्थव्यवस्थेला उभारी मिळू लागली असून, मागणी वाढण्याची चिन्हे आहेत. देशांतर्गत ट्रॅक्टर विक्री चौथ्या तिमाहीत वाढली आहे.- आदिती नायर, मुख्य अर्थतज्ज्ञ, इक्रा