Post Office Small Savings Scheme for Children : मुलाच्या जन्मासोबतच त्यांच्या भविष्यासाठी आर्थिक नियोजन करणे अत्यंत गरजेचे आहे. आर्थिक नियोजन न केल्यास मुलांच्या उच्च शिक्षणात किंवा लग्नात पैशाबाबत अचानक दबाव वाढू शकतो. अशा अनेक सरकारी योजना आहेत, ज्यात मुलांच्या नावावर गुंतवणूक करू शकता. यामध्ये २ योजना सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी आणि सुकन्या समृद्धी योजना दीर्घकालीन गुंतवणुकीला प्रोत्साहन देणाऱ्या आहेत. तसेच त्यांच्यामध्ये गुंतवणूक करून आपण मुलांसाठी एक फॅट फंड तयार करू शकता. सध्याच्या दोन्ही गुंतवणुकीच्या अतिशय लोकप्रिय योजना आहेत, ज्या पूर्णतः सुरक्षित आहेत.

PPF आणि SSY ची तुलना कशी करावी?

PPF आणि SSY ची येथे तुलना केली जात आहे, कारण दोन्ही दीर्घकालीन बचत योजना आहेत. दोन्हीमध्ये गुंतवणुकीची मर्यादा दरवर्षी १.५० लाख रुपये आहे. PPF मध्ये १५ वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागते, त्याची मॅच्युरिटी फक्त १५ वर्षे असते. दुसरीकडे सुकन्या समृद्धी योजनेची मॅच्युरिटी २१ वर्षे असली तरी यामध्येही केवळ १५ वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागेल. उर्वरित ६ वर्षांसाठी तुमच्या पैशांवर व्याज जोडून ​​तुम्हाला मुदतपूर्तीवर रक्कम मिळते. दोन्ही योजना पोस्ट ऑफिसद्वारे चालवल्या जात आहेत. दोन्हीची सुरुवात मुलांच्या नावाने करता येते. दोन्हीमध्ये RD प्रमाणे कमाल मर्यादा मासिक आधारावर गुंतवणूक केली जाऊ शकते.

Dilemma of onion growers for 14 months in last five years
गेल्या पाच वर्षांतील १४ महिने कांदा उत्पादकांची कोंडी
Request for application from Reserve Bank to Small Finance Bank for conversion to regular banks
नियमित बँकांमध्ये रूपांतरणासाठी रिझर्व्ह बँकेकडून लघुवित्त बँकाकडे अर्जाची मागणी
Loksatta explained What are the reasons for the fall of the rupee against the dollar and what are its consequences
गेल्या १० वर्षांत २८.३ टक्के घसरण… डॉलरपुढे रुपयाची घसरण आणखी कुठपर्यंत? कारणे काय? परिणाम काय?
should i file income tax
विश्लेषण : लगेचच आयटीआर दाखल करण्यासाठी घाई का करू नये?

हेही वाचाः १२००० रुपयांच्या कर्जातून व्यवसायाला सुरुवात अन् आज २.५ लाख कोटींची कंपनी स्थापून जगाला विकतोय सोनं, कोण आहेत राजेश मेहता?

कर लाभ ३ प्रकारे मिळतील

सुकन्या समृद्धी योजना आणि पीपीएफ या करमुक्त योजना आहेत. ईईई म्हणजेच कर सूट तीन वेगवेगळ्या स्तरांवर उपलब्ध आहेत. प्रथम प्राप्तिकर कायद्याच्या कलम ८० सी अंतर्गत १.५० लाखांपर्यंतच्या वार्षिक गुंतवणुकीवर सूट मिळते. दुसरे म्हणजे त्यातून मिळणाऱ्या रिटर्नवर कोणताही कर नाही. तिसरे म्हणजे मॅच्युरिटीवर मिळणारी रक्कम करमुक्त असते.

हेही वाचाः TCS च्या माजी सीईओंच्या कमाईत १३.१७ टक्क्यांची वाढ, यंदाच्या वर्षात कमावले ‘इतके’ कोटी

PPF: रिटर्न कॅल्क्युलेटर

कमाल मासिक ठेव: १२,५०० रुपये
कमाल वार्षिक ठेव: १,५०,००० रुपये
व्याज दर: वार्षिक ७.१ % चक्रवाढ
१५ वर्षांनंतर परिपक्वतेवर रक्कम: ४०,६८,२०९ रुपये
एकूण गुंतवणूक: २२,५०,०००
व्याज लाभ: १८,१८,२०९ रुपये

SSY: रिटर्न कॅल्क्युलेटर

SSY वर व्याज: ८ % प्रतिवर्ष
कमाल गुंतवणूक: १.५० लाख रुपये प्रतिवर्ष
१५ वर्षांत गुंतवणूक: २२,५०,००० रुपये
२१ वर्षांच्या मॅच्युरिटीवर एकूण रक्कम: ६९,८०,१०० रुपये
व्याज लाभ: ४७,३०,१०० रुपये