लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी 

मुंबई: व्यावसायिक आस्थापने, कार्यालये, औद्योगिक आणि निवासी क्षेत्राची सुरक्षा, पाळत व देखरेखीच्या क्षेत्रातील नवे प्रवाह आणि उपाययोजना, तंत्रसाधने व अद्ययावत उत्पादनांच्या व्यापक श्रेणीला सामावून घेणारे ‘सेफ वेस्ट इंडिया’ प्रदर्शनाचे दुसरे पर्व मुंबईत गोरेगावस्थित बॉम्बे एक्झिबिशन सेंटरमध्ये गुरुवारी सुरू झाले. सर्व प्रकारच्या धोक्यांना प्रतिबंध आणि सुरक्षा हा शहरी जीवनशैलीतील महत्त्वपूर्ण पैलू याच्याशी निगडित उपाय व साधनांची बाजारपेठही दमदार २४ टक्के अधिक दराने वाढत जात, २०२९ पर्यंत आजच्या तुलनेत तिप्पट म्हणजे ७३६ कोटी डॉलरचा टप्पा गाठेल, असा विश्वास उद्घाटन सत्रात व्यक्त करण्यात आला.

Air India Express staff fell ill suddenly
एअर इंडिया एक्स्प्रेसचे कर्मचारी सामूहिकरीत्या अचानक पडले आजारी; आंदोलनासाठी वैद्यकीय रजेचा वापर कशासाठी?
The Index of Industrial Production IIP recorded a growth of 4 9 percent in March
औद्योगिक उत्पादन मंदावले, मार्चमध्ये वाढीचा दर ४.९ टक्के; तर आर्थिक वर्षात ५.८ टक्के
Go Digit 2615 crore IPO to Virat Kohli could yield a multiple return of 263 percent
‘गो डिजिट’चा २,६१५ कोटींचा ‘आयपीओ’ विराट कोहलीला २६३ टक्क्यांचा बहुप्रसवा परतावा शक्य
reserve bank
सोने तारण कर्जाचे रोखीत वितरण २०,००० रुपयांच्या मर्यादेपर्यंतच ;वित्तीय कंपन्यांना काटेकोर पालनाचे रिझर्व्ह बँकेचे निर्देश
Goldman Sachs forecasts
भारत वैश्विक ‘सेवा आगार’ बनेल ! निर्यात २०३० पर्यंत ८०० अब्ज डॉलरवर जाण्याचा गोल्डमन सॅक्सचा आशावाद
bank of maharashtra
‘महाबँके’चे ७,५०० कोटींचे निधी उभारणीचे लक्ष्य; मार्च तिमाहीत निव्वळ नफा १,२१८ कोटींवर
One to three prize shares from moTilal Oswal Financial
मोतीलाल ओसवाल फायनान्शियलकडून एकास तीन बक्षीस समभाग; नफा चारपट वाढीसह ७२४ कोटींवर
Transaction of more than 1000 crore shares of Vodafone Idea a private sector telecom company
व्होडा-आयडियाच्या उलाढालीचा विक्रम; १,००० कोटी समभागांचे व्यवहार

इन्फॉर्मा मार्केट्सद्वारे आयोजित हे तीन दिवसांचे सुरक्षा आणि अग्नीशमन साधनांना वाहिलेले प्रदर्शन ९ मे ते ११ मे २०२४ असे सुरू राहिल. उद्घाटन सत्रात, अमेरिकन सोसायटी फॉर इंडस्ट्रियल सिक्युरिटीचे सहाय्यक प्रदेश उपाध्यक्ष संजीव तिवारी, आदित्य बिर्ला मॅनेजमेंट कॉर्पोरेशनचे संदीप सभरवाल, ट्रेड असोसिएशन ऑफ इन्फर्मेशन टेक्नोलॉजीचे उपाध्यक्ष विजय गोयल, राज्य शासनाच्या गृहमंत्रालय, पोलीस व सायबर सल्लागार, प्रा. अमोल देशमुख उपस्थित होते. पश्चिम भारताच्या बाजारपेठेसाठी विशेषत्वाने तयार करण्यात आलेले प्रतिबंधात्मक तंत्रज्ञान व नव्या संकल्पनांवर यात लक्ष केंद्रित करण्यात आले आहे, असे इन्फॉर्मा मार्केट्सचे व्यवस्थापकीय संचालक योगेश मुद्रास म्हणाले. प्रदर्शनाच्या निमित्ताने सीसीटीव्ही, सर्व्हेलन्स, बायोमेट्रिक, स्वयंचलित प्रवेश यंत्रणा, ॲक्सेस कंट्रोल, जीपीएस, वायफाय राउटर्स, स्पाय कॅमेरा, वीजपुरवठा आणि सीसीटीव्ही केबल्स अशा उत्पादनांचे देशा-विदेशातील ७५ हून अधिक प्रतिष्ठित नाममुद्रा एकत्र आले असून, त्यांची सर्व उत्पादने व तंत्र-उपाय लोकांना पाहता येतील.