सुमारे ३० वर्षांपूर्वी स्थापन झालेली केएनआर कन्स्ट्रक्शन्स प्रामुख्याने रस्ते, पूल, उड्डाणपूल आणि सिंचन प्रकल्पांच्या बांधकामात गुंतलेली आहे. कंपनीच्या सेवांमध्ये ईपीसी, बीओटी आणि हायब्रिड ॲन्युइटी मॉडेल (एचएएम) तत्त्वावर रस्ते, महामार्ग, पूल आणि उड्डाणपूल बांधण्याचा समावेश आहे. कंपनी सिंचन प्रकल्प, शहरी जल पायाभूत सुविधा व्यवस्थापन आणि कृषी प्रकल्पदेखील हाती घेते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या २५ वर्षांत कंपनीने बारा राज्यांत १६,१९८ कोटी रुपयांचे ७९ प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण केले असून भारतीय बाजारपेठेत स्वतःचे स्थान प्रस्थापित केले आहे. तसेच आपल्या प्रकल्प अंमलबजावणीची क्षमता मजबूत असल्याचे सिद्ध केले आहे. केएनआरने आजपर्यंत भारतातील बारा राज्यांत ८,७०० किलोमीटरपेक्षा जास्त रस्ते प्रकल्प यशस्वीरीत्या कार्यान्वित केले आहेत. नियोजित वेळेपूर्वी प्रकल्पांच्या अंमलबजावणीचा आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून लवकर पूर्ण होण्याच्या बोनसची पावती याचा ट्रॅक रेकॉर्ड आहे. कंपनीचा इन-हाउस ईपीसी विभाग बीओटी/एचएएम रस्ते प्रकल्पांसाठी सर्व प्रकल्प अंमलबजावणी करतो. कर्नाटक, तेलंगणा आणि बिहारमध्ये केएनआरचे ६६८ किलोमीटरचे प्रकल्प असून सुमारे ९,६१८ कोटी रुपयांचे ८ हायब्रिड ॲन्यूटी मॉडेल (एचएएम) प्रकल्प आहेत. आपले प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण करण्यासाठी कंपनीकडे १,२७५ कुशक कर्मचारी असून सुमारे १,६४६ कोटी रुपयांची स्वतःची यंत्रसामुग्री आहे.

हेही वाचा…अशी होते म्युचुअल फंडाची ‘अल्फा’निर्मिती

कंपनीच्या एकूण महसुलापैकी सिंचनचा २६ टक्के, रस्ते (हायब्रिड ॲन्यूटी मॉडेल) ४४ टक्के तर इतर रस्त्यांचा ३० टक्के वाटा आहे. कंपनीच्या काही ग्राहकांमध्ये भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय), रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय, तेलंगणा सरकार, कर्नाटक राज्य महामार्ग सुधारणा प्रकल्प, मध्य प्रदेश रस्ते विकास महामंडळ लिमिटेड, इंजिनीअर्स इंडिया लिमिटेड, एनएमडीसी, जीएमआर प्रॉजेक्ट, सद्भाव इंजिनीअरिंगचा समावेश आहे. केवळ ०.२५ टक्के डेट-इक्विटी गुणोत्तर असलेल्या केएनआर कन्स्ट्रक्शनने कायम उत्तम कामगिरी करून दाखवली आहे. डिसेंबर २०२३ अखेर सरलेल्या तिमाहीत कंपनीने १,०३८ कोटी रुपयांच्या उलाढालीवर १४७ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. गेल्या आर्थिक वर्षातील याच कालावधीच्या तुलनेत तो २८ टक्क्यांनी वधारला आहे. कंपनीकडे डिसेंबर २०२३ पर्यंत ६,७४४ कोटी रुपयांचा प्रलंबित कार्यादेश असून आगामी कालावधीत यांत वाढ होण्याची शक्यता आहे. गेल्याच महिन्यात कंपनीने तेलंगणा सरकारबरोबर १,२६३ कोटी रुपयांच्या संयुक्त प्रकल्पासाठी करार केला आहे. एलिव्हेटेड मेट्रो रेल्वे आणि रेल्वे प्रकल्पांच्या बांधकामाच्या क्षेत्रात कंपनीला अधिक व्यावसायिक अनुलंब जोडणे हे केएनआरचे उद्दिष्ट आहे. केवळ ०.४ बिटा असलेली ही केएनआर सध्याच्या भावात एक आकर्षक गुंतवणूक वाटते.

केएनआर कन्स्ट्रकशन लिमिटेड

(बीएसई कोड ५३२९४२)

प्रवर्तक: के नरसिंहा रेड्डी

संकेतस्थळ: http://www.knrcl.com

बाजारभाव: रु.२५६/-

प्रमुख उत्पादन/ व्यवसाय: बांधकाम/ ईपीसी

भरणा झालेले भाग भांडवल: रु. ५६.२५ कोटी

हेही वाचा…बाजारातली माणसं : प्रवाहाविरुद्ध जाणारा निधी व्यवस्थापक – अँथनी बोल्टन

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

पुस्तकी मूल्य: रु. १०९

दर्शनी मूल्य: रु. २/-

लाभांश: १३%

प्रति समभाग उत्पन्न: रु. २०.३२

किंमत उत्पन्न गुणोत्तर: १३

समग्र किंमत उत्पन्न गुणोत्तर: १७.५

डेट इक्विटी गुणोत्तर: ०.२५

इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर: ८.७९

रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉइड (ROCE): २०.८

हेही वाचा…तेजीला पूर्णविराम की स्वल्पविराम?

बीटा :०.४

बाजार भांडवल: रु. ७,१९१ कोटी (स्मॉल कॅप)

वर्षभरातील उच्चांक/ नीचांक: ३०६/२२४

Stocksandwealth@gmail.com

मराठीतील सर्व बाजार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article on portfolio of stock market knr constructions limited company share print eco news psg