भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या फंडांपैकी एक असलेल्या मिरे अ‍ॅसेट म्युच्युअल फंडाने मुदतमुक्त श्रेणीतील मिरे अ‍ॅसेट मल्टीकॅप फंड आणत असल्याची घोषणा केली आहे. लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप समभागांमध्ये गुंतवणूक करणारी ही समभाग योजना आहे. फंडाचा एनएफओ २८ जुलै २०२३ रोजी गुंतवणुकीसाठी खुला होत आहे आणि येत्या ११ ऑगस्ट २०२३ ला बंद होईल. या फंडाचे व्यवस्थापन अंकित जैन करतील.

पाच वर्षांपेक्षा अधिक गुंतवणुकीचा कालावधी असलेल्या गुंतवणूकदारांसाठी गुंतवणुकीचा हा एक पर्याय आहे. आपल्या इक्विटी पोर्टफोलिओत बाजार भांडवली मूल्यामध्ये विविधता आणू पाहत असलेले किंवा गुंतवणूक योजनांची संख्या मर्यादित राखू इच्छिणाऱ्यांसाठी हा फंड योग्य पर्याय आहे. कारण त्यातून बाजाराच्या संपूर्ण भांडवली मूल्याच्या श्रेणीत प्रवेशाची संधी मि‌ळते. प्रत्येक प्रकारात किमान २५ टक्के आणि कमाल ५० टक्के वाटप, त्यामुळे विविध प्रकारांत समसमान सहभाग निश्चित होतो. लार्ज कॅप गुंतवणूक ही बाजार भांडवलीमूल्यानुसार आघाडीच्या १०० समभागांमध्ये केली जाईल. या प्रकाराच्या समभागांतील समाविष्ट कंपन्यांनी व्यवसायात स्थिरतेची पातळी गाठलेली आणि प्रामुख्याने प्रबळ कंपन्यांचा समावेश असेल. त्यामुळे मिड आणि स्मॉल कॅपच्या तुलनेत जोखीम आणि अस्थिरता हे दोन्ही अतिशय अल्प प्रमाणात राहते. मिड कॅपमध्ये भांडवली बाजारमूल्यानुसारच्या क्रमवारीत १०१ ते २५० दरम्यानच्या म्हणजेच दीडशे समभागांचा समावेश राहणार आहे. या समभागांत वाजवी मूल्यांकनांसह मोठ्या प्रमाणावर उदयास येत असलेल्या व्यवसायांचा समावेश होतो.

Mango pulp, industry, business
आंबा पल्प उद्योग अडचणीत, गेल्या वर्षाचा ३० टक्के पल्प पडून ?
Dilemma of onion growers for 14 months in last five years
गेल्या पाच वर्षांतील १४ महिने कांदा उत्पादकांची कोंडी
stock market, 3 7 crore dmat accounts
सरलेल्या आर्थिक वर्षात ३.७ कोटी डिमॅट खात्यांची भर
During the financial year the market value of 80 companies exceeded lakhs of crores
सरलेल्या आर्थिक वर्षात ८० कंपन्यांचे बाजारमूल्य लाख कोटींपुढे

स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये भांडवली बाजारमूल्यानुसार २५१ आणि त्यापुढील समभागांचा समावेश असून, त्यात नुकत्याच सुरू झालेल्या आणि क्षमता प्रकटीकरणासह व्यवसायात वाढीला प्रचंड वाव असलेल्या कपन्यांचा समावेश आहे. या समभागामध्ये जोखीम अधिक असली तरी त्यांच्यात अल्फा प्रकारचा परतावा मिळवून देण्याची प्रचंड क्षमता आहे. उर्वरित २५ टक्के गुंतवणूक ही अतिशय कौशल्यपूर्ण राहणार असून, विविध प्रकारच्या भांडवली बाजारमूल्यात लवचिक पद्धतीने गुंतवणूक करत संधीचा लाभ घेतला जाणार आहे.

हेही वाचाः Money Mantra : कर वाचवण्यासाठी पालकांना भाडे देता येते का? नियम काय सांगतो?

मिरे ऍसेट मल्टिकॅप फंड भांडवलीकरण आणि क्षेत्रनिरपेक्ष असल्याने गुंतवणूकदारांना उत्कृष्टतेचे नानाविध लाभ तसेच अर्थव्यवस्थेतील तांत्रिक बदलांची प्रचिती देणाऱ्या समभाग आणि क्षेत्रांमध्ये सातत्याने गुंतवणुकीचा अनुभव प्रदान करतो. ज्या गुंतवणूकदारांना आपला पोर्टफोलिओ मोठ्या प्रमाणात विस्तारायचा नाही, परंतु सर्व क्षेत्रातील सर्वोत्तम गोष्टींचा लाभ मिळवायचा आहे, त्यांच्यासाठी हा फंड उत्तम संधी आहे.

मिरे ऍसेट मल्टीकॅप फंडाचे फंड व्यवस्थापक अंकित जैन म्हणाले, “सुरुवातीपासूनच, गुंतवणुक धोरणानुसार आमच्या गुंतवणूकदारांचा परतावा अधिकाधिक उंचावण्यास सक्षम करणारे विविध पर्याय सादर करण्याचा आमचा प्रयत्न आहे. गुंतवणूकदारांच्या गुंतवणूकीला अनेक योजनांची जोड न देता त्यांची गुंतवणूक संपूर्ण बाजारमूल्यश्रेणीत विस्तारित करण्यास गुंतवणूकदारांना सक्षम करण्याच्या तत्वाचे पालन मिरे ऍसेटचा हा मल्टीकॅप फंड करतो. मिरेच्या मल्टीकॅप फंडाच्या लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप समभागांमधील गुंतवणूकीमुळे संधी आणि जोखमीत वैविध्य येते आणि त्यामुळे जोखीम आणि लाभ संतुलित करणारा तो एक लवचिक पर्याय बनतो.”

हेही वाचाः ”भारतात या अन् गुंतवणूक करा,” पंतप्रधान मोदींची जागतिक चिप निर्मात्यांना साद

जैन पुढे म्हणाले, “जागतिक आर्थिक वातावरणात अस्थितरता असूनही, भारतीय अर्थव्यवस्थेने प्रभावी वाढीचे मार्गक्रमण सुरू ठेवले आहे. मिरे ऍसेट मल्टिकॅप फंड आपल्या गुंतवणूकदारांसाठी विविध क्षेत्रातील रोमांचक सकारात्मक घडामोडींचा लाभ घेणे आणि ते मिळवून देणे ही दोन्ही उद्दिष्ट ठेवतो.” मिरे ऍसेट मल्टीकॅप फंड गुंतवणूकदारांना नियमित योजना आणि थेट योजना या दोन्ही प्रकारांमध्ये उपलब्ध असेल. एनएफओनंतर, किमान एक हजार रुपये आणि त्यानंतर एक रुपयांच्या पटीत अतिरिक्त गुंतवणूक करता येईल.