लिखिथा इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (बीएसई कोड ५४३२४०)
प्रवर्तक: श्रीनिवासराव गड्डीपती

बाजारभाव: रु. २८३/-
प्रमुख उत्पादन/ व्यवसाय: तेल-वायू वाहिन्या/ इन्फ्रा
भरणा झालेले भाग भांडवल: रु. १९.७३ कोटी

Mixed trend in global markets and selling by investors in banking finance and consumer goods stocks
पाच सत्रातील तेजीला खिंडार; नफावसुलीने ‘सेन्सेक्स’ला सहा शतकी झळ
One to three prize shares from moTilal Oswal Financial
मोतीलाल ओसवाल फायनान्शियलकडून एकास तीन बक्षीस समभाग; नफा चारपट वाढीसह ७२४ कोटींवर
easy trip planners limited, company share, stock market, share market, portfolio, share market portfolio, stock market portfolio, easemytrip, trip planning company, holiday planning company, holiday packages, trip planning service, airline ticket service, finance article,
माझा पोर्टफोलियो : प्रवास सोपा नाही म्हणून!
Pune model of co-working space From start-ups to large companies everyone is getting preference
को- वर्किंग स्पेसचे पुणेरी मॉडेल! स्टार्टअपपासून मोठ्या कंपन्यांपर्यंत सर्वांचीच मिळतेय पसंती

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक ७०.०२
परदेशी गुंतवणूकदार ०.६७

बँकस्/ म्युच्युअल फंड्स/ सरकार —
इतर/ जनता २९.३१
पुस्तकी मूल्य: रु. ७०.१

दर्शनी मूल्य: रु. ५/-
लाभांश: ३०%

प्रति समभाग उत्पन्न: रु. १६.१
किंमत उत्पन्न गुणोत्तर: १७.८

समग्र किंमत उत्पन्न गुणोत्तर: २२.४
डेट इक्विटी गुणोत्तर: ००

इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर: ६४
रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉइड : ३६.२

बीटा : १.४
बाजार भांडवल: रु. १,११९ कोटी (स्मॉल मायक्रो कॅप)

वर्षभरातील उच्चांक/ नीचांक: ३४३/१९२

मुख्यत्वे गॅसपुरवठा पाइपलाइन, सिंचन कालवे, कालव्यांवर पूल बांधणे आणि संबंधित देखभाल कार्ये या पायाभूत सुविधांच्या व्यवसायात, लिखिथा इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड ही २५ वर्षांपासून कार्यरत कंपनी आहे. भारतातील तेल आणि वायू कंपन्यांना संबंधित सुविधांच्या बांधकामासह पाइपलाइनचे जाळे तसेच परिचालन आणि देखभाल सेवा ती प्रदान करते. भारतातील १७ राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये कंपनी कार्यरत आहे. सध्या कंपनीने चालू प्रकल्पांसाठी स्टील आणि मध्यम-घनता पॉलिथिलीन (एमडीपीई) नेटवर्कसह सुमारे १,५०० किलोमीटर तेल आणि गॅस पाइपलाइन टाकल्या आहेत. सध्या चालू असलेल्या प्रकल्पांसाठी कंपनी १,००० किलोमीटरची पाइपलाइन टाकत आहे. भारत आणि नेपाळला जोडणारी पहिली ट्रान्स-नॅशनल हायड्रोकार्बन (मल्टी-प्रॉडक्ट) पाइपलाइन कार्यान्वित करणारी ही दक्षिण पूर्व आशियातील पहिली कंपनी आहे.

शहर गॅस वितरण प्रकल्पांमध्ये पाइपलाइनच्या नेटवर्कद्वारे घरगुती, वाणिज्यिक किंवा औद्योगिक आणि वाहतूक क्षेत्रातील ग्राहकांना नैसर्गिक वायूचा पुरवठा व वितरण केले जाते. लिखिथा आपल्या ग्राहकांना देखभाल सेवादेखील पुरवते. त्यांत गॅस नेटवर्कसाठी व्यवस्थापन सेवा, इतर दुरुस्ती, आधुनिकीकरण, शेड्युल्ड शटडाऊन, तसेच विद्यमान पाइपलाइनचे ओव्हरहॉलिंग आणि देखभाल यांचा समावेश होतो. कंपनीने आजपर्यंत मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात, दिल्ली इ. अनेक राज्यांमध्ये प्रकल्प पूर्ण केले आहेत. कंपनीच्या प्रमुख ग्राहकांत अवंतिका गॅस लिमिटेड, गेल इंडिया लिमिटेड, इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड, इंडियन ऑइल, अदानी गॅस प्रायव्हेट लिमिटेड आणि ओएनजीसीसारख्या दिग्गज कंपन्यांचा समावेश होतो. भारताबाहेर सेवा पुरवण्यासाठी कंपनीने नेपाळ आणि सौदी या देशांमध्ये उपकंपन्या स्थापन केल्या आहेत.

गेल्या आर्थिक वर्षांत ४०० कोटी रुपयांच्या उलाढालीवर ६४ कोटी रूपयांचा नफा कमावणाऱ्या लिखिथा इनफ्रास्ट्रक्चरचे सप्टेंबर २०२३ साठीच्या तिमाहीचे निकाल उत्साहवर्धक आहेत. या दुसऱ्या तिमाहीत कंपनीने गत वर्षीच्या तुलनेत ३१ टक्के वाढीसह १०९ कोटी रुपयांच्या उलाढालीवर १५.५७ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. गेल्या आर्थिक वर्षातील तिमाहीच्या तुलनेत तो ७ टक्क्यांनी अधिक आहे. ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत कंपनीचे ऑर्डर बुक सुमारे १,६७५ कोटी रुपयांचे होते. यामध्ये भारत पेट्रोलियम आणि गेल या कंपन्यांच्या सीमा-पार (क्रॉस कंट्री) पाइपलाइन आणि संबंधित सुविधांचा समावेश आहे

अनुभवी प्रवर्तक आणि कुठलेही कर्ज नसलेल्या लिखिथा इन्फ्रास्ट्रक्चरकडून आगामी कालावधीत उत्तम कामगिरीची अपेक्षा आहे. एक दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून या स्मॉल कॅप कंपनीचा पोर्टफोलियोमध्ये समावेश करू शकता.

सध्याची शेअर बाजारातील अनिश्चितता पाहता हा शेअर सुचवलेल्या किमतीपेक्षा कमी भावात मिळू शकतो, म्हणून प्रत्येक मंदीत तसेच टप्प्याटप्प्याने शेअर खरेदीचे धोरण ठेवावे.

काही वाचकांनी ‘पोर्टफोलियो’ सदरात उच्चांकावर असलेले शेअर न सुचवण्याची विनंतीवजा सूचना केली आहे. त्याला उत्तर पुढीलप्रमाणे:

  • शेअर बाजार निर्देशांक उच्चांकावर असताना अपवाद वगळता बहुतांश शेअर्स उच्चांकावरच असणार. जाहीर झालेले आर्थिक निष्कर्ष, आगामी कालावधीत अपेक्षित असलेली कंपनीची कामगिरी आणि कंपनीचे क्षेत्र या बाबी लक्षात घेऊन गुंतवणूक करावी.
  • उच्चांकावर असलेला शेअर जर कंपनीची कामगिरी उत्तम असेल तर नवनवीन उच्चांक प्रस्थापित करतो. तसेच कामगिरी खराब असेल तर नीचांकाच्याही खाली जातो, याचा अनुभव नियमित वाचकांना आहेच. याच सदरातून उच्चांकावर सुचवलेले अनेक शेअर्स आज काही पटीत वाढले आहेत.
  • किंमत आणि मूल्य यातील फरक जाणून घ्या. या संबंधाने आधीही याच सदरात लिहिले आहे.
  • सर्वात महत्त्वाचे म्हणजे या सदरात सुचवलेले शेअर्स हे केवळ मार्गदर्शनपर आहेत. गुंतवणूक तुमच्या जबाबदारीवर आणि आर्थिक सल्लागाराच्या साहाय्याने करावी.


Stocksandwealth@gmail.com

प्रस्तुत लेखामध्ये सुचवलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भागभांडवलाच्या १% पेक्षा कमी आहे. तसेच सुचवलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेट वस्तू घेतलेली नाही.

लेखात सुचवलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर अथवा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.