वर्ष १९६१ मध्ये स्थापन झालेली इंडियन मेटल्स अँड फेरो अलॉय लिमिटेड (इम्फा) ही भारतातील फेरो क्रोमची एक अग्रगण्य उत्पादक आहे. कंपनीचे उत्पादन प्रामुख्याने स्टेनलेस स्टीलच्या उत्पादनासाठी वापरली जाते. इंडियन मेटल्स भारतातील सर्वात मोठी एकात्मिक (मायनिंग ते स्मेल्टिंग) फेरो क्रोम उत्पादक असून भारतीय बाजारपेठेतील २० टक्के हिस्सा तसेच देशांच्या फेरो क्रोम निर्यातीतील २५ टक्के वाटा कंपनीचा आहे. इम्फाची निर्यात प्रामुख्याने चीन, जपान आणि तैवानला होते. कंपनी दक्षिण कोरियातील पॉस्को, त्सिंगशान समूह, ई-युनायटेड समूह, झेंशी समूह आणि मारुबेनी कॉर्पोरेशन (जपान) यांसारख्या बहुराष्ट्रीय कंपन्यांना सेवा पुरवते. शिवाय भारतातील जिंदाल स्टेनलेस, रिमझिम इस्पात, बीआरजी स्टील, एआयए इंजीनीरिंग आणि विराज प्रोफाइल हे कंपनीचे देशांतर्गत ग्राहक आहेत.

फेरो क्रोमचे उत्पादन करण्यासाठी कंपनीचा पॉस्कोसह संयुक्त उपक्रम आहे. उत्पादनासाठी ३० मेगाव्हॅट फर्नेस असून ती सुमारे ३५,००० मेट्रिक टन उत्पादन करण्यास सक्षम आहे. पॉस्कोशी २५ वर्षांसाठी दीर्घकालीन करार असून त्यांत त्रैमासिक किंमतीसह ऑफ-टेक ( उत्पादन विकत घेण्यासाठी) वचनबद्धता आहे. आपल्या उत्पादनांच्या गुणवत्तेसाठी कंपनीचे जपानच्या मारूबेंनी कार्पोरेशन तसेच निस्सीन स्टील कार्पोरेशनबरोबर दीर्घकालीन करार आहेत. कंपनीचे ओरिसातील थेरुबली आणि चौद्वार येथे दोन उत्पादन प्रकल्प असून त्यांची वार्षिक उत्पादन क्षमता २,८४,००० टन आणि १९० मेगाव्हॅट ॲम्पिएरची स्मेल्टिंग क्षमता आहे. तसेच त्याची २०५ मेगावॅट कॅप्टिव्ह पॉवर निर्मिती क्षमता आहे. कंपनीचे प्रकल्प क्रोम-ओअर आणि कोळसा खाणींच्या अगदी जवळ आहेत. त्यामुळे मालवाहतुकीच्या खर्चात लक्षणीय बचत होते. कंपनीकडे सुकिंदा आणि महागिरी येथे कॅप्टिव्ह क्रोम धातूच्या खाणी आहेत. कंपनीने आत्तापर्यंत २.१ कोटी टन साठा वाटप केला असून अतिरिक्त साठा स्थापित करण्यासाठी शोध चालू आहे. सुकिंदा आणि महागिरी क्रोमाईट खाणी वार्षिक ६.५० लाख टनच्या खाण योजनेसह असून कंपनीकडे प्रदीर्घ कालावधीसाठी भाडेतत्वावर आहेत. मार्च २०२४ अखेर सरलेल्या आर्थिक वर्षाचे निकाल नुकतेच जाहीर झाले असून कंपनीने, या आर्थिक वर्षांत २,७८० कोटी रुपयांच्या उलाढालीवर ३७२ कोटी (गेल्या वर्षी २७२ कोटी) रूपयांचा नक्त नफा कमवला आहे. उलाढालीतील २,५९७ कोटी रुपयांचे उत्पन्न केवळ निर्यातीतून आहे हे विशेष. तर मार्च तिमाहीत कंपनीने ७०१ कोटी रुपयांची उलाढाल साध्य केली असून त्यावर ६४ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. विस्तार प्रकल्प कंपनीने कलिंगा नगर येथे वार्षिक एक लाख टन फेरो क्रोम विस्ताराचा प्रस्ताव दिला आहे. या प्रकल्पासाठी राज्य सरकारने यापूर्वीच १२५ एकर जमीन दिली असून यात फर्नेस व्यतिरिक्त १० मेगाव्हॅटचा ऑफ-गॅस पॉवर प्रकल्प असेल. यासाठी ५५० कोटी रुपयांची भांडवली गुंतवणूक करण्यात आली असून दोन वर्षांत प्रकल्प कार्यान्वित होईल, अशी अपेक्षा आहे. तसेच कंपनी आता एथेनॉल उत्पादन व्यवसायात देखील पदार्पण करत आहे. सुकिंदा आणि महागिरी खाणींमधून कॅप्टिव्ह ओरेझिंग टप्प्याटप्प्याने १२ लाख टनपर्यंत वाढवण्याची योजना आहे. तसेच ५० मेगाव्हॅटच्या अक्षय्य उर्जेच्या निर्मितीसाठी गुंतवणुकीची देखील योजना आखत आहे. जागतिक बाजारपेठेतील कंपनीची पत तसेच उत्पादनांची वाढती मागणी पाहता, एक दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून अत्यल्प कर्ज असलेल्या या निर्यातप्रधान कंपनीचा जरूर विचार करावा. शेअरबाजारातील अनिश्चितता पाहता हा शेअर सुचवलेल्या किमतीपेक्षा कमी भावात मिळू शकतो, म्हणून प्रत्येक मंदीत तसेच टप्याटप्याने शेअर खरेदीचे धोरण ठेवावे. इंडियन मेटल्स अँड फेरो अलॉय लिमिटेड (बीएसई कोड ५३३०४७) संकेतस्थळ: www.imfa.in प्रवर्तक: बैजयंत पांडा बाजारभाव: रु. ७३१/- प्रमुख उत्पादन/ व्यवसाय: फेरो अलॉय / खाणकाम भरणा झालेले भाग भांडवल: रु. ५३.९५ कोटी शेअर होल्डिंग पॅटर्न (%) प्रवर्तक ५८.६९ परदेशी गुंतवणूकदार २.८८ बँक/ म्युच्युअल फंड/ सरकार ०.१० इतर/ जनता ३८.३३ पुस्तकी मूल्य: रु. ३९३ दर्शनी मूल्य: रु.१०/- लाभांश: १००% प्रति समभाग उत्पन्न: रु. ७२.३७ किंमत उत्पन्न गुणोत्तर: १०.६ समग्र किंमत उत्पन्न गुणोत्तर: १५.४ डेट इक्विटी गुणोत्तर: ०.१८ इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर: १५.८ रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लोइड (आरओसीई): १७.८ बीटा : ०.९ बाजार भांडवल: रु. ३,९४२ कोटी (स्मॉल कॅप) वर्षभरातील उच्चांक/ नीचांक: ७६८/२७३ गुंतवणूक कालावधी : २४-३० महिने अजय वाळिंबे Stocksandwealth@gmail.com प्रस्तुत लेखामध्ये सुचवलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहिती प्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या १% पेक्षा कमी आहे. तसेच सुचवलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेट वस्तू घेतलेली नाही. लेखात सुचवलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, शेअर मधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर अथवा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी. 

Raghuram Rajan reuters
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाला तर…”, भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत माजी RBI गव्हर्नर रघुराम राजन यांचं मोठं वक्तव्य
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Updates in Marathi
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघात काय आहे स्थिती? कुणाला मिळाला विजय; कोण आघाडीवर? जाणून घ्या…
Elecon Engineering, portfolio Elecon Engineering, Elecon Engineering company, elecon engineering company limited, stock market, share market, finance article,
माझा पोर्टफोलियो : प्रचंड क्षमता, मजबूत कार्यादेश!
What Kangana Said?
कंगनाचा धक्कादायक दावा, “कोणतीही नवी हिरोईन आली की तिला दाऊदसमोर..”
Global brand of home tidiness Welspun Group
माझा पोर्टफोलियो – घराच्या नेटकेपणाची जागतिक नाममुद्रा
Compounding is only possible through mutual funds
म्युच्युअल फंडांद्वारेच चक्रवाढ लाभाची किमया शक्य
Ian Bremmer prashant kishor
भाजपाला किती जागा मिळणार? प्रशांत किशोरांपाठोपाठ अमेरिकन राजकीय संशोधकाने केलं विश्लेषण
Iron and steel sector Fluctuations Business Opportunities and Investments
लोहपोलाद क्षेत्र: चढउतार, व्यवसाय संधी आणि गुंतवणूक

हेही वाचा >>>Money Mantra: पुनर्विकासादरम्यान मिळणाऱ्या ट्रान्झिट भाड्यावर कर भरावा लागतो का?

माझा पोर्टफोलियो : अत्यल्प कर्जदायित्व, मूल्यांकनही आकर्षक! इंडियन मेटल्स अँड फेरो अलॉय लिमिटेड (बीएसई कोड ५३३०४७) संकेतस्थळ: www.imfa.in प्रवर्तक: बैजयंत पांडा बाजारभाव: रु. ७३१/- प्रमुख उत्पादन/ व्यवसाय: फेरो अलॉय / खाणकाम भरणा झालेले भाग भांडवल: रु. ५३.९५ कोटी शेअर होल्डिंग पॅटर्न (%) प्रवर्तक ५८.६९ परदेशी गुंतवणूकदार २.८८ बँक/ म्युच्युअल फंड/ सरकार ०.१० इतर/ जनता ३८.३३ पुस्तकी मूल्य: रु. ३९३ दर्शनी मूल्य: रु.१०/- लाभांश: १००% प्रति समभाग उत्पन्न: रु. ७२.३७ किंमत उत्पन्न गुणोत्तर: १०.६ समग्र किंमत उत्पन्न गुणोत्तर: १५.४ डेट इक्विटी गुणोत्तर: ०.१८ इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर: १५.८ रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लोइड (आरओसीई): १७.८ बीटा : ०.९ बाजार भांडवल: रु. ३,९४२ कोटी (स्मॉल कॅप) वर्षभरातील उच्चांक/ नीचांक: ७६८/२७३ गुंतवणूक कालावधी : २४-३० महिने वर्ष १९६१ मध्ये स्थापन झालेली इंडियन मेटल्स अँड फेरो अलॉय लिमिटेड (इम्फा) ही भारतातील फेरो क्रोमची एक अग्रगण्य उत्पादक आहे. कंपनीचे उत्पादन प्रामुख्याने स्टेनलेस स्टीलच्या उत्पादनासाठी वापरली जाते. इंडियन मेटल्स भारतातील सर्वात मोठी एकात्मिक (मायनिंग ते स्मेल्टिंग) फेरो क्रोम उत्पादक असून भारतीय बाजारपेठेतील २० टक्के हिस्सा तसेच देशांच्या फेरो क्रोम निर्यातीतील २५ टक्के वाटा कंपनीचा आहे. इम्फाची निर्यात प्रामुख्याने चीन, जपान आणि तैवानला होते. कंपनी दक्षिण कोरियातील पॉस्को, त्सिंगशान समूह, ई-युनायटेड समूह, झेंशी समूह आणि मारुबेनी कॉर्पोरेशन (जपान) यांसारख्या बहुराष्ट्रीय कंपन्यांना सेवा पुरवते. शिवाय भारतातील जिंदाल स्टेनलेस, रिमझिम इस्पात, बीआरजी स्टील, एआयए इंजीनीरिंग आणि विराज प्रोफाइल हे कंपनीचे देशांतर्गत ग्राहक आहेत.

हेही वाचा >>>सरफेसी कायदा आणि गैरवापर

फेरो क्रोमचे उत्पादन करण्यासाठी कंपनीचा पॉस्कोसह संयुक्त उपक्रम आहे. उत्पादनासाठी ३० मेगाव्हॅट फर्नेस असून ती सुमारे ३५,००० मेट्रिक टन उत्पादन करण्यास सक्षम आहे. पॉस्कोशी २५ वर्षांसाठी दीर्घकालीन करार असून त्यांत त्रैमासिक किंमतीसह ऑफ-टेक ( उत्पादन विकत घेण्यासाठी) वचनबद्धता आहे. आपल्या उत्पादनांच्या गुणवत्तेसाठी कंपनीचे जपानच्या मारूबेंनी कार्पोरेशन तसेच निस्सीन स्टील कार्पोरेशनबरोबर दीर्घकालीन करार आहेत. कंपनीचे ओरिसातील थेरुबली आणि चौद्वार येथे दोन उत्पादन प्रकल्प असून त्यांची वार्षिक उत्पादन क्षमता २,८४,००० टन आणि १९० मेगाव्हॅट ॲम्पिएरची स्मेल्टिंग क्षमता आहे. तसेच त्याची २०५ मेगावॅट कॅप्टिव्ह पॉवर निर्मिती क्षमता आहे. कंपनीचे प्रकल्प क्रोम-ओअर आणि कोळसा खाणींच्या अगदी जवळ आहेत. त्यामुळे मालवाहतुकीच्या खर्चात लक्षणीय बचत होते. कंपनीकडे सुकिंदा आणि महागिरी येथे कॅप्टिव्ह क्रोम धातूच्या खाणी आहेत. कंपनीने आत्तापर्यंत २.१ कोटी टन साठा वाटप केला असून अतिरिक्त साठा स्थापित करण्यासाठी शोध चालू आहे. सुकिंदा आणि महागिरी क्रोमाईट खाणी वार्षिक ६.५० लाख टनच्या खाण योजनेसह असून कंपनीकडे प्रदीर्घ कालावधीसाठी भाडेतत्वावर आहेत. मार्च २०२४ अखेर सरलेल्या आर्थिक वर्षाचे निकाल नुकतेच जाहीर झाले असून कंपनीने, या आर्थिक वर्षांत २,७८० कोटी रुपयांच्या उलाढालीवर ३७२ कोटी (गेल्या वर्षी २७२ कोटी) रूपयांचा नक्त नफा कमवला आहे. उलाढालीतील २,५९७ कोटी रुपयांचे उत्पन्न केवळ निर्यातीतून आहे हे विशेष. तर मार्च तिमाहीत कंपनीने ७०१ कोटी रुपयांची उलाढाल साध्य केली असून त्यावर ६४ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. विस्तार प्रकल्प कंपनीने कलिंगा नगर येथे वार्षिक एक लाख टन फेरो क्रोम विस्ताराचा प्रस्ताव दिला आहे. या प्रकल्पासाठी राज्य सरकारने यापूर्वीच १२५ एकर जमीन दिली असून यात फर्नेस व्यतिरिक्त १० मेगाव्हॅटचा ऑफ-गॅस पॉवर प्रकल्प असेल. यासाठी ५५० कोटी रुपयांची भांडवली गुंतवणूक करण्यात आली असून दोन वर्षांत प्रकल्प कार्यान्वित होईल, अशी अपेक्षा आहे. तसेच कंपनी आता एथेनॉल उत्पादन व्यवसायात देखील पदार्पण करत आहे. सुकिंदा आणि महागिरी खाणींमधून कॅप्टिव्ह ओरेझिंग टप्प्याटप्प्याने १२ लाख टनपर्यंत वाढवण्याची योजना आहे. तसेच ५० मेगाव्हॅटच्या अक्षय्य उर्जेच्या निर्मितीसाठी गुंतवणुकीची देखील योजना आखत आहे. जागतिक बाजारपेठेतील कंपनीची पत तसेच उत्पादनांची वाढती मागणी पाहता, एक दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून अत्यल्प कर्ज असलेल्या या निर्यातप्रधान कंपनीचा जरूर विचार करावा. शेअरबाजारातील अनिश्चितता पाहता हा शेअर सुचवलेल्या किमतीपेक्षा कमी भावात मिळू शकतो, म्हणून प्रत्येक मंदीत तसेच टप्याटप्याने शेअर खरेदीचे धोरण ठेवावे. अजय वाळिंबे Stocksandwealth@gmail.com प्रस्तुत लेखामध्ये सुचवलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहिती प्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या १% पेक्षा कमी आहे. तसेच सुचवलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेट वस्तू घेतलेली नाही. लेखात सुचवलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, शेअर मधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर अथवा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.