मुंबई : गुजरातस्थित ज्योती सीएनसी ऑटोमेशन कंपनीची प्रारंभिक समभाग विक्री (आयपीओ) आजपासून म्हणजेच ९ जानेवारीपासून खुली झाली आहे. आयपीओच्या पहिल्या दिवशी काही तासातच कंपनीच्या आयपीओला १०० टक्के भरणा प्राप्त झाला आहे. ग्रे मार्केटमध्ये गुंतवणूकदारांचा उत्साह स्पष्टपणे दिसून आला. पहिल्या दिवशी ३३१ रुपयांच्या इश्यू किमतीपेक्षा ९६ रुपये म्हणजेच २९ टक्के अधिक प्रीमियम (अधिमूल्य) मिळाले आहे. ग्रे मार्केटमध्ये ४२६ रुपयांची लिस्टिंग किंमत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ग्रे मार्केट ही एक अनधिकृत परिसंस्था आहे, जिथे शेअर वाटपाच्या खूप आधी आणि लिस्टिंग दिवसापर्यंत ट्रेडिंग सुरू असते. गुंतवणूकदार सामान्यत: ग्रे मार्केट प्रिमियमचा मागोवा घेतात. ज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर चढ-उतार होऊ शकतात. शिवाय शेअर बाजारात तो समभाग किती रुपयांवर सुचिबद्ध होईल त्या किमतीचे संकेत यावरून मिळू शकतात. मात्र ते तंतोतंत खरेच ठरतील याची शाश्वती नसते.

हेही वाचा… बजाज ऑटोचे मार्केटकॅप २ लाख कोटींवर… शेअर ‘टॉप गिअर’मध्ये का?

कंपनी आयपीओच्या माध्यमातून १,००० कोटी रुपयांचा निधी उभारणार असून, कंपनीने प्रति समभाग ३१५ ते ३३१ रुपये किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे. नवीन कॅलेंडर वर्ष २०२४ मध्ये मुख्य मंचावर सूचिबद्ध होणारी ज्योती सीएनसी ऑटोमेशन मुख्य कंपनी आहे.

येत्या ११ जानेवारीपर्यंत गुंतवणूकदारांना आयपीओसाठी अर्ज करता येईल. गुंतवणूकदार किमान ४५ समभागांसाठी आणि त्यानंतर ४५ समभागांच्या पटीत बोली लावू शकतील. कंपनी १,००० कोटी रुपये मूल्याच्या नवीन समभागांची विक्री करणार आहे. या माध्यमातून मिळणारा निधी कंपनी कर्जफेडीसाठी आणि कंपनीच्या दीर्घकालीन कार्यरत भांडवलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वापरला जाणार आहे.

कंपनीने एकूण आकारमानाचा ७५ टक्के हिस्सा पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी, १५ टक्के बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी आणि उर्वरित १० टक्के किरकोळ वैयक्तिक गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवला आहे. याआधी २०१३ मध्ये कंपनीने आयपीओच्या माध्यमातून निधी उभारण्यासाठी सेबीकडे मसुदा प्रस्ताव दाखल केला होता. मात्र त्यांवेळी आयपीओची योजना बारगळली.

हेही वाचा… डिसेंबरमध्ये उच्चांकी ४३ लाख एसआयपी खात्यांची भर; तुम्ही सुरू केली का?

ज्योती सीएनसी ऑटोमेशन ही संगणक संख्यात्मक नियंत्रण (कॉम्युटर न्यूमेरिकल कंट्रोल – सीएनसी) मशीनची एक आघाडीची उत्पादक आहे. तिच्या ग्राहकांमध्ये इस्रो, ब्रह्मोस एरोस्पेस तिरुवनंतपुरम लिमिटेड, तुर्की एरोस्पेस, एमबीडीए, युनिपार्ट्स इंडिया, टाटा ऍडव्हान्स सिस्टीम, टाटा सिकोर्स्की एरोस्पेस, भारत फोर्ज, कल्याणी टेक्नोफोर्ज आणि बॉश या आघाडीच्या कंपन्यांचा समावेश आहे. सप्टेंबर २०२३ अखेर, कंपनीच्या उत्पादनांसाठी ३,३१५ कोटी रुपयांच्या मागणी नोंदवण्यात आली आहे

मराठीतील सर्व बाजार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is response for ipo of jyoti in market print eco news asj
Show comments