रोहिणी शहा

*     आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेबाबत पुढीलपकी कोणते विधान चुकीचे आहे?

१)   दुसऱ्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघाची संघटना म्हणून स्थापना करण्यात आली.

२)   भारत संघटनेचा संस्थापक सदस्य आहे.

३)   सन १९६९चा शांततेचा नोबल पुरस्कार संघटनेस प्रदान करण्यात आला.

४)   एकूण १८७ देश संघटनेचे सदस्य आहेत.

योग्य पर्याय क्र. (४) पहिल्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर व्हर्सायच्या तहातील तरतुदीनुसार आंतरराष्ट्रीय कामगार संघटना सन १९१९ मध्ये स्थापन करण्यात आली. संघटनेचे मुख्यालय जिनेव्हा येथे आहे. यामध्ये सरकार, नियोक्ते व कामगार यांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे.

*     ‘इ-औषधी’ पोर्टलबाबत पुढील विधानांची सत्यता तपासा.

अ.   या पोर्टलवर आयुर्वेदसिद्ध युनानी होमिओपॅथी औषधांना ऑनलाइन परवाने देण्यात येतील.

ब.   केंद्र शासनाच्या आयुष मंत्रालयाने हे पोर्टल सुरू केले आहे.

१) विधान अ सत्य असून विधान ब असत्य आहे.

२) विधान ब सत्य असून विधान अ असत्य आहे.

३) दोन्ही विधाने सत्य आहेत.

४) दोन्ही विधाने असत्य आहेत.

योग्य पर्याय क्रमांक (३)

*      पुढीलपकी चुकीची जोडी कोणती?

१)   सी व्हिजिल २०१९ – समुद्री मार्गाने होणाऱ्या हल्याविरोधातील तयारीचा सराव.

२)   कोकण २०१८ – भारतीय नौसेनेचा पश्चिम किनारपट्टीवरील युद्धाभ्यास.

३)   वायुशक्ती २०१९ – भारतीय वायुदलाचा पोखरण येथे युद्धाभ्यास.

४)   शिनयु मत्री २०१८ – भारत व जपानच्या वायुसेनांचा पहिला संयुक्त युद्धाभ्यास.

योग्य पर्याय क्र. (२) कोकण युद्धाभ्यास भारत व ब्रिटनच्या नौसेनांचा संयुक्त युद्धाभ्यास असून त्याची सुरुवात २००३ मध्ये झाली आहे.

*    भारतरत्न नानाजी देशमुख यांच्याबाबत पुढीलपकी कोणते विधान अयोग्य आहे?

अ)   महाराष्ट्राच्या कोडोली गावात (हिंगोली जिल्हा) ११ ऑक्टोबर १९१६ रोजी जन्म.

ब)   मूळ नाव चंडिकादास अमृतराव देशमुख.

क) देशातील पहिले ग्रामीण विद्यापीठ – चित्रकूट ग्रामोदय विश्वविद्यालयाची स्थापना.

ड)   सन २०१८ मध्ये त्यांना भारतरत्न पुरस्कार मरणोत्तर देण्यात आला.

१) अ, ब आणि क

२) ब, क आणि ड

३) अ, क आणि ड

४) सर्व पर्याय बरोबर

योग्य पर्याय क्रमांक (१) नानाजी देशमुख यांना भारतरत्न पुरस्कार सन २०१९ मध्ये मरणोत्तर प्रदान करण्यात आला.

*     पाकिस्तानकडून नुकतीच शारदा पीठ कॉरिडॉरला मान्यता देण्यात आली. शारदा पीठाबाबत कोणते विधान अयोग्य आहे?

अ)   शारदा पीठ पाकव्याप्त काश्मीरमध्ये आहे.

ब)   सहाव्या ते बाराव्या शतकामध्ये ते महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र होते.

क)   देवीच्या १६ महा शक्तीपीठांपकी एक शक्तीपीठ आहे.

१) अ आणि ब

२) ब आणि क

३) अ, ब आणि क

४) वरीलपैकी नाही

योग्य पर्याय क्रमांक (३)

*     अनुप सत्पथी समितीने महाराष्ट्रासाठी —— प्रतिदिन इतके किमान वेतन असावे अशी शिफारस केली आहे?

१) रु. ४१४ २) रु. ३८०

३) रु. ४४७ ४) रु. ३४२

योग्य पर्याय क्रमांक (१)

(सत्पथी समितीने किमान वेतननिश्चितीबाबत शिफारस करताना राज्यांना पाच विभागांत विभागले. आणि त्यांच्यासाठी अनुक्रमे रुपये ३४२, ३८०, ४१४,  ४४७ व ३८६ प्रतिदिन किमान वेतन असावे अशी शिफारस केली आहे. महाराष्ट्राचा समावेश

तिसऱ्या गटामध्ये असून प्रतिदिन रु. ४१४ प्रमाणे दरमहा रु. १०,७६४ इतक्या  किमान वेतनाची शिफारस करण्यात आली आहे.)

*     मिशन शक्तीबाबत पुढील विधानांची सत्यता तपासा.

अ.   ही भारताची उपग्रहनाशक क्षेपणास्त्र चाचणी आहे.

ब.   दि. २७ मार्च २०१९ रोजी ही चाचणी घेण्यात आली.

१) विधान अ सत्य असून विधान ब असत्य आहे.

२) विधान ब सत्य असून विधान अ असत्य आहे.

३) दोन्ही विधाने सत्य आहेत.

४) दोन्ही विधाने असत्य आहेत.

योग्य पर्याय क्रमांक (३) (भारताने उपग्रहनाशक क्षेपणास्त्राची (anti sattellite MIssile A-Sat) चाचणी केली आहे. अशी क्षमता असलेला भारत हा अमेरिका, रशिया आणि चीननंतरचा चौथा देश बनला आहे.)

*    कायाकल्प पुरस्कार

योजनेबाबत पुढीलपकी कोणते विधान सत्य आहे?

अ.   सार्वजनिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या संस्थांमध्ये स्वच्छता आणि संसर्ग प्रतिबंधक पद्धती अवलंबण्यास प्रोत्साहन देण्याचा हेतू.

ब.   मे २०१५ पासून देशामध्ये सुरुवात

१) विधान अ सत्य असून विधान ब असत्य आहे.

२) विधान ब सत्य असून विधान अ असत्य आहे.

३) दोन्ही विधाने असत्य आहेत.

४) दोन्ही विधाने सत्य आहेत.

योग्य पर्याय क्रमांक (४) दोन्ही विधाने सत्य आहेत.