प्रत्येक व्यक्ती
विचारांचं प्रतिरूप असते;
आणि विचार..
भावनांचं शब्दरूप असतात.

व्यक्तित्वाच्या अभिव्यक्तीचं
संवाद माध्यम म्हणजे विचार
मनस्वी सर्जनशीलतेचं
वैश्विक सामथ्र्य म्हणजे विचार.
विचारांतून कृती
कृतीतून सवय
सवयीतून वर्तन
वर्तनातून स्वभाव
स्वभावातून व्यक्तित्व
व्यक्तित्वातून चारित्र्य
चारित्र्यातून आयुष्य..
अशी ‘जडणघडण’ होत असते.

lucky number by date of birth
पैसा, पद, प्रतिष्ठा तुम्हाला कधी मिळणार? भाग्यांकावरून पाहा तुमचे लकी वर्ष
Loksatta vyaktivedh John Barth The Floating Opera Novel Novel writing
व्यक्तिवेध: जॉन बार्थ
Personality Traits
तुमची जन्मतारीख ३, १२, २१ किंवा ३० आहे का? जाणून घ्या, कसा असतो अशा लोकांचा स्वभाव…
Loksatta vyaktivedh economics Nobel Prize Standards Daniel Kahneman
व्यक्तिवेध: डॅनिएल कानेमान

थोर तत्त्वज्ञ इमर्सन म्हणतात:
‘विचारच दळिद्री असले की,
आयुष्य कंगाल बनतं,’ म्हणूनच
अविचारी दिशाहीन माणसं
परिस्थितीची गुलाम असतात.

प्रतिकूल, नकारात्मक घडताना
विचारांनी स्थिर आणि शांत राहाणं
जगण्याची पहिली कसोटी असते.
संकटकाळातही सातत्यानं
सकारात्मक विचार करणं ही
यशाची खरी परीक्षा असते.

यशाचं गमक विचार करण्याच्या
पद्धतीत सामावलेलं आहे.
आपले विचारच आयुष्य कसं
जगायचं हे ठरवीत असतात आणि
विचारांमुळेच जगण्याला भान येतं.
फ्रेंच तत्त्वज्ञ देकार्त म्हणतात:
‘I Think; therefore I am.’

vijayjamsandekar@yahoo.com