सुहास पाटील

suhassitaram@yahoo.com

बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, (BSF) (गृह मंत्रालय, भारत सरकार) असिस्टंट सब इन्स्पेक्टर, कॉन्स्टेबलच्या एकूण ६५ पदांची भरती.

(१) असिस्टंट एअरक्राफ्ट मेकॅनिक (असिस्टंट सब इन्स्पेक्टर) – एकूण ४९ पदे.

(2) रोटरी विंग मेकॅनिकल (एअर फ्रेम इंजिन) – ९ पदे (अजा – १, अज – १, ईडब्ल्यूएस – १, खुला – ६).

(3) रोटरी विंग – एव्हिऑनिक्स (इलेक्ट, इन्स्ट्रमेंट, रेडिओ/रडार) ट्रेड – १३ पदे (अजा – १, अज – १, ईडब्ल्यूएस – १, खुला – १०).

(4) फिक्स्ड् विंग – मेकॅनिकल ट्रेड – ६ पदे (अजा – १, अज – १, इमाव – २, ईडब्ल्यूएस – १, खुला – १).

(५) फिक्स्ड् विंग – एव्हिऑनिक्स (इलेक्ट अँड इन्स्ट्रमेंट) ट्रेड – ४ पदे (अजा – १, इमाव – २, खुला – १).

(५) एएलएच/ध्रुव विंग – मेकॅनिकल ट्रेड – १७ पदे (अजा – ३, अज – १, इमाव – ५, ईडब्ल्यूएस – २, खुला – ६).

पात्रता – (1) (अ) डायरेक्टोरेट जनरल सिव्हिल एव्हिएशन यांना मंजूर असलेला संबंधित ट्रेडमधील डिप्लोमा किंवा (बी) इंडियन एअरफोर्सचा ग्रुप एक्स् डिप्लोमा आणि (2) संबंधित एव्हिएशनमधील २ वर्षांचा अनुभव.

(२) असिस्टंट रेडिओ मेकॅनिक (असिस्टंट सब इन्स्पेक्टर) – एकूण ८ पदे.

– रोटरी विंग – एव्हिऑनिक्स (रेडिओ/रडार) ट्रेड – ३ पदे (ईडब्ल्यूएस – १, खुला – २).

– फिक्स्ड् विंग – एव्हिऑनिक्स (रेडिओ) ट्रेड – १ पद (खुला).

– एएलएच/ध्रुव विंग – एव्हिऑनिक्स ट्रेड – ४ पदे (इमाव – ३, खुला – १).

पात्रता – – (अ) डायरेक्टोरेट जनरल सिव्हिल एव्हिएशन यांना मंजूर असलेला टेलिकम्युनिकेशन किंवा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग डिप्लोमा किंवा (बी) इंडियन एअरफोर्सचा ग्रुप-एक्स् रेडिओ डिप्लोमा आणि – (बॉर्डर सिक्युरिटी फोर्सकडील एअरक्राफ्ट किंवा हेलिकॉप्टरमध्ये बसविलेल्या) कम्युनिकेशन किंवा नेव्हिगेशन इक्पिमेंट्सच्या मेंटेनन्स किंवा ओव्हर व्हॉिलग कामाचा २ वर्षांचा अनुभव.

(३) कॉन्स्टेबल (स्टोअरमन) – एकूण ८ पदे (अजा – १, इमाव – १, ईडब्ल्यूएस – १, खुला – ५) (१ पद महिलांसाठी राखीव).

पात्रता – (1) विज्ञान विषयासह १० वी उत्तीर्ण, (2) २ वर्षांचा स्टोअर्स किंवा वेअरहाऊसिंग कामाचा अनुभव, (3) कॉम्प्युटर चालविण्याचे ज्ञान. (एव्हिएशनमधील अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल.)

वयोमर्यादा – (दि. २६ जुल २०२१ रोजी) पद क्र. १ व २ (असिस्टंट सब इन्स्पेक्टर पदांसाठी) २८ वष्रे.

कॉन्स्टेबल पदांसाठी २० ते २५ वष्रे. (वयोमर्यादेत सूट – इमाव – ३ वष्रे, अजा/अज – ५ वष्रे) (गव्हर्नमेंटमधील ३ वर्षांचा सेवाकाल असलेले कर्मचारी – खुला – ४० वष्रे, इमाव – ४३ वष्रे, अजा/अज – ४५ वष्रे) (विधवा/परित्यक्ता महिला – खुला गट – ३५ वष्रे, इमाव – ३८ वष्रे, अजा/अज – ४० वष्रे)

शारीरिक मापदंड – असिस्टंट सब इन्स्पेक्टर पदांसाठी – पुरुष – उंची – १६५ सें.मी. (आदिवासी – १६० सें.मी.); छाती – ७६ ते ८० सें.मी. (२० वर्षांपेक्षा लहान उमेदवारांना छातीच्या मापदंडात २ सें.मी.ची सूट) वजन – उंचीच्या प्रमाणात. महिला – उंची – किमान १५० सें.मी.; वजन – उंचीच्या प्रमाणात).

कॉन्स्टेबल पदांसाठी – पुरुष – उंची – किमान १६५ सें.मी.; छाती – ८० ते ८५ सें.मी.; वजन – उंची आणि वय यांच्या प्रमाणात. महिला – उंची – किमान १५० सें.मी.; वजन – उंची व वय यांच्या प्रमाणात.

दृष्टी – चष्म्याशिवाय ६/६, ६/९.

निवड पद्धती – (क) असिस्टंट सब इन्स्पेक्टर पदांसाठी – (्र) फेज-१ – ऑब्जेक्टिव्ह टाईप बहुपर्यायी (ओएम्र्आ शीटवर) लेखी परीक्षा – एकूण १०० प्रश्न, १०० गुण, वेळ २ तास. (जनरल अवेअरनेस, जनरल इंग्लिश, न्यूमरिकल, अ‍ॅप्टिटय़ूड, टेक्निकल सब्जेक्ट प्रत्येकी २५ प्रश्न).

  • फेज-२ – फेज-१ मधील लेखी परीक्षेत उत्तीर्ण उमेदवारांना फेज-२ परीक्षेकरिता बोलाविले जाईल. ई-मेल/एसएम्एसद्वारे सूचित करण्यात येईल. (कागदपत्र पडताळणी, शारीरिक मापदंड चाचणी (ढरळ), शारीरिक क्षमता चाचणी (ढएळ) आणि मेडिकल टेस्ट)

शारीरिक क्षमता चाचणी (ढएळ) – माजी सनिकांना ढएळ द्यावी लागणार नाही.

एक मल अंतर धावणे – पुरुष – ८ मिनिटे, महिला – १२ मिनिटे.

स्टँडिंग ब्रॉड जंप – पुरुष – ४ फूट, ६ इंच; महिला – ३ फूट.

(कक) काँस्टेबल पदांसाठी (्र) फेज-१ – (अ) शारीरिक मापदंड चाचणी (PST), (ब) शारीरिक क्षमता चाचणी (PST) – पुरुष ५ कि.मी. अंतर २४ मिनिटांत धावणे. महिला – १.६ कि.मी. अंतर ८ मिनिटे ३० सेकंदांत धावणे.

(्र) फेज-२ – लेखी परीक्षा – ऑब्जेक्टिव्ह टाइप बहुपर्यायी स्वरूपाचे एकूण १०० प्रश्न, १०० गुणांसाठी, वेळ २ तास. (जनरल अवेअरनेस, जनरल इंग्लिश, न्यूमरिकल अ‍ॅप्टिटय़ूड, टेक्निकल सब्जेक्ट प्रत्येकी २५ प्रश्न, २५ गुण)

फेज-२ मधून रिक्त पदांच्या १० पट उमेदवार फेज-३ साठी निवडले जातील.

फेज-३ – (अ) कागदपत्र पडताळणी, (ब) मेडिकल एक्झामिनेशन, (क) अंतिम गुणवत्ता यादी पोस्ट आणि कॅटेगरीनुसार लेखी परीक्षेतील गुणांनुसार गुणवत्ता यादी बनविली जाईल. अंतिम निवड यादी बीएसएफच्या वेबसाइट (www.bsf.gov.in) वर प्रसिद्ध केली जाईल.

परीक्षा शुल्क – रु. १००/-. (अजा/अज/माजी सनिक/महिला यांना फी माफ आहे.)

भरती केंद्र – भरती प्रक्रिया पुढील भरती केंद्रांवर घेतली जाईल.

असिस्टंट सब इन्स्पेक्टर पदांसाठी केंद्र-दिल्ली – पत्ता The Commandant zv BN BSF Bhondi Campus, Near Sohna Road, Dist. Gurgaon, Haryana १२२ १०२.

कॉन्स्टेबल पदांसाठी – भरती केंद्र – दिल्ली, जोधपूर, जालंदर, बेंगलुरू, हजारीबाग आणि गुवाहाटी (आसाम).

ऑनलाइन अर्ज http://www.bsf.gov.in या संकेतस्थळावर दि. २६ जुल २०२१ पर्यंत करावेत. (स्टेप-१ One Time Registration > स्टेप- 2  Filling of Online Application > स्टेप-३ Payment of Examination Fees through Digital Modes))

अ‍ॅग्रिकल्चर अँड प्रोसेस्ड् फूड प्रोडक्ट्स एक्स्पोर्ट डेव्हलपमेंट अ‍ॅथॉरिटी (APEDA) अ‍ॅग्रिकल्चर/अ‍ॅग्री मॅनेजमेंट पात्रताधारक उमेदवारांची ‘यंग प्रोफेशनल्स’ पदांवर आणि १० कन्स्लटंट्स पदांची भरती.

(क) पुढील क्षेत्रातील ‘यंग प्रोफेशनल्स’ (YP) भरती.

(१) इंटरनॅशनल मार्केटिंग – २ पदे.

(२) पी अँड ए (ट्रेड फेअर्स मॅटर्स) – १ पद.

पात्रता – पद क्र. १ व २ साठी एमबीए (इंटरनॅशनल बिझनेस/अ‍ॅग्री बिझनेस मॅनेजमेंट/फॉरेन ट्रेड).

(३) अ‍ॅग्रिकल्चर इव्होल्युशन प्लान (AEP) – १ पद.

(४) क्लस्टर्स – ६ पदे.

(५) फ्रेश फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स (FFV) – १ पद.

(६) सेरिल्स (Cereals) – १ पद.

(७) इन्फ्रास्ट्रक्चर – १ पद.

(८) रिजन ऑफिस, गुवाहाटी – १ पद.

पात्रता – पद क्र. ३ ते ८ साठी अ‍ॅग्रिकल्चर/हॉर्टकिल्चरमधील मास्टर्स डिग्री/एमबीए (अ‍ॅग्री बिझनेस मॅनेजमेंट).

(९) प्रोसेस्ड् फूड्स – १ पद.

पात्रता – अ‍ॅग्रिकल्चर/हॉर्टकिल्चर/फूड सायन्स/फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी/फूड टेक्नॉलॉजी/फूड प्रोसेसिंगमधील मास्टर्स डिग्री.

(१०) क्वालिटी – १ पद.

पात्रता – अ‍ॅग्रिकल्चर/हॉर्टकिल्चर/फूड सायन्स/फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी/फूड टेक्नॉलॉजी/क्वालिटी मॅनेजमेंटमधील मास्टर्स डिग्री.

(११) अ‍ॅनिमल प्रोडक्ट्स – १ पद.

पात्रता – बी.व्ही.एस्सी.

(१२) फिनान्स – १ पद.

पात्रता – एमबीए (जनरल)/एमबीए (फिनान्स)

(१३) पब्लिक रिलेशन्स (PR) – १ पद.

पात्रता – पब्लिक रिलेशन्स/मास कम्युनिकेशन/जर्नालिझममधील मास्टर्स डिग्री.

वय आणि अनुभव यानुसार प्रतीमाह एकत्रित मानधन दिले जाईल.

१ ते २ वष्रे अनुभव – वय ३२ वष्रे –

रु. ५०,०००/- +GST

२ ते ३ वष्रे अनुभव – वय ३४ वष्रे –

रु. ५५,०००/- +GST

३ वर्षांपेक्षा जास्त अनुभव – ३५ वष्रे –

रु. ६०,०००/- +GST

(II) APEDA च्या पुढील डिव्हीजन्समध्ये भरावयाच्या कन्सल्टंट पदांचा तपशील –

(१) ऑरगॅनिक – २ पदे.

पात्रता – अ‍ॅग्रिकल्चर/ एन्व्हिरॉन्मेंटल सायन्स विषयातील पोस्ट ग्रॅज्युएटशन. इष्ट पात्रता – नॉलेज ऑफ नॅशनल प्रोग्राम फॉर ऑरगॅनिक प्रोडक्शन (NPOP) रिक्वायरमेंट्स ऑन सर्टििफकेशन अँड ट्रेड.

(२) ऑरगॅनिक – १ पद.

पात्रता – अ‍ॅक्वाकल्चर/ अ‍ॅक्वाकल्चर अँड फिशरिज/ फिशरिज/फिशरिज सायन्स/मरिन बायोलॉजी अँड फिशरिज विषयातील पोस्ट ग्रॅज्युएशन.

(३) ऑरगॅनिक – १ पद.

पात्रता – बी.ई./बी.टेक्. (टेक्स्टाइल इंजिनीअरिंग/टेक्स्टाइल टेक्नॉलॉजी) आणि संबंधित क्षेत्रातील ३ वर्षांचा अनुभव.

(४) लिगल – १ पद.

पात्रता – बॅचलर ऑफ लॉ आणि ३ वर्षांचा अनुभव.

(५) वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन (WTO) – १ पद.

(६) जीओग्राफिकल इंडिकेशन्स (GI) – १ पद.

पात्रता – पद क्र. ५ व ६ साठी – एम्.बी.ए. (इंटरनॅशनल बिझनेस/इंटरनॅशनल ट्रेड/फॉरेन ट्रेड) आणि ३ वर्षांचा संबंधित क्षेत्रातील अनुभव.

(७) क्लस्टर्स – १ पद.

(८) अ‍ॅग्रिकल्चरल इव्होल्युशन प्लान (AEP) – १ पद.

पात्रता – पद क्र. ७ व ८ साठी अ‍ॅग्रिकल्चर विषयातील पोस्ट ग्रॅज्युएशन/एमबीए (अ‍ॅग्री बिझनेस मॅनेजमेंट/एमबीए (इंटरनॅशनल बिझनेस) आणि संबंधित कामाचा (अ‍ॅग्री एक्स्पोर्ट) ३ वर्षांचा अनुभव.)

(९) इंटरनॅशनल मार्केटिंग – १ पद. पात्रता – एमबीए (मार्केटिंग/इंटरनॅशनल ट्रेड) आणि ३ वर्षांचा अ‍ॅग्री एक्स्पोर्ट कामाचा अनुभव.

एकत्रित मासिक मानधन – रु. ६०,०००/- + लागू असलेले कर. (दरवर्षी मानधन ५% वाढविले जाईल.)

सर्व पदांसाठी वयोमर्यादा – ३५ वष्रे.

अ‍ॅग्रिकल्चर/हॉर्टकिल्चर/एमबीए (अ‍ॅग्री बिझनेस मॅनेजमेंट)/एमबीए (इंटरनॅशनल बिझनेस)/एमबीए (फॉरेन ट्रेड)मधील मास्टर्स डिग्री पात्रताधारक उमेदवारांची बी.एस्सी. (अ‍ॅग्रिकल्चर) पदवीनंतर मिळविली असल्यास त्यांना प्राधान्य देण्यात येईल.

नियुक्तीचा कार्यकाल – यंग प्रोफेशनल्सची नियुक्ती करार पद्धतीने १ वर्षांसाठी केली जाईल. उमेदवारांची कामगिरी पाहून ती आणखीन १ + १ वर्षांसाठी वाढविली जाईल. (नियुक्तीचा कालावधी जास्तीत जास्त ३ वर्षांसाठी असेल.)

संबंधित विषयातील पीएच.डी. पात्रताधारकांसाठी ३ वर्षांचा अनुभव आणि एम.फिल. पात्रताधारकांसाठी २ वर्षांचा अनुभव समजला जाईल.

ट्रेिनग – निवडलेल्या उमेदवारांना २ दिवसांचे इंडक्शन ट्रेिनग दिले जाईल.

ऑनलाइन अर्ज https://jobapply.in/apeda २०२१ या संकेतस्थळावर दि. २७ जुल २०२१ (२३.५९ वाजे)पर्यंत करावेत. (Create login >Fill application Form > ४ upload photograph/signature > Submit Application > Print Application >)

लेखी परीक्षेसाठीचे अ‍ॅडमिट कार्ड १७ ऑगस्ट २०२१ (१४.०० वाजता) अपलोड केले जातील.

लेखी परीक्षा दिनांक २२ ऑगस्ट २०२१ रोजी घेतली जाईल.

अधिक माहिती APEDA  संके तस्थळ https://www.apeda.gov.in वर उपलब्ध आहे.