Uddhav Thackeray Asks To Vote For Modi: लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये अनेक जुने व्हिडीओ शेअर करून दिशाभूल केली जात आहे. अशाच एका व्हायरल व्हिडीओमध्ये उद्धव ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना मत देण्याचे आवाहन करताना दिसत आहेत. विरोधात असुनही उद्धव ठाकेरेंनी पुन्हा एकदा मोदींना पंतप्रधान करण्याचे समर्थन केले असा अर्थ सांगत हे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. आज लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील प्रमुख ११ मतदारसंघांमध्ये मतदान असताना या व्हिडीओचा व्हायरल होण्याचा वेग वाढला आहे. नेमकं यामध्ये किती टक्के सत्य आहे याबाबत फॅक्ट क्रेसेंडोने शक्ती कलेक्टिव्ह अंतर्गत अहवाल सादर केला आहे.

काय होत आहे व्हायरल?

व्हायरल व्हिडीओमध्ये उद्धव ठाकरे म्हणतात की, “तुम्ही नरेंद्र भाईंना मत देत नाही आहात, तुम्ही तुमच्या भवितव्याला मत देत आहात. तुमच्यासाठी तुम्ही मतदान करणार आहात.”

Narendra Modi Was Attacked by Obscene Remark
“राजा नग्न आहे, सर्वोच्च न्यायालयाने..”, नरेंद्र मोदींवर जगप्रसिद्ध वृत्तपत्राची गंभीर टीका? ऑनलाईन वादंग सुरु, खरे मुद्दे पाहा
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
Woman Strips At Petrol Pump video viral
पेट्रोल पंपावर तरुणीचे लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यासमोर पँट काढली अन्…; Video व्हायरल
pm modi on prajwal revanna sex tape row
प्रज्वल रेवण्णा प्रकरणावर पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं भाष्य; म्हणाले…
uddhav thackeray viral video
शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना बाहेर जायला सांगितलं, ठाकरेंनी हात जोडले अन्..; भाजपाने शेअर केला ‘तो’ VIDEO
prithviraj chavan loksabha election 2024
“या निवडणुकांनंतर महाराष्ट्रात दोन पक्ष लोप पावतील”, पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा दावा; म्हणाले, “या पक्षांमधली माणसं…”
Viral Video Watch Farmer Helps Woman Who Had Her Skirt Ripped At Bus Stop Video will win your heart
बापमाणूस! बस स्टॉपवर फाटला तरुणीचा स्कर्ट; मदतीसाठी ‘त्यानं’ पुढे केला हात, पाहा हृदयस्पर्शी VIDEO
devendra fadnavis uddhav thackeray
“अमित शाह तुला म्हणाले दोन मोठी…”, उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचा एकेरी उल्लेख करत सांगितलं शहांच्या मातोश्री भेटीवेळी काय घडलं?

हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “या मराठी माणसाचं सांगणं जरा मनावर घ्या आणि तुम्ही Narendra Modi भाईंना मत देत नाही आपण आपल्या भवितव्याला मत देत आहात हे लक्षात ठेवा.”

तपास:

या भाषणातील मजकुरानुसार कीवर्ड सर्च केले असता कळाले की, ही क्लिप दहा वर्षांपूर्वीची आहे. उद्धव ठाकरे गटाच्या अधिकृत युट्यूब चॅनेलवर संपूर्ण भाषणाचा व्हिडीओ उपलब्ध आहे. त्यानुसार, २१ एप्रिल २०१४ रोजी मुंबईतील बीकेसी मैदानावरील सभेत उद्धव ठाकरेंनी हे भाषण केले होते.

खाली दिलेल्या व्हिडिओमध्ये ११.२८ व्या मिनिटांपासून व्हायरल क्लिपमधील भाग पाहू शकता.

शिवसेना आणि भाजप यांची २०१४ मधील लोकसभा निवडणुकीमध्ये युती होती. त्यानुसार, दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी मुंबईमध्ये ही सभा घेतली होती. यावेळी व्यासपीठावर देवेंद्र फडणवीस, गोपीनाथ मुंडे आणि नरेंद्र मोदी उपस्थित होते.

आपल्या भाषणात उद्धव ठाकरे म्हणाले होते की, “देशाचा चेहरा कसा असला पाहिजे हा प्रश्न तुमच्या मनाला विचारा. नरेंद्र मोदी यांचा पर्याय बाजूला ठेवला तर दुसरा पर्याय तुम्ही देताय? एक तरी चेहरा काँग्रेसकडे आहे का जो पंतप्रधान पदाची उंची, मान मरतब सांभाळेल? कोणी राहिलेले नाही. सगळे बरबरटलेले आहेत. तुम्ही नरेंद्र भाईंना मत देत नाही आहात, तुम्ही तुमच्या भवितव्याला मत देत आहात. तुमच्यासाठी तुम्ही मतदान करणार आहात.”

हे ही वाचा<< नरेंद्र मोदींबरोबर उमेदवारी अर्ज भरताना राष्ट्रपती मुर्मू यांनी जाणं नैतिक आहे का? असा प्रश्न करताना नेटकरी विसरलेच की..

झी-24 तास वाहिनीच्या युट्यूब चॅनेलवरदेखील याच सभेचा व्हिडिओ उपलब्ध आहे.

उद्धव ठाकरे वि. भाजपा संघर्ष

उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील (तत्कालिन अविभाजित) शिवसेना आणि भाजप यांची २०१९ मधील विधानसभा निवडणुकीनंतर युती तुटली होती. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासह हातमिळवणी करत महाविकासआघाडी सरकार स्थापन केले होते. २०२२ साली एकनाथ शिंदे यांनी बंड करून शिवसेना पक्षाचे विभाजन केले.

हे ही वाचा<< उद्धव ठाकरेंना काँग्रेसचे कार्यकर्ते बोलूच देईना? भरसभेत मंचावरील Video पाहून समर्थकांचा संताप, नेमकं काय घडलं?

निष्कर्ष: उद्धव ठाकरेंचा मोदींना मत देण्याचे आवाहन करतानाचा व्हिडिओ दहा वर्षे जुना असून तेव्हा ते भाजपासह युतीमध्ये होते. सध्या उद्धव ठाकरे गट भाजपच्या विरोधात आहे. विद्यमान निवडणुकीतही ठाकरेंनी मोदींना पंतप्रधान करण्यासाठी आवाहन केले आहे असे सांगणारा व्हायरल दावा दिशाभूल करणारा आहे.

सौजन्य: फॅक्ट क्रेसेंडो

अनुवाद: अंकिता देशकर