मन हे सर्जनशील असते आणि परिस्थिती, वातावरण आणि आयुष्यात येणारे सर्व अनुभव हे आपल्या नेहमीच्या परिचयाच्या अथवा प्रबळ अशा मानसिक अभिवृत्तीचे परिणाम असतात. आपण काय विचार करतो, यावर नि:संशयपणे आपल्या मनाची अभिवृत्ती अवलंबून असते आणि म्हणूनच आपल्याला महत्त्वाच्या वाटणाऱ्या उद्दिष्टांची पूर्ती, आपल्या सर्व प्रकारच्या शक्ती आणि आपल्या ताब्यात असणाऱ्या मालकीच्या गोष्टी – वस्तू या सर्वाचे रहस्य हे आपल्या विचारप्रक्रियेवर अवलंबून असते.
हे सर्व खरे आहे, कारण आपण काही प्रत्यक्षपणे करण्याआधी आपण स्वत: त्यासाठी तयार असलो पाहिजे आणि आपण जसे असू किंवा जितकी आपली तयारी असेल तितकेच आपण करू शकू आणि आपण काय आणि कसा विचार करतो, यावरच आपण कसे आहोत, हे अवलंबून असते.
जोपर्यंत आपल्या सामर्थ्यांचा उगम आपल्या आतच आहे, हे आपण पक्के लक्षात घेत नाही, तोपर्यंत आपल्याला आपल्या सामर्थ्यांची ओळखच होणार नाही.
आपल्या आत एक जग सामावलेले असते – ते विश्व आहे विचार, भावना, सामथ्र्य, प्रकाश, आपले जीवित आणि सौंदर्याचे! हे सारे अदृश्य रूपात असले तरी त्यांच्यातील ताकद जबरदस्त असते. या आतल्या जगावर मनाचे नियंत्रण असते आणि जेव्हा आपल्याला या जगाचा परिचय होईल, त्या जगाचा खऱ्या अर्थी शोध लागेल, तेव्हाच आपल्या प्रत्येक प्रश्नाचे, समस्येचे उत्तर मिळेल. प्रत्येक घटनेचा, गोष्टीचा कार्यकारणभाव समजेल. हे आतील जग केवळ आपल्या स्वत:च्याच नियंत्रणात असल्याकारणाने, आपल्यातील सामथ्र्य आणि आपल्यात असलेल्या सर्व गोष्टींना लागू होणारे नियम आपल्या मर्जीनुसार राहतील.
यशस्वितेचे नियम (द मास्टर की सिस्टीम) – चार्ल्स एफ. हॅनेल.
अनुवाद – शकुंतला कोलारकर, साकेत प्रकाशन, पृष्ठे – २८०,
मूल्य – २४५ रु.

homosexual Women
समलिंगी स्त्रियांना असतो अकाली मृत्यूचा धोका, पण नेमकं कारण काय? संशोधनातून धक्कादायक माहिती उघड!
Womens health Which blood type is required for marriage
स्त्री आरोग्य : लग्नाच्या होकारासाठी रक्तगट कोणता हवा?
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…