डॉ. श्रीराम गीत

२०२२२ मध्ये मी माझे पदवीचे शिक्षण म्हणजेच बी.एस्सी. पूर्ण केले. आणि तसेच त्यावर्षी मी एमपीएससी पण दिली होती. त्यामध्ये मला अपयश आले. पुढे मी एम.एस्सी. मायक्रोबायलॉजीमध्ये करण्याचा विचार केला. मी कॉलेज नियमित केले नाही आणि मी प्रथम वर्षात नापास झालो. २०२३ मध्ये एमपीएससी, त्यानंतर पोलीस भरती, यूपीएससी परीक्षा दिली. मात्र त्यात मला यश आले नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कृपया खालील मुद्द्यांवर मार्गदर्शन करा

१.एम.एस्सी. करून जॉब करू?

२.एक वर्ष नियोजन करून यूपीएस्सीची तयारी करू?

३.स्पर्धा परीक्षेला पूर्ण वेळ न दिल्यामुळे अपयश आले का?.

– सूर्यवंशी बालाजी

हेही वाचा >>> एमपीएससी मंत्र: बुध्दिमत्ता चाचणी – गट क सेवा मुख्य परीक्षा – पेपर दोन

तुझ्या वाटचालीतील कोणतेही मार्क तू कळवण्याची तसदी घेतलेली नाहीस. दहावी, बारावी, बीएस्सी या दरम्यानचे मार्क व बीएस्सीसाठीचे विषय याची सविस्तर माहिती तुला उत्तर देण्याकरता गरजेची होती. पोलीस भरती, एमपीएससी ते यूपीएससी अशा जमतील तेवढ्या सगळ्याच्या सगळ्या परीक्षा देण्याच्या फंदात पडणे हा फक्त अ-विचार या प्रकारात मोडतो हे प्रथम लक्षात घे. एकात अपयश आलं म्हणून दुसरा. दुसऱ्यात आलं म्हणून तिसरा. आणि काही जमत नाही म्हणून मास्टर्सला प्रवेश घेतला तर तिथेही नापास यातून बाहेर येण्यासाठी तू विचारलेल्या तीन प्रश्नांना नेमकी उत्तर देत आहे. बीएस्सी झाला आहेस त्या जोरावर मिळेल ती नोकरी प्रथम स्वीकार. सलग दोन वर्षे ती नोकरी करताना एमपीएससीसाठीचा अभ्यासाचा हवा का समजून घे. नंतर जर त्या परीक्षेमध्ये प्रीलिममध्ये यश मिळाले तर हा रस्ता तुझ्यासाठी योग्य राहील. बीएस्सीला ७५ टक्के नसतील तर एम. एस्सी.चा रस्ता नक्की नको. पोलीस भरती किंवा यूपीएससी या दोन्हीचा विचार पूर्णपणे बाजूला ठेवावा. तिसरा प्रश्नच चुकीचा आहे. योग्य तयारी न करता परीक्षा दिल्याचा हा परिणाम आहे.

सर माझं वय २२ वर्ष आहे. बारावी विज्ञान करून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून बीए मराठी साहित्यात केले. कला शाखेच्या विषयाची आवड आहे, जसे की भूगोल, राज्यशास्त्र, समाजशास्त्र इत्यादी वाचन करायला आवडतं. आर्थिक अडचणीमुळे लवकर जॉब शोधणे अनिवार्य होते. सध्या महाराष्ट्र सुरक्षा महामंडळात मुंबई येथे जॉब करतोय व राज्य शासनाच्या परीक्षांची तयारी करतोय पीजी केले नाही. यावर्षी प्रवेश घ्यायचा आहे राज्यसेवा व केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन प्रशासनात येण्याची ओढ आहे. वैकल्पिक विषय व अभ्यासाविषयी मार्गदर्शन करावे.

गोपीचंद

मित्रा, पीजी करण्याची गरज नाही व त्याचा उपयोग पण नाही. या ऐवजी राज्य शासनाच्या सर्व प्रकारच्या परीक्षांचा नीट विचार कर. आजवरच्या प्रवासातील तुझे कोणतेही मार्क लिहिलेले नसल्यामुळे हे आवर्जून सांगत आहे. एक वर्ष या प्रकारच्या सर्व पदांचा अभ्यास काय असतो त्याचा हवा का काय याची नीट माहिती घेऊन बघ. मगच कोणची परीक्षा द्यायची याचा विचार कर. कोणत्याही परिस्थितीत आहे ती नोकरी सोडून स्पर्धा परीक्षांच्या मागे जाऊ नये. नोकरी करत असताना तुला परीक्षा देण्यासाठी दहा वर्षांचा अवधी हाती आहे. यश नक्की मिळेल.

सर, मला दहावीत ८३, बारावीत ७५ आणि द्वितीय वर्ष वाणिज्यला ८० मार्क्स मिळाले. आता मी तृतीय वर्ष वाणिज्यला आहे. मला माझं करिअर बँक, राज्य सरकार अथवा केंद्र सरकार मध्ये करायचे आहे. नोकरी मिळवून मला माझं पुढील आयुष्य प्रस्थापित करायचं आहे. बी.कॉम.करून नोकरीसाठी प्रयत्न करणे की एम.कॉम. करून करणे अधिक चांगले? तर वरील नोकरी मिळवण्यासाठी कोणते क्लास आहेत? किंवा अजून अधिक कोणते पर्याय आहेत? आर्थिक परिस्थिती चांगली आहे, कृपया मार्गदर्शन करणे.

रुक्मिणी बँकांच्या दोन प्रकारच्या परीक्षा असतात. क्लेरिकल व ऑफिसर या दोन पद्धतीच्या. दोन्हीसाठीची तयारीची पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत. सोयीचे वाटेल ते पुस्तक रोज अर्धा तास वाचणे अभ्यास करणे व त्यातील गणिते सोडवणे हा येत्या वर्षभराचा उद्याोग मागे लावून घे. एम.कॉम. करण्याची गरज नाही. त्याचा फायदाही नाही. बीकॉम ला ७५ टक्के मार्क मिळव. हेच महत्त्वाचे व उपयुक्त आहे. सर्व स्वरूपाच्या परीक्षा देताना ही प्राथमिक तयारी खूप उपयोगी पडेल. एक गोष्ट विसरली आहेस. राज्य सरकार केंद्र सरकार किंवा बँका यांच्यामधील नोकऱ्यांमध्ये दर तीन वर्षांनी बदली अपेक्षित असते. विवाहानंतर त्याचा त्रास वा अडचण होऊ शकते. या उलट चांगल्या संस्थेतून एमबीए केल्यानंतर मिळणारी नोकरी ही कोणत्याही मोठ्या शहरात उपयुक्त आणि फायदेशीर ठरू शकते. या सगळ्याची माहिती घेणे हे तुझ्या हाती आहे.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Expert answer on career advice questions career advice tips from expert zws 70
Show comments