IGI Aviation Bharti 2024 : IGI एव्हिएशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड अंतर्गत ग्राहक सेवा एजंट पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहे. एकूण १०७४ रिक्त जागांसाठी हे अर्ज मागवण्यात आले आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज भरायचा आहे. या पदासाठी पात्र उमेदवाराची शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा तसेच अर्ज पद्धत, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची शेवटची तारीख इत्यादी बाबींविषयी सविस्तर जाणून घेऊ या.

पदाचे नाव – IGI एव्हिएशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड अंतर्गत ग्राहक सेवा एजंट पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहे.

पद संख्या – ग्राहक सेवा एजंट पदासाठी एकूण १०७४ जागा रिक्त आहे.

शैक्षणिक पात्रता – पात्र उमेदवाराचे मान्यताप्राप्त बोर्डकडून १०+२ पास शिक्षण असावे.

वेतन श्रेणी – पात्र उमेदवासास १५ हजार ते २५ हजार पगार दिला जाईल.

वयोमर्यादा – ग्राहक सेवा एजंट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते ३० वर्ष असावे.

अर्ज पद्धती – ग्राहक सेवा एजंट पदासाठी https://igiaviationdelhi.com/igi-avaiation-job-application-important-instructions/ या अधिकृत वेबसाइटवर क्लिक करू अर्ज भरावा

हेही वाचा : SBI recruitment 2024 : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ‘या’ पदावर नोकरीची संधी! भरतीबद्दल माहिती पाहा

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २२ मे २०२२ पर्यंत तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता.

निवड प्रक्रिया – ग्राहक सेवा एजंट पदासाठी उमेदवारास सुरुवातीला लेखी परिक्षेला बसावे लागेल त्यानंतर लेखी परिक्षा पास झालेले उमेदवारांना दिल्ली येथे मुलाखतीला जावे लागेल. लेखी परिक्षा आणि मुलाखतीच्या आधारे उमेदवाराची निवड केली जाईल. त्यानंतर वैद्यकीय तापसणी आणि वर्णपूर्व पडताळणी पूर्ण झाल्यानंतर पात्र उमेदवारास या पदासाठी निवडले जाईल
अधिकृत वेबसाईट – सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी igiaviationdelhi.com या अधिकृत वेबसाइटवर क्लिक करावे.

अर्ज कसा करावा?

ग्राहक सेवा एजंट पदासाठी https://igiaviationdelhi.com/igi-avaiation-job-application-important-instructions/ या अधिकृत वेबसाइटवर क्लिक करावे आणि अर्ज भरावा.
अर्ज भरण्यापूर्वी https://igiaviationdelhi.com/wp-content/uploads/2024/03/IGI-English-Adv-2024.pdf या लिंकवर जावे आणि अधिसुचना नीट वाचावी आणि त्यानंतर अर्ज भरावा.
२२ मे २०२२ पर्यंत अर्ज करावा.
चुकीची माहिती आणि शेवटच्या तारखेनंतर अर्ज भरल्यास उमेदवारास अपात्र ठरवले जाईल.