इंडियन आर्मी – जानेवारी २०१९ पासून सुरू होणाऱ्या १०+२ टेक्निकल एन्ट्री स्कीम कोर्स – ४०साठी प्रवेश.

पात्रता – (पीसीएम) विषयांत किमान सरासरी ७०%  गुणांसह उत्तीर्ण. एकूण प्रवेश – ९० ४ वर्षांचा कोर्स यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यावर कॅडेट्सना आर्मीमध्ये लेफ्टनंट पदावर परमनंट कमिशन दिले जाईल.

ट्रेनिंग –

(अ) बेसिक मिलिटरी ट्रेनिंग ऑफिसर्स ट्रेनिंग अ‍ॅकॅडमी गया येथे १ वर्षांसाठी.

(ब) टेक्निकल ट्रेनिंग – फेज – १ प्रि कमिशन ट्रेनिंग – ३ वष्रे. फेज – २ पोस्ट कमिशन ट्रेनिंग

१ वर्षांसाठी. अंतिम परीक्षा यशस्वीरीत्या पूर्ण केल्यावर उमेदवारांना जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची इंजिनीअरिंगमधील पदवी दिली जाईल. ३ वर्षांचे ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर कॅडेट्सना रु. ५६,१००/- दरमहा स्टायपेंड म्हणून दिले जातील.

निवड पद्धती – शॉर्ट लिस्ट केलेल्या उमेदवारांना एसएसबी मुलाखतीसाठी (कालावधी ५ दिवसांचा असेल.) बोलाविले जाईल.

पुढील केंद्रांवर भोपाळ, बंगलोर, अलाहाबाद आणि कापूरथळा (पंजाब) स्टेज – १मध्ये अनुत्तीर्ण झाल्यास उमेदवारांना परत पाठविले जाते.

वैद्यकीय तपासणी.

ऑनलाइन अर्ज www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर दि. १४ जून २०१८ पर्यंत करावेत. ऑनलाइन अर्जाच्या दोन िपट्रआऊट्स काढून ठेवाव्यात. एसएसबी मुलाखतीसाठी सिलेक्शन सेंटरवर जाताना अर्जाची एक कॉपी आणि दहावीचे प्रमाणपत्र (जन्मतारखेचा पुरावा), बारावीचे प्रमाणपत्र आणि गुणपत्रक, आयडी प्रूफ मूळ प्रत. (दोन स्वयंसाक्षांकित प्रती आणि मूळ प्रमाणपत्र), पासपोर्ट आकाराचे २० फोटो स्वयंसाक्षांकित अर्जासोबत आणणे आवश्यक.

suhassitaram@yahoo.com