News Flash

ITBP च्या जवानाचा कँपमध्येच अंदाधुंद गोळीबार; ६ जणांचा मृत्यू

भारत तिबेट सीमा पोलीस दलातील काही जवानांमध्ये बुधवारी वाद झाला.

प्रतिनिधिक छायाचित्र

छत्तीसगढमधील नारायणपूरमध्ये येथे भारत तिबेट सीमा पोलीस दलातील काही जवानांमध्ये बुधवारी वाद झाला. यानंतर एका जवानानं आपल्या कँपमध्ये गोळीबार केला. यामध्ये कँपमधील ५ जवानांचा मृत्यू झाला. यानंतर त्या जवानानं स्वत:वरही गोळी झाडत आत्महत्या केली. अचानक झालेल्या या गोळीबारात २ जण जखमी झाले असल्याची माहितीही समोर आली आहे.

भारत तिबेट सीमा पोलीस दलातील काही जवानांमध्ये बुधवारी वाद झाला. यानंतर झालेल्या गोळीबारात ६ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती नारायणपूरचे सुप्रिटेंडंट ऑफ पोलीस मोहित गर्ग यांनी दिली. तसंच या घटनेत २ जण जखमी झाले असल्याचंही त्यांनी सांगितलं. माध्यमांमध्ये आलेल्या रिपोर्ट्सनुसार रहमान खान नावाच्या एका कॉन्स्टेबलनं आपल्या पाच साथीदारांवर गोळीबार केला. त्यानंतर त्यानं स्वत:वर गोळी झाडत आत्महत्या केली.

काही दिवसांपूर्वी नक्षलवाद्यांनी रस्त्याच्या निर्मितीसाठी वापरण्यात येणारी ५ वाहनं आणि एक मशीन जाळल्यानंतर नारायणपूर चर्चेत आले होते. पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत रस्ता निर्मितीचं काम सुरू होतं. त्या ठिकाणी नक्षलवाद्यांनी हा हल्ला केल्याची माहिती स्थानिक पोलिसांकडून देण्यात आली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 4, 2019 12:35 pm

Web Title: chhattisgarh narayanpur itbp jawan firing in camp six dead some injured serious jud 87
Next Stories
1 तब्बल १०६ दिवसांनी पी चिदंबरम येणार तिहार जेलबाहेर, ‘या’ पाच अटींवर मिळाला जामीन
2 …तर झारखंडमधील निवडणूक जिंकणार नाही: अमित शाह
3 नागरिकत्व दुरूस्ती विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
Just Now!
X