25 February 2021

News Flash

हे काय नवीन! आईस्क्रीममध्येही आढळला करोनाचा विषाणू

आईस्क्रीम खरेदी करणाऱ्या नागरिकांचा शोध सुरू

प्रातिनिधीक छायाचित्र/इंडियन एक्स्प्रेस

कित्येक महिने करोनाच्या सावटाखाली गेल्यानंतर लसीमुळे वातावरणातील भीती कमी होताना दिसत आहे. लस आल्यानंतरही सरकारकडून करोनासंदर्भातील सर्व खबरदारी घेण्याचं आवाहन केलं जात आहे. परिस्थिती पूर्वपदावर येत असताना चीनमध्ये आता आईस्क्रीममध्येही करोनाचे विषाणू आढळून आले आहेत. यातील ३९० डब्ब्याची विक्री करण्यात आली असून, खरेदी करणाऱ्या नागरिकांचा शोध घेतला जात आहे.

उत्तर चीनमध्ये आईस्क्रीवर करोनाचे विषाणू आढळून आले आहेत. यामुळे स्थानिक प्रशासनाची झोप उडाली असून, तातडीची पावलं उचलण्यात आली आहेत. The Daqiaodao Food Co., Ltd.या कंपनीच्या आईस्क्रीमध्ये करोनाचे विषाणू आढळून आले असून, प्रशासनानं कंपनी सील केली आहे. त्याचबरोबर कंपनीत सॅनिटायझेशन केलं जात असून, कंपनीतील कार्यरत कर्मचाऱ्यांच्या कोविड चाचण्याही करण्यात आल्या आहेत.

करोना संक्रमित आईस्क्रीमचे २९ हजार डब्ब्यांची अद्याप विक्री झालेली नाही. फक्त ३९० डब्बेच तियानजिनमध्ये विकले गेले असल्याचं सरकारनं म्हटलं आहे. स्थानिक प्रशासनानं आता आईस्क्रीम खरेदी करणाऱ्या नागरिकांचा शोध सुरू केला आहे. त्याचबरोबर आईस्क्रीम विक्रेत्यांनाही याबद्दल सूचना देण्यात आल्या आहेत. या आईस्क्रीमध्ये न्यूझीलंडमधील दूध भूकटी आणि युक्रेनमधील दह्याची भूकटीचा समावेश केला जातो. हे पदार्थ परदेशातून मागविण्यात आल्याचं कंपनीनं सांगितलं असल्याचं सरकारनं म्हटलं आहे.

आईस्क्रीममध्ये करोनाचे विषाणू आढळून आल्यानंतर कंपनीतील सर्व कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. १६६२ कर्मचाऱ्यांची करोना चाचणी ही करण्यात आली असून, त्यापैकी ७०० कर्मचाऱ्यांचे अहवाल करोना निगेटिव्ह आले आहेत. तर इतर कर्मचाऱ्यांचे रिपोर्ट अद्याप आलेले नाहीत, अशी माहिती प्रशासनानं स्थानिक माध्यमांना दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 17, 2021 1:08 pm

Web Title: coronavirus update chinese city reports coronavirus found on ice cream bmh 90
टॅग Coronavirus
Next Stories
1 ‘बिग बॉस 14’च्या टीममधील सदस्याचं निधन
2 चिंताजनक! नॉर्वेत लस घेतल्यानंतर २९ जणांचा मृत्यू
3 भयावह! अपहरण… सामूहिक बलात्कार… पुन्हा अपहरण… अन् सामूहिक बलात्कार
Just Now!
X