‘सीआरपीएफ’च्या जवानाने सहकाऱ्यांवर केलेल्या गोळीबारात चार जवान ठार झाले असून एक जखमी झाला आहे. छत्तीसगढमधील दंतेवाडा जिल्ह्यातील ‘सीआरपीएफ’च्या दीप कुमार तिवारी या जवानाने काल (सोमवार) रात्रीच्या सुमारास त्याचे सहकारी विश्रांती घेत असताना तिवारीने त्यांच्यावर गोळीबार केल्याची माहिती दंतेवाड़ाचे पोलिस अधीक्षक नरेन्द्र खरे यांनी दिली. १११ सीआरपीएफ बटालियन चे जवान दीप कुमार तिवारी यांनी आपल्या झोपलेल्या सहका-यांवर गोळ्या झाडण्यास सुरूवात केली. या गोळीबारात तीन जवान जागीच ठार झाले तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जखमी जवानावर जगदलपूर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
तिवारी यांनी अचानक केलेल्या गोळीबारामागचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसून तिवारीला मानसिक समस्या असल्याचे सांगितले जात आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 25, 2012 1:45 am