आज दिवसभरातील महत्वाच्या बातम्यांमध्ये पहिली बातमी आहे श्रीदेवींसंदर्भातील. शनिवारी दुबईमध्ये निधन झाल्यानंतर चौथ्या दिवशी श्रीदेवी यांच्यावर मुंबईमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. तर दुसरी मोठी बातमी भारताचे माजी अर्थमंत्री पी. चिदंमबरम यांचे पुत्र किर्ती चिदंमबरम यांना सीबीआयने अटक केली आहे. त्याचप्रमाणे बिहारच्या राजकारणात पुन्हा एक मोठी घटना घडली असून राज्यातही रिव्हर साँगवरून राजकारण चांगलेच तापले आहे. याबरोबरच क्रीडा, देश-विदेश, मनोरंजन आदी क्षेत्रांतील आणखी महत्वाच्या बातम्या पाहूयात लोकसत्ता ऑनलाइनच्या FB Live बुलेटीनमध्ये…